Vidhansabha Election: कोरेगावच्या गद्दार आमदारांना जनता घरपोच करणार – आ. शशिकांत शिंदे

Vidhansabha Election: कोरेगावच्या गद्दार आमदारांना जनता घरपोच करणार – आ. शशिकांत शिंदे

Vidhansabha Election: एकांबे येथे रॅली, विराट सभा ; हजारो युवकांचा पक्षात प्रवेश

Vidhansabha Election : सत्ता ही जनतेच्या सेवेसाठी, कामासाठी वापरायची असते. पण या मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनी सत्तेचा वापर जनतेवर दडपशाही, दादागिरी करण्यासाठी केला. ऐन हंगामात या भागातील पाण्यावाचून शेतकऱ्यांचे नुकसान केले. त्यामुळेच आता जनतेने निवडणूक हातात घेऊन नवी क्रांती करीत या मतदारसंघातील गद्दार आमदारांना घरपोच करण्याचा संकल्प केला आहे. असे प्रतिपादन कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आ शशिकांत शिंदे यांनी केले.
Vidhansabha Election: एकांबे ता. कोरेगाव येथे आ. शशिकांत शिंदे यांच्या निवडणूक प्रचारार्थ रॅली काढण्यात आली त्यानंतर रॅलीचे विराट भसेत रूपांतर झाले. या वेळी माजी आमदार रामहरी रूपनवर, राष्ट्रीय काॅग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेशराव जाधव, अजित पाटील- चिखलीकर, ऍड. जयवंतराव केंजळे,राजेंद्र शेलार, राजाभाऊ जगदाळे, बाबासाहेब कदम, संतोष शेलार, मानाजी घाडगे, मनोहर बर्गे, ब्रम्हा जगदाळे, अमर बर्गे, ऍड. पांडुरंग भोसले, ऍड.नितीन भोसले संजना ताई जगदाळे, अविनाश फाळके आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. शशिकांत शिंदे म्हणाले, माझे कार्यकर्ते प्रचार करतात म्हणून येथील लोकप्रतिनिधी दबाव, दडपशाही करीत त्यांचा ऊस जळतात, स्टेट्स ठेवले की मारहाण करतात, महसूल , पोलीस,अन्नभेसळ यंत्रणांचा वापर करून धाडी टाकतात ही लोकशाही आहे का? सुसंस्कृतपणाचा बुरखा पांघरून त्यांनी जनतेला वेठीस धरले आहे. गेल्या वर्षी येथील शेतकऱ्यांना शेतीच्या हंगामी पाण्यावाचून मुकावे लागले. तुम्ही माझ्याकडे या नाहीतर तुम्हाला पाणी देणार नाही अशी दमबाजी करून त्यांनी सत्तेचा शेतकऱ्यांसाठी नाही तर त्यांना मारण्यासाठी वापर केला . शेतकऱ्यांना त्यांच्या पाण्याचा अधिकार आहे की नाही? त्यामुळेच जनतेमधून उठाव होत आहे. असे सांगून ते म्हणाले, शेतकऱ्यांविरोधात निर्णय घेऊन मुख्यमंत्री आमदार निवडून आणण्यासाठी वाट्टेल ते करीत आहेत. या मतदारसंघातील मतदारांची नावे कमी करून लोकशाहीने दिलेला हक्क, अधिकार काढून घेतला जात आहे. सत्ता, सिमेंट कामातील भ्रष्टाचाराच्या पैशाच्या जोरावर मतदार व कार्यकर्त्यांवर दबाव आणून, खोट्या केसेस दाखल करून त्यांनी या मतदारसंघातील संस्कृतीला काळीमा फासला आहे. मी कोट्यवधी रूपयांची विकासकामे केली आणि विरोधकांनाही आपलेसे केले परंतु सद्या या मतदारसंघात पक्षबदलूपणा, गद्दारी करून जनतेच्या स्वाभिमानाला धक्का लावण्याचा प्रयत्न केला असल्यानेच या मतदारसंघातील दहशती विरोधात मी लढा देण्यासाठी मैदानात उतरलो आहे असे सांगून ते म्हणाले, सत्ता नसतानाही जनतेचा मला मिळत असलेला प्रतिसाद, आर्शिवाद हीच माझी उर्जा असून या मतदारसंघातील आमदारांच्या नाटकी, खोटारडे पणाला मुठमाती देऊन स्व. यशवंतराव चव्हाण, शरद पवार, स्व. शंकरराव जगताप यांच्या रचनात्मक विचारांचे पुर्नजीवन करून पक्ष, नेत्यांशी गद्दारी करणाऱ्या नादान आमदाराला घरपोच करण्याचा निर्णय जनतेने घेतला आहे असे सांगून त्यांनी एकांबे सह कोरेगाव , खटाव, सातारा तालुक्यातील गावांच्या विकासासाठी कोठेही कमी पडणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी माजी आमदार रामहरी रूपनवर म्हणाले, दहा वर्षे झाले तरी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा पंचायत समितीच्या निवडणुका सरकारने थांबवून लोकशाही संपविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.त्यामुळे महायुतीच्या सरकार विरोधात मतदारांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या सरकारने कोट्यवधी रूपयांचे भ्रष्टाचार करून जनतेच्या पैशाची लूट केली आहे. असे सांगून त्यांनी आ. शशिकांत शिंदे हे शरद पवारांचे विश्वासू, धाडसी, जनतेसाठी अहोरात्र कष्ट घेणारे उमेदवार असून येथील जनतेचा स्वाभिमान गहाण ठेवून गद्दारी करणाऱ्या उमेदवारांचा आणि महायुती सरकारने केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी मतदारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्यावे.
प्रास्ताविकात जयवंतराव शिंदे यांनी एकांबे मध्ये सत्तर टक्के शेतीचे क्षेत्र असताना गेल्या वर्षी येथील आमदारांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक पाण्यापासून वंचीत ठेवले. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले. कालवा दुरूस्तीसाठी आ. शशिकांत शिंदे यांनी विधीमंडळात लक्षवेधी मांडली.त्यावेळी ५० कोटी रुपये मंजूर केल्याचे आश्वासन दिले. परंतु हा निधी उपलब्ध करून दिला नाही. पाणी हंगामाबाबत सरकारने घाई गडबडीत काढलेला जी.आर. महायुतीच्या उमेदवारांना संपविणारा ठरणार आहे.
यावेळी अजित पाटील – चिखलीकर, डॉ . सुरेशराव जाधव,ऍड. श्रीकांत चव्हाण, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तानाजीराव शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.

आ. महेश शिंदे गटाला धक्क्यावर धक्के… या मेळाव्यात रामोशी वस्ती, शेळकेआळी, रामोशी वाडी, एकांबे येथील जयभवानी मंडळाच्या हजारो कार्यकर्त्यांनी आ. शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला.या कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे[आमदार शशिकांत शिंदे यांच्या पक्षाला जनमत वाढत चालले असून हा आ. महेश शिंदे गटाला ऐन निवडणुकीत धक्क्यावर धक्का दिल्याचे मानले जात आहे .

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Top 10 Netflix Web Series to Watch Right Now (Feb 2026) Maharashtra kesari 2025 :पृथ्वीराज मोहोळ ६ ७ व्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी (Copy)