BIG NEWS: राष्ट्रवादीने भाकरी फिरवली, जयंत पाटील यांचा राजीनामा, शशिकांत शिंदे होणार नवे प्रदेशाध्यक्ष Shashikant Shinde

BIG NEWS: राष्ट्रवादीने भाकरी फिरवली, जयंत पाटील यांचा राजीनामा, शशिकांत शिंदे होणार नवे प्रदेशाध्यक्ष Shashikant Shinde

Shashikant Shinde स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणूका समोर, राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली असून राष्ट्रवादी शरदचंद पक्षाच्या प्रदेक्षाध्यक्ष पदाचा जयंत पाटील यांनी राजीनामा दिला असून शशिकांत शिंदे हे नवे प्रदेशाध्यक्ष होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीने मोर्चेबांधणी करण्यासाठी नेतृत्वाची भाकरी फिरवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे .

स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणूकाचा कार्यक्रम समोर असल्याने प्रत्येक पक्षाने संघटना पातळीवर बदल केले आहेत. नव्या नेतृत्वांना संधी देऊन पक्षासाठी नवे चेहरे पुढे आणले जात आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातही नेतृत्व बदलाच्या चर्चा गेल्या काही महिन्यापासून सुरू होत्या. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने लोकसभा निवडणुकीत भरघोस यश मिळवले त्यानंतर जयंत पाटील राजीनामा देणार अशा चर्चा सुरु झाल्या, मात्र विधानसभा निवडणुका समोर असल्याने शरद पवार यांच्या सूचनेनुसार जयंत पाटील यांच्याकडेच नेतृत्वाची धुरा कायम राहिली. मात्र नेतृत्व बदलाची चर्चा पुन्हा सुरु झाली.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात खुद्द जयंत पाटील यांनीच याबाबत राजीनामा बाबत सूतोवाच करीत शरद पवार यांनी मला बरच काही दिले, सात वर्ष मी राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष आहे आपणास या पदातून मुक्त करण्याची व नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचे आवाहन केले होते त्यानंतर पुन्हा राष्ट्रवादीत भाकरी फिरणार अशी चर्चा सुरु झाली. कार्यकर्त्यामधूनही याबाबत चर्चा होत्या.

अखेर जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असून नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे यांचे नाव निश्चित झाले असून मंगळवारी ते नेतृत्वाचा पदभार स्वीकारतील अशी सूत्रांची माहिती आहे. सातारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष असताना शशिकांत शिंदे Shashikant Shinde यांची कामगिरी अव्वल ठरली होती तसेच शरद पवार यांचे अतिशय निष्ठावान म्हणून त्यांच्या निवडीकडे पाहिले जाते.

माझ्या नावाची चर्चा हे माझे भाग्य : शिशिकांत शिंदे

राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत असतात पक्षची हि प्रक्रिया १ ५ तारखेला अधिवेशनात नवा प्रदेशष्यक्ष ठरेल, पवार साहेबासारख्या नेतृत्वाच्या पक्षाची जबाबदारी मिळाली तर हे माझं आणि सातारा जिल्ह्याचे भाग्य मी समजतो, नाव चर्चेत आहे निर्णय पक्षाचा आहे संधी मिळाली तर आनंद वाटेल अशी प्रतिक्रिया शशिकांत शिंदे Shashikant Shinde यांनी दिली.

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Top 10 Netflix Web Series to Watch Right Now (Feb 2026) Maharashtra kesari 2025 :पृथ्वीराज मोहोळ ६ ७ व्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी (Copy)