Ganesh Visarjan कोरेगाव शहरांत विसर्जनासाठी नो डॉल्बी

Ganesh Visarjan कोरेगाव शहरांत विसर्जनासाठी नो डॉल्बी

Ganesh Visarjan ग्रामीण भागातही लोकवाद्यांना गणेश मंडळांची पसंती

No Dolby In Ganesh Visarjan पोलिसांच्या आवाहनला गणेश मंडळाचा प्रतिसाद

Ganesh Visarjan लाडक्या गणपती बाप्पाचं विसर्जन यंदाच्या वर्षी डॉल्बी न लावता पारंपारिक पद्धतीने करण्याचा निर्णय कोरेगाव शहरातील गणपती मंडळांनी घेतला असून उद्या अनंत चतुर्थीच्या दिवशी संपूर्ण कोरेगाव शहरात डॉल्बीमुक्त मिरवणुका निघणार आहेत साहजिकच यामुळे पहिल्यांदाच गणपती बाप्पाचे विसर्जन ढोल ताशा आणि पारंपारिक वाद्यांच्या तालावर होणार आहे यानिमित्ताने तरुण भारत ने मांडलेल्या डॉल्बीमुक्त गणेश मिरवणुका या मोहिमेला गणेश मंडळ आणि प्रशासन यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे

Ganesh Visarjan कोरेगाव तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या आणि तालुक्यातील मोठ्या बाजारपेठेचे केंद्र असलेल्या कोरेगाव शहरात एकूण 23 गणपती मंडळ आहेत या गणपती मंडळांचा पुढाकार नेहमीच सामाजिक कामात असतो वृक्षारोपण रक्तदान शिबिर आरोग्य शिबिरे नेतृत्व शिबिरे नेत्र चिकित्सा शिबिरे संकटकाळात मदतीचा हात पुढे करण्यातही ही मंडळे अग्रेसर असतात यावेळी या मंडळांनी या सामाजिक उपक्रमासोबत कीर्तन सेवा महिलांचे प्रबोधनाचे कार्यक्रम व गणपती बाप्पा साठी जिवंत देखावे असे उपक्रम राबवले आहेत यंदा यापुढे जात अनंत चतुर्दशी दिवशी गणपती बाप्पाची मिरवणूक ही डॉल्बी विरहित काढण्याचा निर्धार शहरातील गणेश मंडळांनी केला असून कोरेगाव पोलीस स्टेशन ने एकाही गणपती मंडळाला डॉल्बी वाजवण्याची अधिकृत परवानगी दिली नाही किंवा तशी परवानगी कोणत्याही मंडळाने मागितलेली नाही त्यामुळे कोरेगाव शहरात यंदा डॉल्बी पूर्णपणे झाल्याचे चित्र दिसणार आहे अनेक मंडळांनी गणेश चतुर्थीच्या विसर्जन मिरवणुका भव्य काढण्याचा निर्धार केला आहे त्या मिरवणुका पूर्णपणे ढोल ताशा लेझीम हलगी अशा पारंपारिक वाद्याच्या तालावर निघणार आहेत त्यामुळे ढोल ताशा पथकांना मागणी वाढली असून अनेक मंडळांनी या ढोल ताशा मंडळांना विसर्जन मिरवणुकीसाठी आमंत्रित केले आहे या मंडळात साठी व डॉल्बी मालकांसाठी कोरेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी गणेशोत्सवापूर्वीच बैठका आ बैठका आयोजित करून प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली होती. नियमबाह्य डॉल्बी वाजवल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला होता तसेच डॉल्बीची मर्यादाही स्पष्ट केली होती त्यामुळे यंदा कोणत्याही मंडळाने अद्याप तरी डॉल्बी वाजवण्याची परवानगी मागितलेली नाही गणेश आगमनाची वेळी तीन मंडळांनी डॉल्बी वाजवली होती त्या डॉल्बी धारकांवर पोलिसांनी कारवाई केली होती त्यामुळे आता मात्र कोणीही डॉल्बी वाजवण्याचा अट्टाहास केलेला नाही साहजिकच डॉल्बी मालकांनीही प्रशासनाच्या भूमिकेला सहकार्य केलं असून यंदा कोरेगाव डॉल्बीमुक्त मिरवणुका पाहणार आहे.

