Shikhar Shingnapur Shamhu Mahadev Mandir -महाराष्ट्राचे कुलदैवत शिंगणापूरचे शंभू महादेव मंदिर

Shikhar Shingnapur Shamhu Mahadev Mandir -महाराष्ट्राचे कुलदैवत शिंगणापूरचे शंभू महादेव मंदिर

Shikhar Shingnapur Shamhu Mahadev Mandir श्रावणात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी

जाणून घ्या Shikhar Shingnapur Shamhu Mahadev Mandir शिखर शिंगणापूर शंभू महादेव मंदिराची संपूर्ण माहिती

सह्याद्रीच्या डोंगररांगेमधील काही डोंगरमाथे मंदिरांनी नटलेले आहेत. यातील काही मंदिरे अशी आहेत कि त्यांना धार्मिक, ऐतिहासिक, पौराणिक आणि राजकीयसुद्धा पार्श्वभूमी लाभली आहे. असे एक ठिकाण म्हणजे माण तालुक्यातील शिखर-शिंगणापूर.Shikhar Shingnapur Shamhu Mahadev Mandir -महाराष्ट्राचे कुलदैवत शिंगणापूरचे शंभू महादेव मंदिर हे सहयाद्रीच्या उपशाखा शंभू महादेवाच्या डोंगररांगेतील हे ठिकाण शेवटच्या डोंगरावर वसलेले आहे. आणि डोंगररांगा याच नावाने ओळखल्या जातात. श्रावण महिन्यात या तीर्थक्षेत्री दर्शनसाठी भाविक अलोट गर्दी करतात तर जाणून घेऊया Shikhar Shingnapur Shamhu Mahadev Mandir -महाराष्ट्राचे कुलदैवत शिंगणापूरचे शंभू महादेव मंदिराची संपूर्ण माहिती

या माणभूमीत संतोषगड, वारुगड, महिमानगड हे किल्ले तर आहेतच पण याचबरोबर या परिसरात भगवान शिवशंकराची पवित्र अष्टलिंग आहेत. या परिसरात श्री क्षेत्र वावरहिरे येथील श्री पाणलिंग मंदिर, थदाळे येथील श्री वैलदेव मंदिर, कोथळे येथील श्री खांबलिंग मंदिर, नातेपुते गावात असलेले श्री गौरी हरेश्वर मंदिर, पिंपरी गावात असलेले श्री उंबरदेव मंदीर, शिखर शिंगणापूर येथील श्री शंभू महादेव मंदिर, श्री अमृतेश्वर बळी मंदीर, शिखर शिंगणापूर येथील श्री गुप्तलिंग मंदिर, ठोंबरेवाडी येथील श्री एकलिंग मंदीर, मोही येथील श्री बेलदेव मंदिर, या सर्वाबरोबरच फोंडशिरस येथील श्री बाणलिंग मंदीर आणि दंगेरवाडी येथे असलेले जागृत श्री शंभू महादेव मंदीर अशी अष्टलिंगाबरोबरच दहा मंदिरे आहेत.

शिखर-शिंगणापूरला येण्यासाठी दोन रस्ते असून पहिला फलटणमार्गे तर दुसरा दहिवडीमार्गे आहे. कोणत्याही मार्गे आले तरी पायथ्याला असणाऱ्या भव्य कमानीतून याडोंगरावर यावे लागते. डोंगरावर येण्यासाठी पायऱ्यांचा आणि दुसरा गाडीचा असे दोन मार्ग आहेत. गाडीने आल्यास मंदिराच्या तटबंदीपर्यंत येता येते.

सुरुवातीला असणाऱ्या पंधरा पायऱ्या चढल्यावर आपल्याला मंदिराच्या आवारात येता येते. मुख्य दरवाज्याच्या अलीकडे खडकेश्वर मंदिर आहे. मुख्य दरवाज्यातील पायऱ्यांवर काही ठिकाणी आपल्याला छोट्या-छोट्या मूर्ती कोरलेल्या दिसतात.

शिंगणापूरचे महादेव मंदिर समुद्रसपाटीपासून सुमारे ३५०० फूट उंचीवर आहे. या मंदिराला चारही बाजूने तटबंदी आहे. हेमाडपंथी शैलीतील हे मंदिर वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुना मानले जाते. समोर दिसणारा महादरवाजा उंच असून देवडीवर दोन्ही बाजूला आपल्याला हत्तीच्या मूर्ती पहावयास मिळतात. इथून पुढे आत आल्यावर मांगोबांचे एक छोटेखानी मंदिर आहे. मांगोबा मंदिरापासून काही पायऱ्यांवर दुसरा दरवाजा आहे.

