JOBS: जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे अशासकीय पदांची भरती

जाणून घ्या, कोणत्या पदासाठी आहे भरती
JOBS :- जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर येथे 1 लिपिक टंकलेखक हे अशासकीय पद मेस्को मार्फत भरावयाचे असून सोलापूर जिल्हयातील माजी सैनिक तसेच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर यांच्या रोजगार पटावर नोंद असलेल्या युध्द विधवा (Battle Casualty) / युध्दजन्य कारणा व्यतिरिक्त दिवंगत झालेल्या (Physical Casualty) सैनिकाच्या विधवा पत्नी यांना प्राधान्य देण्यात येईल.
सदर प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध न झाल्यास माजी सैनिकांच्या विधवा पत्नी या पदासाठी पात्र ठरतील. Typist या पदाकरीता मराठी टंकलेखनाचा वेग दर मिनिटास किमान 30 शब्द असल्याचे वाणिज्य प्रमाणपत्र तसेच महाराष्ट्र शासनाचे MS CIT प्रमाणपत्र धारण केलेले असावे किंवा मराठी टंकलेखन येणे अनिवार्य राहील. तरी सदर संधीचा सोलापूर जिल्यातील माजी सैनिक / युध्द विधवा/माजी सैनिकांच्या विधवा पत्नी यांनी लाभ घ्यावा.
तसेच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर यांचे अधिपत्याखालील सैनिकी मुलांचे वसतिगृह, सोलापूर येथे निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात एकत्रित मानधनावर watchman पहारेकरी-1 पद भरावयाचे आहे. पहारेकरी पदाचा अनुभव असणा-यांना प्राधान्य देण्यात येईल. मानधन रुपये 20886/- प्रतिमहा असेल, तसेच सदरील पद हे निवासी आहे. पहारेकरी पदासाठी नियुक्त झालेल्या उमेदवाराने रात्रीचा पहारा देणे व मुक्कामी रहाणे आवश्यक आहे. पहारेकरी पद हे माजी सैनिक प्रवर्गातून भरावयाचे आहे. सदर पद भरतीसाठी माजी सैनिक यांना प्राधान्य देण्यात येईल. माजी सैनिक उपलब्ध न झाल्यास नागरी जीवनातील उमेदवारांचा विचार केला जाईल.
JOBS तरी वरील दोन्ही पदा साठी सोलापूर जिल्हयातील माजी सैनिकांनी आपले अर्ज सैनिक सेवेची व इतर शैक्षणिक कागदपत्रासह दिनांक 26 जून 2025 पूर्वी या कार्यालयात सादर करावे. दोन्ही पदाकरिता दिनांक 26 जून 2025 रोजी मुलाखती घेण्यात येतील.
कसा करावा अर्ज जाणून घ्या.
आपले अर्ज सैनिक सेवेची व इतर शैक्षणिक कागदपत्रासह (मुळ कागदपत्रे व त्यांची छायांकीत प्रती- 2) सादर करावे. तरी सोलापूर जिल्यातील पात्र व गरजू माजी सैनिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मिलिंद तुंगार (नि) यांनी केले आहे.