——————————————————————————————————————

कोरेगावात विसर्जन मिरवणुका साठी डॉल्बी नाहीत- पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ 

PI Ballal

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार डॉल्बीधारकांना डॉल्बी वाजवण्याच्या मर्यादा व दुष्परिणाम बैठक घेऊन स्पष्टपणे सांगितल्या होत्या तसेच नियमाचे उल्लंघन झाल्यास दहा लाखापर्यंत दंड होईल याची जाणीवही करून दिली होती त्यामुळे या गणेशोत्सवात डॉल्बी वाजवण्याचे कोणत्याही मंडळांनी परवानगी मागितली नाही ही बाब कोरेगाव शहरासाठी चांगली असून यंदा गणेश मंडळांनी प्रशासनाला पारंपारिक पद्धतीने मिरवणुका काढून सहकार्याची भूमिका घेतली आहे कोरेगाव शहरासोबतच कोरेगाव हद्दीतील कोरेगाव हद्दीतील 196 मंडळांनी डॉल्बी मुक्तीचा निर्धार केला आहे.

सोळा वर्षांपासून डॉल्बी विरहित मिरवणूक

श्रीराम गणेश मंडळाचे सोळा वर्षापासून डॉल्बी मुक्तीची परंपरा कोरेगाव शहरातील सुभाष नगर मधील श्रीराम गणेशोत्सव मंडळ हे गेल्या सोळा वर्षापासून डॉल्बी विरहित मिरवणूक काढत आहे आमच्या मंडळांनी नेहमीच पारंपारिक वाद्यांना प्राधान्य दिला आहे ढोल ताशा वरच आम्ही नेहमी मिरवणूक काढतो तर कधीकधी अगदी साधेपणाने बाप्पाला निरोप देतो गणपती उत्सवात मिरवणुकीपेक्षा सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवण्यावर श्रीराम गणेश मंडळाचा भर असतो व त्याला मंडळातील सर्व कार्यकर्त्यांचा सहकार्याचा तभार असतो तरुण भारत ने डॉल्बीमुक्तीची मोहीम सुरू केली त्याचं कौतुक असून आमच्या मंडळाच्या वतीने नेहमीच तरुण भारतच्या भूमिकेला पाठबळ राहील.

श्री गणेश धनावडे अध्यक्ष श्रीराम गणेश मंडळ सुभाष नगर कोरेगाव


कोरेगाव ग्रामीण भागातील ६२ गावातही डॉल्बी नाहीच

कोरेगाव तालुक्यात सर्वत्र गणेशोत्सव भक्ती बाबत साजरा होत असताना यंदा तालुक्यातील गणपती मंडळांनी डॉल्बीमुक्त गणेशोत्सवाची वाट चोखाली आहे गणपती मंडळांनी उद्याच्या विसर्जन मिरवणुका या ढोल ताशा व हलगी सारख्या पारंपारिक वाद्यावरच काढण्याचा निर्धार केल्यामुळे यंदा प्रथमच तालुका डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करीत आहे 

गणेशोत्सवाच्या काळात वाढते दोन्ही प्रदूषण लक्षात घेता पोलीस प्रशासनाने कोरेगाव तालुक्यातील सर्वच गणेश मंडळांना डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरे करण्याचे आव्हान केले होते त्यानुसार कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कोरेगाव शहर ग्रामीण भागातील ६२ गावांनी यंदा गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये नो डॉल्बी असा संकल्प केला आहे त्यामुळे कोरेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्वच गावात पारंपारिक पद्धतीने मिरवणुका निघणार आहेत पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 62 गावांपैकी 20 गावांनी एक गाव एक गणपती योजनेत सहभाग घेतला आहे तसेच एकूण 196 गणपती मंडळांची नोंद झाली आहे यापैकी 23 गणपती मंडळांनी सातव्या दिवशीच गणपतीचे विसर्जन केले आहे उर्वरित मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुका आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी निघणार आहेत गणेश मंडळांनी यंदा न्यायालयाच्या आदेशाचा मान ठेवून डॉल्बीमुक्त गणेश साजरा करावा असे आवाहन कोरेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी केले होते तसेच गणेश मंडळ व डॉल्बीधारक यांच्या बैठका घेऊन दिशा निर्देश दिले होते डॉल्बीचे सामाजिक दुष्परिणाम लक्षात घेता यंदा पोलीस प्रशासनाने केलेल्या आव्हानाला कोरेगाव शहरासह ग्रामीण भागातील सर्वच गणेश मंडळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून ग्रामीण भागातही सातारारोड, किन्हई, जळगाव, एकसळ, जळगाव अशा हद्दीतील मोठ्या गावात डॉल्बीमुक्त आगमन मिरवणूक झाल्या तसेच विसर्जन मिरवणूक ही यंदा पारंपारिक वाद्याच्या तालावर निघणार आहेत त्यामुळे ढोल ताशा हलगी संबळ वादनाची मंडळी आमंत्रित केली असून विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने ग्रामीण भागात लोककला जपली जाणार आहे.

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Top 10 Netflix Web Series to Watch Right Now (Feb 2026) Maharashtra kesari 2025 :पृथ्वीराज मोहोळ ६ ७ व्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी (Copy)