त्यानंतर शिवकाळात बांधलेले मंदिराचे आवार आहे. मंदिराचे प्रांगण सुमारे ३८.१ मीटर लांबीचे आणि २७.४३ मीटर रुंदीचे असून या ठिकाणी असणाऱ्या फरसबंदीमुळे हे भव्य दिव्य वाटते. या प्रांगणाला चार प्रवेशद्वार आहेत. भिंतीत देवळाच्या मागील बाजूस लहान-लहान खोल्या आहेत. त्यापैकी काही देवस्थानांच्या घोड्याचे तबेले आहेत, तर काही भांडारगृहासाठी व कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी उपयोगात आणल्या जात होत्या. सध्याछत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज श्री.उदयनराजे भोसले हे या मंदिराचे सर्वेसर्वा आहेत.

सुरुवातीला दोन्ही बाजूला आपल्याला एक-एक दीपमाळ पहायला मिळते.काहीशा उंच असणाऱ्या या दीपमाळांवर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. शिवाय आवारात आणखीही काही लहान दीपमाळा व दोन-तीन छोटेखानी मंदिरे आहेत. मंदिराच्या मागे डाव्या बाजूस एका कोनाड्यात एक पोर्तुगीज बनावटीची मोठी घंटा बांधलेली आहे. यात्रेच्या वेळी यात्रेकरूंना उतरण्यासाठी आवारात पडवी बांधलेली आहे. मंदिराचे पूर्ण आवार तटबंदीत असून त्याला चारी बाजूंस दरवाजे आहेत.

महादेव मंदिर आवारात मध्यभागी असून मंदिरासमोर नंदी मंडप आहे. त्याच्या आसाभोवती फिरणारे खांब आहेत. नंदीमंडपाच्या समोर चांदीच्या पत्र्याने मढविलेली शिवाला शरण गेलेली पार्वतीची मूर्ती आहे. जवळच लहान नंदी देखील आहे. मंदिराला मंडप आणि गाभारा असे भाग असून मंडपाला चारही बाजूने प्रवेशद्वारे आहेत. अत्यंत सुबक आणि नाजूक कोरीव काम केलेल्या खांबांवर हा मंडप उभा आहे. या खांबावर वराहवध, तलवारीने- बंदुकीने शिकारीचे प्रसंग, मैथुन शिल्पे, नक्षीकाम अशी शिल्पे घडविलेली आहेत. यातील वराहवध शिल्पाला खास महत्त्व आहे.

याविषयी एक कथाही ऐकायला मिळते. उर्वशीने इंद्रसभेत गाताना संगीतशास्त्राच्या केलेल्या चुकांचा आणि इंद्राने ते चालू ठेवू दिल्याचा संताप दुर्वास ऋषींना आलाआणि त्यांनी इंद्र आणि उर्वशीस शाप दिला की, इंद्रा, तू मृत्युलोकात वराह होशील आणि उर्वशी घोडी होईल. नंतर त्या दोघांनी त्यांचीकरुणा भाकल्यावर त्यांनी उ:शाप दिला की इंद्र शिवस्पशनि यातून मुक्त होईल. आणि त्याप्रमाणे तो किरातरूपी शिवस्पर्शानि मुक्त झाला. त्याच्या या शिकारीचे शिल्प इथे मंदिरात पाहायला मिळते. मंडपाच्या मध्यभागी चौकोनी आकाराची रंगशिळा असून त्यावर पाच नंदी आहेत. आणखी एक गोष्ट इथे पहायला मिळते ती म्हणजे रंगशिळेवर नावास्पुर्तीची चांदीची नाणी ठोकलेली आहेत. इथून गाभाऱ्यातील शिवलिंगाचे दर्शन होते. गाभाऱ्याचा दरवाजा चांदीच्या पत्र्याने मढविलेला असून त्याची दगडी कमान अत्यंत बारीक कलाकुसरीने नटलेली आहे. गाभान्यातील शिवलिंग चौकोनी आकाराचे आणि दोन शाळुंका असणारे आहे. हे शिवलिंग स्वयंभू मानले जाते. आणि यावरील शाळुंका म्हणजे शिव-शक्तीचे प्रतीक मानले जाते. शिवलिंगाच्या मागे अलीकडच्या काळात स्थापलेली विष्णूची मूर्ती आहे.

मंदिराच्या बाहेरच्या बाजूला, शिखरावर अनेक नर्तिका, अप्सरा, साधू, देव-देवता यांच्या मूर्ती आहेत.मंदिर आवाराबाहेर, डोंगराच्या एका बाजूला, एक मोठी जुनी वास्तू आहे. तिला ‘सदरसोपा’ म्हणतात. ही वास्तू म्हणजे शहाजी, शिवाजी, संभाजी, यांच्या प्रतीकात्मक समाध्या मानले जाते. यांतील मधली समाधी शहाजी राजांनी, डाव्या बाजूची शिवाजीमहाराजांची व उजवीकडील संभाजी राजांची आहे. संभाजी राजांच्या समाधीमध्ये शिवलिंग स्थापन केलेले आहे.

