Government Service Camp Maharashtra सोनके येथे लोकसेवा कॅम्प यशस्वी, उस्फुर्त प्रतिसाद

सोनके येथे महाराजस्व अभियान अंतर्गत लोकसेवा कॅम्प यशस्वी
आदिनाथ धुमाळ/ प्रतिनिधी
सोनके (ता. कोरेगाव) │ Government Service Camp Maharashtra सोनके येथे खासदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनातून व कोरेगाव तहसीलदार यांच्या सहकार्यातून महाराजस्व अभियान अंतर्गत लोकसेवा कॅम्प यशस्वीरीत्या संपन्न झाला. या कॅम्पच्या माध्यमातून सोनके ग्रामस्थांच्या विविध शासकीय कामांना गती मिळाली.
आयोजित करण्यात आलेल्या या कॅम्पमध्ये नवीन रेशनकार्ड काढणे, रेशनकार्डमधील नावे कमी करणे व वाढवणे, आधार व पॅन कार्ड काढणे, हयातीचा, उत्पन्न व रहिवासी दाखला, संजय गांधी दिव्यांग योजना व पेन्शन योजना, संजय गांधी विधवा/परित्यक्ता योजना,
श्रावण बाळ योजना, कृषी विभागाची माहिती यांसारख्या विविध शासकीय सेवांचा लाभ नागरिकांना देण्यात आला. या कॅम्पला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, एका छताखाली विविध सेवा उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
हे अभियान यशस्वी करण्यासाठी महाराजस्व अभिमान दिशा समितीचे सद्यस्य कैलासराव धुमाळ, सागर जगताप, दत्तूभाऊ धुमाळ, सतीश धुमाळ, मंगेश धुमाळ, संभाजीराव धुमाळ,धनंजय धुमाळ, राहुल धुमाळ आदींनी विशेष परिश्रम घेतले.
सोनके गावातील जनतेच्या विविध कामांसाठी गौरव माने (पुरवठा निरीक्षक, कोरेगाव तहसील कार्यालय), महेश सावंत (सहाय्यक पुरवठा विभाग), राहुल नाले (तलाठी), जयंत पवार (कृषी अधिकारी), महेश शिंदे (पीएम किसान सहाय्यक), पांडुरंग वर्पे, पिंपोडे बु. येथील प्रमोद चव्हाण (महा-ई-सेवा केंद्र), अक्षय साळुंखे (महा-ई-सेवा केंद्र) आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
हे पण वाचा: ZP Election 2026 :जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल; ५ फेब्रुवारीला मतदान, ७ फेब्रुवारीला निकाल





