Satara News देऊर जि.प शाळेत माजी विद्यार्थी संघाची स्थापना

अध्यक्षपदी राजेंद्र शिंदे, उपाध्यक्षपदी सूरज कदम यांची निवड
सातारा/प्रतिनिधी
Satara News देऊर जि.प शाळेत माजी विद्यार्थी संघाची स्थापना देऊर (ता .कोरेगाव) येथील ज़िल्हा परिषद मराठी शाळेत माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली असून या नूतन संघाच्या अध्यक्षपदी राजेंद्र किसन शिंदे याची निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी सुरज रामचंद्र कदम यांची निवड करण्यात आली.
येथील जिल्हा परिषद मराठी शाळेने शंभरी ओलांडली असून या शाळेच्या विकासासाठी आता माजी विद्यार्थांनी सुकाणू हाती घेतला आहे. एकीकडे मराठी शाळा बंद होत असतानां शैक्षणिक वारसा सांगणाऱ्या देऊर गावात देऊर ग्रामस्थांनी एकत्र येत आता १ ५ ० वर्ष जुन्या शाळेला पुन्हा उर्जितावस्था आणण्यासाठी एकजूट केली आहे. शाळेने आज पर्यंत हजारो यशवंत विद्यार्थी घडवले असून विविध क्षेत्रात कार्यरत या माजी विद्यार्थांनी एकत्र येत शाळेच्या कायापालट करण्याचा निर्धार केला आहे त्या नुसार
मुख्याध्यापिका शोभा नवनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली.
या संघात सल्लागारपदी राजाराम कृष्णा कदम, कोषाध्यक्ष श्री गंगाधर संपत आवळे, सदस्यपदी यशपाल अनिल कदम, किशोर प्रकाश कदम, मधुकर मोहन दोरके यांची निवड करण्यात आली. यावेळी सर्व माजी विद्यार्थांनी या संघात सहभागी व्हावे असे आवाहन मुख्याध्यापिका शोभा नवनाथ शिंदे यांनी केले.
आज जे घडलो त्यात मराठी शाळा माऊलीचा मोठं योगदान असून ते विसरता येत नाही, आज पुन्हा तिच्यासाठी काम करण्याची संधी मिळाली असून भविष्यात या शाळेचे जिल्ह्यात नाव वाढेल यासाठी माजी विदयार्थी यांच्या मार्फत सर्वोतोपरी सहकार्य राहील असा विश्वास अध्यक्ष राजेंद्र शिंदे व उपाध्यक्ष सूरज कदम यांनी दिला.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश कदम यांनी स्वागत तसेच प्रास्ताविक सौ.शोभा शिंदे मॅडम मुख्याध्यापिका यांनी केले, संघाचे कार्य व माहिती शिक्षिका सौ.वैशाली चव्हाण दिली, माजी विद्यार्थी संघ स्थापना जी.आर. व नियमावलीचे वाचन शिक्षक रमेश चव्हाण यांनी केले व आभार शिक्षका सुनिता गायकवाड यांनी मानले.
हे पण वाचा PM Awas Yojana 2026 घरखरेदीसाठी सरकारची मदत; होम लोनवर लाखोंची सबसिडी, EMI होणार कमी
हे पण वाचा 2026 मध्ये आरोग्य विम्याला मोठी मागणी; प्रीमियम वाढीची शक्यता, तज्ञांचा सल्ला – “आता पॉलिसी घ्या”





