BIG NEWS SATARA :पिंपोडे बुद्रुक येथील सकल माळी समाजाचा रामराजे गटाला रामराम

BIG NEWS SATARA :पिंपोडे बुद्रुक येथील सकल माळी समाजाचा रामराजे गटाला रामराम

BIG NEWS SATARA उत्तरेतील वर्चस्वाला धक्का


पिंपोडे बुद्रुक :
फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील व उत्तर कोरेगाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील गांव अशी ओळख असलेल्या पिंपोडे बुद्रुक येथील सकल माळी समाजाने विधान परिषदेचे माजी सभापती आ.रामराजे ना.निंबाळकर यांच्या गटाला रामराम करीत राज्याचे ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत दसऱ्याच्या मुहूर्तावर भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
सध्या फलटण तालुक्यासह फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.दोन्ही निंबाळकरांचे राजकीय मनोमिलन होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेले पाहायला मिळत आहे. मात्र तरीही राजेगटाला लागलेली गळती थांबत नसल्याचे दिसून येत आहे. माजी आ.दिपक चव्हाण आणि विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे यांचे उत्तर कोरेगाव तालुक्यावर नेहमीच प्राबल्य राहिले आहे.जवळपास सर्वच गावातील स्थानिक नेतेमंडळी ही राजेगट म्हणूनच कार्यरत आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या फुटीनंतर काही शिलेदारानी उघडपणे रामराजे विरोधी भूमिका घेतली असली तरी अजूनही राजेंनी आपला गड शाबूत ठेवला होता.सद्यस्थितीत मात्र सरकार विरोधी भूमिका घेण्यामुळे गावगाड्याच्या विकासकामांवर परिणाम होण्याची शक्यता गृहीत धरून अनेकजण आपली राजकीय कूस बदलण्याच्या विचारात असल्याचे दिसू लागले आहे.
आ.रामराजे गेल्या एक वर्षांहून अधिक काळ झाला उत्तर कोरेगाव तालुक्यात फारसे आले नाहीत.त्याचबरोबर ते कोणतीही राजकीय भूमिका जाहीर करीत नसल्याने कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत.

माजी खासदार रणजितसिंह ना.निंबाळकर आणि त्यांच्या पत्नी मात्र सातत्याने सव्वीस गावातील कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहेत.त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांचे बळ वाढू लागले आहे.
गत चार दिवसांपूर्वीच्या चाफ्याने अजून बहरने सोडले नाही या आ.रामराजेंच्या व्हाट्सऍप स्टेट्सने राजकीय कोलाहल निर्माण केला असला तरी दुसऱ्या बाजूला गटाला लागलेली गळती थांबत नसल्याचे अधोरेखित होत आहे.

दसऱ्याच्या मुहूर्तावर पिंपोडे बुद्रुक येथील सकल माळी समाजाचे कार्यकर्ते गणपत गार्डी,उत्तम गार्डी,विलास गार्डी,अविनाश यादव, दिपक यादव, उमेश गार्डी, रमेश कुदळे, अमोल यादव, योगेश जायकर, नंदकुमार गार्डी, किरण यादव, सुशांत गार्डी, कृष्णकांत गार्डी, सौरभ गार्डी, सूरज गार्डी या कार्यकर्त्यांनी आ.रामराजे गटाला रामराम करीत माजी खा.रणजितसिंह ना.निंबाळकर यांचे नेतृत्व स्वीकारीत मंत्री ना.जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत दहिवडी येथील पक्ष कार्यालयात भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.हा पक्षप्रवेश घडवून आणण्यासाठी भाजपाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य योगेश कर्पे यानी मेहनत घेतली.

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Top 10 Netflix Web Series to Watch Right Now (Feb 2026) Maharashtra kesari 2025 :पृथ्वीराज मोहोळ ६ ७ व्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी (Copy)