BIG NEWS :रामराजे गटाला राम राम; उत्तर कोरेगावातील शेकडो कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल.

BIG NEWS :रामराजे गटाला राम राम; उत्तर कोरेगावातील शेकडो कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल.

BIG NEWS :जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच पंचायत समिती सभापती भाजपचाच होईल – आ.श्रीकांत भारतीय

BIG NEWS : भाजप हा जनतेच्या विश्वासाचा पक्ष आहे. केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या काही वर्षांत विकासाचे अनेक उपक्रम राबवले असून, हे कार्य जनतेपर्यंत पोहोचवणे ही प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे. असे मत विधान परिषदेचे आमदार श्रीकांत भारतीय यांनी व्यक्त केले.
भारतीय जनता पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र निवडणक सह समन्वयक अमित चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली
उत्तर कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन येथे आयोजित भारतीय जनता पक्षाचा मेळावा आणि पक्षप्रवेश कार्यक्रमात शेकडो कार्यकर्त्यांनी रामराजे गटाला राम राम ठोकत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी भाजप विधान परिषदेचे सदस्य आमदार श्रीकांत भारतीय, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्या प्रियाताई महेश शिंदे, जयकुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश करण्यात आले.

कार्यक्रमात बोलताना आमदार श्रीकांत भारतीय म्हणाले, “देश बदलतोय तसं उत्तर कोरेगावही बदलतोय. भाजप हा जनतेच्या विश्वासाचा पक्ष आहे. केंद्र व राज्य शासनाने राबवलेले विकासाचे उपक्रम कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहोचवावेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बूथ स्तरावर संघटन बळकट करणे अत्यंत आवश्यक आहे.” स्थानिक स्वराज्य संस्थेत कोरेगाव तालुक्याचा सभापती तसेच जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचाच असेल अशी आशा व्यक्त केली.

या कार्यक्रमात वाठार स्टेशन, पिंपोडे बुद्रुक, दहीगाव, तळीये, सोळशी, नांदवळ, रणदुल्लाबाद, चौधरवाडी, आणि सोनके या गावांमधील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत भाजपमध्ये प्रवेश केला.

यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष दीपक पिसाळ, फलटण तालुका अध्यक्ष अमित रनवरे, उद्योजक राजेंद्र घोरपडे, उद्योजक यशवंत पवार, भरत लोंढे, माजी उपसरपंच सचिन जाधव, गणेश लोंढे,ज्ञानेश्वर लोंढे, खुशाल वाघ,मंगेश शितोळे,राजेश काळोखे, नितीन चव्हाण,अभिजीत जाधव, क्रांतिवीर उर्फ सनी भोईटे,वाठार व परिसरातील भाजपाचे स्थानिक नेते, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमित चव्हाण यांनी केले, तर आभार कुमार भोईटे यांनी केले.

jayhind acadamy
hotel Darbar
hotel Darbar

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Top 10 Netflix Web Series to Watch Right Now (Feb 2026) Maharashtra kesari 2025 :पृथ्वीराज मोहोळ ६ ७ व्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी (Copy)