Bhimashankar Temple :सरकारचा मोठा निर्णय, भीमाशंकरचा होणार कायापालट

Bhimashankar Temple :सरकारचा मोठा निर्णय, भीमाशंकरचा होणार कायापालट

₹288.17 कोटींच्या श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्यास मान्यता; shri Bhimashankar temple

तातडीने अंमलबजावणीचे निर्देश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्या’बाबत बैठक संपन्न झाली. बैठकीत श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखडा (कुंभमेळा 2027 – गर्दी व्यवस्थापन व इतर सोयीसुविधा) ₹288.17 कोटींच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश दिले. या निर्णयामुळे shri Bhimashankar temple चा कायापालट होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले Bhimashankar Temple बाबत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, श्री क्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक आणि पर्यटक येतात, त्यांना केंद्रबिंदू ठेऊन येथे विविध दर्जेदार सुविधा विकसित कराव्यात. कुंभमेळा सुरू होण्यापूर्वी श्री क्षेत्र भीमाशंकरच्या विकासाचे काम पूर्ण करावयाचे आहे, त्यादृष्टीने विकास आराखड्याच्या अंमलबजावणीचा कालबद्ध कार्यक्रम तयार करावा, टाइमलाईन ठरवून काम सुरू करण्यात यावे.

मोठा निधी, असा होणार Bhimashankar Temple चा कायापालट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भीमाशंकर परिसराला लाभलेल्या नैसर्गिक सृष्टीसौंदर्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन येथे व्यापक प्रमाणात ‘इको टुरिझम’ संकल्पना विकसित करण्यात यावी. मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या वनराईचा उपयोग करून वनभ्रमण पथ तयार करावा. त्याचसोबत पर्यटक, भाविकांसाठी रोपवेची सुविधा विकसित करावी. निगडाळे येथे पर्यटकांसाठी सोयीच्या ठरणाऱ्या सर्व सुविधा — हॉटेल, रेस्टॉरंट त्याचसोबत इच्छुकांसाठी निवास सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. भीमाशंकर येथील दळणवळण सुविधा, वाहतूक मार्ग, अंतर्गत रस्ते यांच्या विकासास प्राधान्य द्यावे. तसेच येथे हेलीपॅड सुविधा उपलब्ध करून देण्याचेही नियोजन करावे.

या परिसराचा विकास करताना स्थानिक व्यावसायिक, दुकानदारांना नवीन दुकाने द्यावीत. तसेच राजगुरुनगर-तळेघर-भीमाशंकर महामार्ग हा सुरळीत वाहतूक व्यवस्थेसाठी उत्तम पर्याय आहे, त्यादृष्टीने त्याचा विकास करण्यात यावा. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर येथे पर्यटक, भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता चोख सुरक्षा व्यवस्था ठेवावी, त्यासाठी अतिरिक्त पोलीस चौकी या परिसरात उभारावी. तसेच विनाखंड वीज पुरवठा सुविधा उपलब्धतेच्या दृष्टीने वीज उपकेंद्र ही या ठिकाणी द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

यावेळी पुण्याचे जिल्हाधिकारी यांनी श्री क्षेत्र भीमाशंकरच्या विकास कामांबाबत सविस्तर सादरीकरण केले.

श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग Bhimashankar Temple


श्री क्षेत्र भीमाशंकर हे महाराष्ट्रातील एक प्रमुख ज्योतिर्लिंग आहे. भीमाशंकर ज्योतिर्लिंग पुणे जिल्ह्यात, सह्याद्री पर्वतरांगांमध्ये निसर्गरम्य परिसरात वसलेले आहे. भगवान शंकराचे हे सहावे ज्योतिर्लिंग मानले जाते. येथे भीमा नदीचा उगमही आहे. धार्मिक महत्त्वाबरोबरच पर्यावरणीय व जैवविविधतेच्या दृष्टीनेही हे क्षेत्र अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.

या बैठकीला मंत्री ॲड. आशिष शेलार, आ. दिलीप वळसे पाटील आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Top 10 Netflix Web Series to Watch Right Now (Feb 2026) Maharashtra kesari 2025 :पृथ्वीराज मोहोळ ६ ७ व्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी (Copy)