शंभूमहादेवाची यात्रा गुडीपाडव्यापासून सुरू होते. ती एकादशी बारसपर्यंत चालते. या कालावधीत शंकर-पार्वती हळदी समारंभ, विवाह सोहळा, ध्वज बांधने असे कार्यक्रम असतात. चैत्र शुद्ध अष्टमीला शिवपार्वती विवाह सोहळा पार पडतो. आख्यायिकेनुसार इंदूर राजघराण्याला विवाहाचे निमंत्रण मिळालेले नव्हते. याचा भक्तिरूपाने निषेध म्हणून राजघराण्याचे वारसकालगावडा राजे एकादशीला घोड्यावरून शिंगणापुरात येतात. पुष्कर तलावात स्नान करतात. एकादशीला सर्व भाविक उपवास करीत असताना कालगौडा न्याहारी करतात. त्यानंतर पायात चप्पल घालून गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतात. त्यानंतर उमाबनातील नांद्रुकीच्या झाडाखाली बसून कांदा, चटणी आणि भाकरी खातात. त्यांच्याबरोबर आलेले सर्व भाविक महाप्रसाद घेतात.

त्यानंतर याच दिवशी हरहर महादेवच्या जयघोषात बारसच्या दिवशी शिखर शिंगणापूरमध्ये हजारो कावडी दाखल होतात. या दिवशी मुंगी घाटातून करून शेकडो कावडी वर चढतात. कड्यावरून पाहताना माणसे मुंगीसारखी दिसतात. म्हणून या ठिकाणाला मुंगी घाट म्हणतात.सर्वांत शेवटी मानाची तेल्यात्याची कावड असते. ती मुंगी घाट चढल्यावर आणलेले पाणी महादेवाला घालतात. त्यालाच दार घालने असे म्हणतात. त्यानंतर यात्रेची सांगता होते. यात्रेनिमित्ताने मराठवाडा, विदर्भ, आंध्र प्रदेश, कर्नाटक, इंदोर येथून भाविक येतात.याशिवाय श्रावणातील सोमवार, प्रत्येक अमावस्या व एकादशीस येथे लहान-मोठ्या यात्रा भरतात.

याशिवाय शंभूमहादेवाच्या डोंगर रांगांमध्ये मुंगीघाट, रानमळा, भटहिरा, सोनटक्का, राजे छत्रपतींचे स्मारक, सदर सोपा, घडशिहेळ, उमाबन, पाण्याच्या टाकीचा डोंगर, साखरबाई, बारव परिसर, मुंगीघाटी, खारवने परिसर, मालोजी राजेंनी बांधलेला दगडी पुष्कर तलाव परिसर, हत्ती सोंड, कोथळे माथा घाट परिसर अशी सर्व विलोभनीय स्थळे शिंगणापूरमध्ये आहेत.श्री विष्णु-लक्ष्मीने चैत्रअष्टमी या दिवशी शिवाचा पार्वतीशी विवाह लावून दिल्याची घटनायेथेच घडल्याची एक पुराण कथा सांगितली जाते. त्या आधारावर गावकरी प्रतिवर्षी याच दिवशी शिव पार्वतीच्या विवाहाचा सोहळा पार पाडतात.

देवगिरीच्या यादव वंशातील सिंघण राजाने या मंदिराची उभारणी केली. सातारा जिल्ह्यातील अनेक घटना व घटनास्थळे यांच्याशी ऐतिहासिक काळात सिंघण राजाचा (१२१० से १२४७) संबंध येतो. कोल्हापूरच्या शिलाहार घराण्याच्या भोजराजाशी लढाई जुंपली तेव्हा सिंघणाची या परिसरातच होती.सिंघणराजाने या डोंगराच्या पायथ्याला एक तलाव बांधला. त्याला आज पुष्करतीर्थ म्हटले जाते. मालोजीरावांनी व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी देणगी देऊन याची डागडुजी केली.

आजचे शिंगणापूर हे त्याकाळचे सिंघणपूर होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी भोसले यांची पाटीलकीचे वतन वेरुळ येथे होते. तेथील स्वयंभू घृष्णेश्वराचे ते निस्सीम भक्त होते. त्याचप्रमाणे शिंगणापूरच्या शंभू महादेवाचेही ते भक्त होते. येथे पाण्याचे फार दुर्भिक्ष हे त्यांच्या लक्षात आले. त्यासाठी एखादा मोठा तलाव बांधवा हा त्यांचा मनसुबा होता. सिंघण राजाने बांधलेल्या कच्च्या तलावाचेच काम मालोजीने पक्क्या स्वरुपात पूर्ण केले, असेही मानतात.शिखर शिंगणापूर येथे शिवरायांनी काही काळ वास्तव्य केल्याचे सांगितले जाते.

