SATARA NEWS देशसेवाचा नवा अध्याय, उत्तर कोरेगावातील १७ युवकांची भारतीय सेनेत निवड

SATARA NEWS देशसेवाचा नवा अध्याय, उत्तर कोरेगावातील १७ युवकांची भारतीय सेनेत निवड

SATARA NEWS गुलालाची उधळण करत जल्लोषात अभिनंदन

तेजस लेंभे / प्रतिनिधी

SATARA NEWS सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो याच जिल्ह्यातील दुष्काळी उत्तर कोरेगाव भागातील पिंपोडे बुद्रुक, भावेनगर, सोनके, नांदवळ, रणदुल्लाबाद,बिचुकले,पिंपोडे खुर्द,वाठार स्टेशन आणि वाघोली येथील एकूण १७ युवकांची भारतीय सेना दलात निवड झाली असून या यशामुळे देशसेवेचा नवा अध्याय जोडला गेला असून संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कष्ट, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर या युवकांनी देशसेवेचे स्वप्न साकार केले आहे.
पिंपोडे बुद्रुक येथील कु. अनुराग पवार, कु. वैष्णव गार्डी, कु. आर्यन वाघांबरे, कु. सोहम पाटील, भावेनगर येथील कु. रोहन पिसे, कु. वैभव पिसे, कु. शिवराज पिसे, कु. शुभम येळे, सोनके येथील कु. ओम पवार, रणदुल्लाबाद येथील कु. अथर्व विजय जगताप, कु. मनिष धनंजय जगताप, वाघोली येथील कु. इरफान पठाण,बिचुकले येथील कु.वेदांत पवार,पिंपोडे खुर्द येथील कु.यश देवरुखे,वाठार स्टेशन येथील कु.ज्ञानेश्वर काळे, कु.ऋषिकेश तांबे तसेच नांदवळ येथील कु.वेदांत भोसले यांची भारतीय सेनेत निवड झाली आहे.
या निवडीची माहिती समजताच युवकांच्या मित्रपरिवाराने गुलालाची उधळण करत जल्लोषात स्वागत केले. “भारत माता की जय”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. या युवकांना त्यांच्या कठोर परिश्रमांचे फळ मिळाल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.या यशाबद्दल उत्तर कोरेगाव भागातील ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, विविध सामाजिक संस्था, ग्रामस्थ तसेच प्रतिष्ठित नागरिकांनी नवोदित जवानांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. दुष्काळी भागातून घडलेले हे यश तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Top 10 Netflix Web Series to Watch Right Now (Feb 2026) Maharashtra kesari 2025 :पृथ्वीराज मोहोळ ६ ७ व्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी (Copy)