बँकिंग क्षेत्रातील सुवर्णपर्व ; छत्रपती संभाजी महाराज पतसंस्थेचा ३५ वा वर्धापनदिन

बँकिंग क्षेत्रातील सुवर्णपर्व ; छत्रपती संभाजी महाराज पतसंस्थेचा ३५ वा वर्धापनदिन

१ जानेवारी २०२६ रोजी मुख्यालयात विविध कार्यक्रम

मार्चनंतर १९३ कोटींची वाढ, पतसंस्थेची १५५२ कोटी संमिश्र व्यवसायाची भरारी

संस्थापक रामभाऊ लेंभे यांनी दिली माहिती

प्रकाश राजे सातारा/ प्रतिनिधी,
पश्चिम महाराष्ट्रात सहकार क्षेत्रात विश्वासार्ह नाव म्हणून ओळख असलेल्या छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेने आर्थिक वर्ष २०२५ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत मोठी झेप घेतली आहे. मार्च २०२५ नंतर संस्थेच्या एकूण व्यवसायात तब्बल १९३ कोटी रुपयांची वाढ झाली असून, डिसेंबर २०२५ अखेर संस्थेचा संमिश्र व्यवसाय १५५२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. ही माहिती संस्थेचे संस्थापक व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक रामभाऊ लेंभे यांनी दिली.

श्री रामभाऊ लेंभे- संस्थापक छत्रपती संभाजी महाराज पतसंस्था
श्री रामभाऊ लेंभे- संस्थापक छत्रपती संभाजी महाराज पतसंस्था

संस्थेच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना रामभाऊ लेंभे यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, १९८९ साली छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३०० व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक येथे अत्यल्प भांडवलातून पतसंस्थेची स्थापना करण्यात आली. सुरुवातीच्या काळात अनेक अडचणी आल्या, मात्र अभ्यासू संचालक मंडळ, प्रामाणिक कर्मचारी, सभासद आणि ग्राहकांचा वाढता विश्वास यामुळे संस्थेने सातत्याने प्रगती साधली.

गेल्या ३६ वर्षांच्या कालावधीत संस्थेने शाखाविस्ताराबरोबरच तंत्रज्ञानाचा स्वीकार करत आधुनिक बँकिंग सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. सध्या संस्थेच्या ८ विभागीय कार्यालयांअंतर्गत ५६ शाखा कार्यरत असून, यातील निम्म्याहून अधिक शाखा ग्रामीण भागात आहेत. याशिवाय २६ शाखा स्वमालकीच्या इमारतींमध्ये सुरू असून, सर्व शाखांचे सीबीएस प्रणालीद्वारे संगणकीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे ग्राहकांना डिजिटल बँकिंग, मोबाईल बँकिंग व जलद सेवा मिळत आहेत.

३१ डिसेंबर २०२५ अखेर संस्थेची आर्थिक स्थिती भक्कम असून सभासद संख्या ७८,७४१ इतकी आहे. संस्थेच्या ठेवी ८५२ कोटी रुपये, येणे कर्ज ७०० कोटी रुपये तर गुंतवणूक २१४ कोटी रुपये इतकी आहे. खेळते भांडवल ९७० कोटी रुपये असून, संस्थेचा एकूण संमिश्र व्यवसाय १५५२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. स्वनिधी ८० कोटी रुपये असून, संस्थेने ४ कोटी रुपयांचा नफा नोंदवला आहे. सोनेतारण कर्ज ३६५ कोटी रुपये तर सोनेतारण व ठेवतारण कर्ज एकूण ४१४ कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे.

दरम्यान, छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेचा ३६ वा वर्धापनदिन गुरुवार, दिनांक १ जानेवारी २०२६ रोजी साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले असून, सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व सभासद, ग्राहक व नागरिकांनी तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे संस्थापक रामभाऊ लेंभे, चेअरमन डॉ. सोपानराव चव्हाण, उपाध्यक्ष श्रीकांत शेटे तसेच संचालक मंडळाने केले आहे.

हे पण वाचा Gold Rate Today सोने-चांदीच्या भावात मोठी घसरण; भारतीयांचे सोन्याचे प्रेम कायम

हे पण वाचा Dhurandhar 2025 धुरंधरचा धडाका! 690 कोटींचा ऐतिहासिक विक्रम

Sambhaji Bank

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Top 10 Netflix Web Series to Watch Right Now (Feb 2026) Maharashtra kesari 2025 :पृथ्वीराज मोहोळ ६ ७ व्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी (Copy)