Jarandeshwar Temple :त्यांनी दोन तासात गोळा केल्या ६५० प्लास्टिक बाटल्या

Jarandeshwar Temple : निसर्गप्रेमी दोन प्राध्यापकांची ‘जरंडेश्वर’ वर स्वच्छता मोहीम
Jarandeshwar Temple शिक्षक किंवा प्राध्यापक हे आपल्या शिकवणुकीतून फक्त विद्यार्थीच घडवत नाहीत तर सक्षम समाजनिर्मिती करण्यात मोलाची जबाबदारी पार पाडतात. समाज निर्मितीची ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन आपल्या कृतीतून श्री क्षेत्र जरंडेश्वर मंदिर येथे शनिवारी स्वच्छता उपक्रम राबवून प्रा.संभाजीराव कदम महाविद्यालयाच्या डॉ.कमलसिंग क्षत्रिय आणि प्रा.सुर्यकांत अदाटे यांनी आपल्या प्रेरणादायक कृतीने समाजापुढे एक आदर्श ठेवलेला आहे.
श्री क्षेत्र जरंडेश्वर मंदिर Jarandeshwar Temple येथे आषाढ महिन्यातील शेवटच्या शनिवारी डॉ. कमलसिंग क्षत्रिय व प्रा. सूर्यकांत अदाटे यांनी स्वतः मंदिर परिसरात जवळपास दोन तास स्वच्छता करून ६५० पेक्षा जास्त पाणी बॉटल आणि प्लॅस्टिक रॅपर गोळा करून तब्बल सात प्लॅस्टिक पोती भरून प्लॅस्टिक संकलन करत आणि स्वच्छतेचा संदेश देत आपल्या कृतीतून समाजापुढे एक आदर्श वस्तुपाठ घालून दिलेला आहे.
श्री क्षेत्र जरंडेश्वर डोंगर मंदिरात श्रावणात shravan mas तसेच प्रत्येक शनिवारी भक्तगण श्री जरंडेश्वर मारुतीरायाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. येताना पाणी बॉटल आणि प्लॅस्टिक असणाऱ्या कुरकुरे तसेच खाद्यपदार्थ रॅपर आणत असतात आणि खाऊन किंवा पाणी पिऊन बॉटल तेथेच टाकत असतात. त्यामुळे आषाढ महिन्यातील शेवटच्या शनिवारी पासूनच या परिसरातील स्वच्छता ही आपली सर्वांची जबाबदारी असून आपण त्यात पुढाकार घेतला पाहिजे या भुमिकेतून डॉ. कमलसिंग क्षत्रिय व प्रा. सूर्यकांत अदाटे यांनी मंदीर परिसरातील सात पोती प्लॅस्टिक संकलन केले आणि शनिवारी जरंडेश्वर डोंगरावर आलेल्या भक्तगनांना त्यांनी स्वच्छतेच्या महत्त्वावर भाष्य करत सामाजिक योगदानाची जाणीव करून दिली.
डॉ. कमलसिंग क्षत्रिय व प्रा. सूर्यकांत अदाटे यांनी या अगोदर सातत्याने प्रा.संभाजीराव कदम महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्र सेना यांच्या माध्यमातून जरंडेश्वर डोंगरावर स्वच्छता तसेच प्लॅस्टिक संकलनाचे कार्य केलेले आहे. या दोन्ही प्राध्यापकांना सामाजिक कार्याची आवड असून हे दोघेही पर्यावरणप्रेमी तसेच गडसंवर्धन कार्यात अग्रेसर असतात. स्वच्छता जागृतीसाठी त्यांनी जरंडेश्वर डोंगर केंद्रस्थानी मानून या श्री क्षेत्र जरंडेश्वर डोंगर स्वच्छता करण्याचे ध्येय ठेवलेले आहे. या ठिकाणी श्री जरंडेश्वर जीर्णोद्धार समिती आणि पाडळी येथील जेष्ठ नागरिक संघसुद्धा हिरीरीने कार्यरत असतो. त्यांचेही सहकार्य यांना लाभत असते.
भक्ती आणि शक्तीचे प्रतिक असणाऱ्या मारुतीरायाच्या दर्शनासाठी श्री क्षेत्र जरंडेश्वर डोंगर श्रावणात सर्वांनाच खुणावत असतो. ‘स्वच्छता हीच सेवा’ या भावनेतून श्री क्षेत्र जरंडेश्वर मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नसून सामाजिक परिवर्तनाचे केंद्रही होऊ शकते, याची जाणीव जनतेला झाली पाहिजे. त्यामुळे येणाऱ्या श्रावणातील प्रत्येक शनिवारी स्वच्छतेचा आणि प्लॅस्टिक मुक्तीचा संदेश देणार असल्याचे डॉ. कमलसिंग क्षत्रिय व प्रा. सूर्यकांत अदाटे यांनी सांगितले.
श्रावणातील शनिवारी जरंडेश्वर दर्शनासाठी होणारी भक्तभाविकांची गर्दी लक्षात घेता या स्वच्छतेच्या आणि प्लॅस्टिकमुक्तीच्या सामाजिक उपक्रमात जरंडेश्वर डोंगरावर येणाऱ्या स्थानिक नागरिक, भक्तगण, सामाजिक संस्था सहभागी होऊन जरंडेश्वर डोंगर कायमचा प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी त्यांनी आवाहन केलेले आहे.
#Jarandeshwar Temple #Jarandeshwar Temple Satara #Jarandeshwar Temple in Maharashtra #Jarandeshwar #Jarandeshwartrek #Jarandeshwar yatra in shravan





