Maharashtra Election Update: महानगरपालिका निवडणुकांचा धुरळा उडणार, तारखा जाहीर, १५ जानेवारीला मतदान, निकाल १६ जानेवारीला

Maharashtra Election Update: महानगरपालिका निवडणुकांचा धुरळा उडणार, तारखा जाहीर, १५  जानेवारीला मतदान, निकाल १६  जानेवारीला

Maharashtra Election Update आज होतील उद्या होतील अशी आस लागून राहिलेल्या महानगरपालिका निवडणुकीचा धुरळा आता उडणार आहे कारण महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्यात महापालिका निवडणुका कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या माहितीनुसार राज्यातील 29 महानगरपालिकांमधील एकूण 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार असून निवडणूक झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत उमेदवारांना जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असणार आहे. या निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 ची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

निवडणूक आयोगाकडून मतदार प्रक्रियेसाठी ‘मताधिकार’ हे अॅप विकसित करण्यात आले असून ज्या मतदारांची नावे दुबार आहेत, त्यांच्या नावापुढे डबल स्टार देण्यात आला आहे. अशा मतदारांना एकाच मतदान केंद्रावर मतदान करता येणार आहे. तसेच मतदार यादीतील दुरुस्तीचा अधिकार आयोगाकडे नसल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे. महापालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2025 या कालावधीत पार पडणार आहे. 31 डिसेंबर 2025 रोजी अर्जांची छाननी करण्यात येणार असून 2 जानेवारी 2026 ही उमेदवारी माघार घेण्याची अंतिम तारीख असणार आहे. 3 जानेवारी 2026 रोजी निवडणूक चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. राज्यातील सर्व 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी आणि निकाल जाहीर होणार आहेत.

या निवडणुका मुंबई, ठाणे, कल्याण–डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर, मीरा–भाईंदर, वसई–विरार, पुणे, पिंपरी–चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, सांगली–मिरज–कुपवाड, नाशिक, मालेगाव, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, नांदेड–वाघाळा, परभणी, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, अहिल्यानगर (नगर) आणि पनवेल या 29 महानगरपालिकांमध्ये होणार आहेत. दरम्यान मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने करण्यात येत होता. जोपर्यंत मतदार यादीतील त्रुटी दूर होत नाहीत, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत अशी मागणीही करण्यात येत होती. मात्र आता निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Mahapalika Election Maharashtra, Maharashtra Nagar Palika Election News, Municipal Corporation Election Maharashtra, Maharashtra Mahapalika Election Schedule, Maharashtra Election Voting Date, Maharashtra Election Result Date, Election Commission Maharashtra, Maharashtra Local Body Election, Maharashtra Urban Election News, महाराष्ट्र महापालिका निवडणूक 2026, महाराष्ट्र निवडणूक बातमी, महापालिका निवडणूक तारखा, महाराष्ट्रात महापालिका निवडणूक कधी, महापालिका मतदान तारीख, महापालिका निकाल तारीख, निवडणूक आयोग महाराष्ट्र,

हे पण वाचा Election News: वाठारला ओबीसी जागेवर कुणबी उमेदवार नको, आ. महेश शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची मागणी

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Top 10 Netflix Web Series to Watch Right Now (Feb 2026) Maharashtra kesari 2025 :पृथ्वीराज मोहोळ ६ ७ व्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी (Copy)