Shikhar Shingnapur Shamhu Mahadev Mandir शिखर शिंगणापूर या ठिकाणी इ.स. १६५१ साली एक महत्त्वाची घटना घडली. बळजबरीने मुसलमान झालेल्या नेताजी पालकरांना शुद्धीकरण करून पुन्हा हिंदू धर्मात याच ठिकाणी घेतले गेले. इ.स. १८१६ मध्ये ठाण्याच्या कारागृहातून त्र्यंबकजी डेंगळे सुटले आणि शिंगणापूरच्या डोंगरात लपून त्याने १८०० माणसे जमवली. जनरल स्मिथला ही गोष्ट कळताच त्याने, त्यांना डोंगरातून पळवून लावले. पुढे त्र्यंबकजी डेंगळेचा पंढरपूर येथे खून झाल्याची नोंदही आहे.

शिंगणापूर गावात उजव्या बाजूस महादेव मंदिराचीच प्रतिकृती असणारे अमृतेश्वराचे मंदिर आहे. तटबंदीमध्ये असणाऱ्या या मंदिरात येण्यासाठी दोन दरवाजे आहेत. मंदिराच्या एका बाजूला घुमटासारखे एक छोटेखानी सदाशिवाचे मंदिर आहे. या मंदिराला मंडप आणि गाभारा असे दोन भाग असून गाभार्यातील शिवलिंग दोन शाळुंका असणारे आहे. मंडपामध्ये गोल रंगशिळा आहे. हे मंदिर घडीव दगड एकमेकांवर ठेवून बांधलेले आहे.

शिंगणापूरपासून काही अंतरावरच दहिवडी हे तालुक्याचे ठिकाण आहे. तिथून गोंदवले हे ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे हे जन्मस्थळ असून आध्यात्मिक अभ्यासकेंद्र म्हणूनही ते प्रसिद्ध आहे. गोंदवल्यापासून जवळच म्हसवड असून तिथले सिद्धनाथाचे मंदिर प्रसिद्ध आहे. इथल्या रथोत्सवास राज्यासह कर्नाटक, आंध्र प्रदेशातूनही भाविक लाखोंच्या संख्येने गर्दी करतात. सातारा ते शिखर-शिंगणापूर हे अंतर फलटणमार्गे ९० कि.मी. आहे. तर दहिवडीमार्गे हे अंतर ८८ कि.मी. आहे.

याशिवाय मोही गावात श्री बेलदेव, वावरहिरे गावात श्री पाणलिंग वैलदेव, कोथळेमध्ये श्री खांबलिंग, पिंपरीमध्ये श्री उंबरदेव, नातेपुत्यात श्री गौरीहर व फोंडशिरस येथे श्री बाणलिंग अशी मंदिरे आहेत. त्यांची प्रदक्षिणा केल्याने भरपूर पुण्य प्राप्त होते अशी लोकधारणा आहे. अष्टलिंग दर्शनच्या या सहलीत या मंदिराबरोबरच आपल्याला छत्रपती शिवरायांच्या घराण्याचे दैवत शिखर शिंगणापूरबरोबरच महिमानगड, संतोषगड, वारुगड, सीतामाईचा डोंगर मोही येथील माणदेशी एक्स्प्रेस ललिता बाबर यांचे घर ही ठिकाणे आपल्यास पहाता येतात. कोथळे गावापासून जवळच सुप्रसिद्ध असा मुंगी घाट आहे. हे पण आपण या ठिकाणी पाहू शकता. तर मग महाराष्ट्राचे कुलदैवत शिंगणापूरचे महादेव मंदिर पहायला येताय ना.

#Shikhar Shingnapur Shamhu Mahadev Mandir, Shambhu Mahadev Mandir,

हे पण आवर्जून वाचा क्लिक करा Jarandeshwar Temple श्रावण, पाऊससरी आणि जरंडेश्वर दर्शन

WhatsApp Image 2025 06 24 at 10.34.39 AM

लेखन – सहा.प्रा.सुर्यकांत शामराव अदाटे
प्रा.संभाजीराव कदम महाविद्यालय, देऊर
(लेखक सहाय्यक प्राध्यापक म्हणून सेवारत असून अनेक दैनिकातून विपुल साहित्य लेखनाचा अनुभव, गड- किल्ले व प्रवास भेटीची आवड, लोकजीवन आणि लोकसंस्कृतीचे अभ्यासक आहेत.)
९९७५७५९३२५

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Top 10 Netflix Web Series to Watch Right Now (Feb 2026) Maharashtra kesari 2025 :पृथ्वीराज मोहोळ ६ ७ व्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी (Copy)