Health News :वाठार स्टेशन येथे आरोग्य महामेळाव्याला नागरिकांचा अपूर्व प्रतिसाद

Health News :वाठार स्टेशन येथे आरोग्य महामेळाव्याला नागरिकांचा अपूर्व प्रतिसाद

Health News : डॉ . विश्वनाथ चव्हाण यांचा गरजूं रुग्णांसाठी मदतीचा हात

Health News :उत्तर कोरेगाव परिसरातील सुप्रसिद्ध बाजारपेठ वाठार स्टेशन आणि परिसरातील १५ गावांचा एकत्रित शिबिर नुकतेच श्री वागदेव विद्यालयात भव्य आरोग्य महामेळावा संपन्न झाला. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ आणि अनुभवी डॉ. विश्वनाथ हिरानाथ चव्हाण (एमबीबीएस, एमडी मेडिसिन, डिप्लोमा इन इकार्डियोग्राफी) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या आरोग्य महामेळाव्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या आरोग्य महामेळाव्याने परिसरातील अनेक गरजूंना आरोग्य संजीवनी दिली. या आरोग्य महामेळाव्यात नागरिकांच्या मोफत प्राथमिक आरोग्य तपासण्या, मोफत सल्ला आणि मार्गदर्शन देण्यात आले. हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि इतर आजारांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. तज्ञांच्या मार्गदर्शनामुळे नागरिकांना त्यांच्या आरोग्याविषयी अचूक माहिती मिळाली.
आरोग्य महामेळाव्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल बोलताना डॉ. विश्वनाथ हिरानाथ चव्हाण सर म्हणाले, “उत्तर कोरेगाव परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे हे आमच्या टीमचे परम कर्तव्य आहे. चव्हाणवाडी (फलटण) हे जसे माझे गाव आहे तसेच येथील विखळे हे सुद्धा मी माझेच गाव समजतो कारण ते माझ्या वडिलांचे आजोळ आहे. या आरोग्य महामेळाव्याला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहून माझ्या सर्वच टीमला खूप आनंद झाला. भविष्यातही असे आरोग्य महामेळावे समर्थ वागदेव महाराजांच्या पावनभूमीत आयोजित करून तळागाळातील गरजूंना मदत करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असेल. नागरिकांनी आता आपल्या आजारांपासून स्वतःला मुक्त करून शारीरिक व मानसिकदृष्ट्या कणखर बनून नवी पिढी घडवायची आहे.”
आरोग्य महामेळाव्याचा लाभ घेतलेल्या नागरिकांनी डॉ. चव्हाण सर आणि त्यांच्या टीमचे मनःपूर्वक आभार मानले. “अशा आरोग्य महामेळाव्यांमुळे आम्हाला आमच्या आरोग्याची काळजी घेण्यास मदत होते. सध्या धान्य काढणीच्या कामांमुळे काही नागरिकांना उपस्थित राहता आले नाही तरी भविष्यात तज्ञ डॉक्टरांच्या बहुमूल्य वेळेचा उपयोग उपयुक्त सामाजिक आरोग्य महामेळाव्यांमधून नक्कीच होईल,” अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.
या आरोग्य महामेळाव्यात शेकडो नागरिकांनी सहभागी होऊन आपल्या आरोग्याची तपासणी केली. यामुळे नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता वाढण्यास मदत झाली. आरोग्य महामेळाव्यात सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. स्मिता जाधव (आदित्य हॉस्पिटल, पोवई नाका, सातारा) यांनी महिलांची मोफत आरोग्य तपासणी केली. गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून वाचण्यासाठी ६५% सवलतीत पॅप स्मिअर तपासणीची सुविधा दिली. मात्र, महिलांचा सहभाग आणखी वाढवता आला असता, असे त्यांनी सांगितले. महिलांनी आता गर्भाशय संबंधित समस्यांना आपल्या तज्ञांशी सल्लामसलत करून निवारण करायचे आहे, असे त्यांनी प्रतिपादन केले.
सातारा जिल्ह्यातील सुप्रसिद्ध त्वचा रोग तज्ञ डॉ. अण्णासाहेब कदम (कदम स्कीन क्लिनिक) यांनी नागरिकांना अशा आरोग्य महामेळाव्यात सहभागी होण्याचे महत्त्व सांगितले, जेणेकरून आजारांची तीव्रता वाढण्यापूर्वीच त्यांना वेळीच रोखता येईल. डॉ. चव्हाण यांच्या दूरदृष्टीमुळे उत्तर कोरेगाव परिसरातील लोकांच्या आरोग्यात सकारात्मक बदल घडेल, असे त्यांनी नमूद केले. तसेच त्वचा रोग व केसांच्या निगडीत आजारांपासून मुक्त होण्याकरिता सातारा जिल्ह्यातील आधुनिक तंत्रज्ञान कदम स्कीन क्लिनिक येथे उपलब्ध आहे, त्याचा नागरिकांनी सवलतीत जास्तीत जास्त प्रमाणात फायदा घ्यावा, असे आवाहन केले.
प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व श्री. गणेश चव्हाण यांनी वाठार स्टेशन परिसरातील लोकांना अशा उच्चशिक्षित तज्ञांच्या ज्ञानकौशल्य अनुभवाचा निश्चितच भविष्यात फायदा होणार आहे, असे सांगितले. त्यांनी सर्व डॉक्टरांचा सत्कार व अभिनंदन केले.
आरोग्य महामेळाव्याचे उद्घाटन वाठार स्टेशनच्या सरपंच सौ. सीमा गणेश चव्हाण आणि श्री. गणेश चव्हाण, श्री. महेश गांधी, श्री. अभिजीत निकम यांनी तज्ञांसह दीपप्रज्वलन करून केले. एमक्यूअर फार्माचे हेड मॅनेजर श्री. अमोल बारटक्के, टेरिटरी मॅनेजर श्री. मोहम्मद अली मुलाणी, एमजे फार्माचे मॅनेजर श्री. इरफान शेख, सिप्ला फार्माचे हेड मॅनेजर श्री. वैभव पवार, मॅनेजर श्री. अभिजीत शिंदे, युनिडस् हेल्थकेअर फार्माचे श्री. सोमनाथ माने आणि सौ. शीतल पवार (वाठार हेल्थ स्टेशन आणि महाराष्ट्र मल्टीस्पेशालिटी क्लिनिक व्यवस्थापक) यांच्यासह अनेक मान्यवर, नागरिक आणि रुग्ण उपस्थित होते.

Prabhukrupa Automobiles

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Top 10 Netflix Web Series to Watch Right Now (Feb 2026) Maharashtra kesari 2025 :पृथ्वीराज मोहोळ ६ ७ व्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी (Copy)