घिगेवाडी गावच्या विकासासाठी सर्वोतपरी सहकार्य करणार- खा. धैर्यशील मोहिते पाटील

घिगेवाडी गावच्या विकासासाठी सर्वोतपरी सहकार्य करणार- खा. धैर्यशील मोहिते पाटील

घिगेवाडी ग्रामस्थांच्यावतीने खा.धैर्यशील मोहिते पाटील यांना विकास कामाबाबत निवेदन…

खा. मोहिते पाटील यांच्या निधीतून साकव पुलाचे काम सुरु…

सातारा/प्रतिनिधी

घिगेवाडी गावाच्या विधायक व विकासात्मक कामासाठी सदैव प्रयत्नशील राहणार अशी माढा मतदारसंघाचे विद्यमान खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी ग्वाही दिली.

घिगेवाडी ता कोरेगाव येथे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी गावाला नुकतीच सदिच्छा भेट दिली. श्रीमंत रामराजे निबाळकर, संजीवराजे निंबाळकर व माजी आमदार दीपक चव्हाण यांचे मार्गदर्शन आणि खा. मोहिते पाटील यांच्या निधीतून 29 लाख रुपये साकव पुला साठी मंजूर होऊन,काम अंतिम टप्प्यात आले आहे. या कामाची माहिती घेऊन गावातील विविध विकास कामाबाबत चर्चा करण्यात आली.

यावेळी सरपंच नारायण सावंत व आदिनाथ सावंत यांनी गावच्या सर्वांगीण ण विकास व कामाबाबत सविस्तर माहिती दिली. जिल्हा परिषदेच्या शाळेची संरक्षक भिंत, गावठाण हद्दवाढ, वसना नदीवरील नवीन बंधारे,नळ पाणीपुरवठा विहिरीसाठी नवीन डीपी व स्वतंत्र सोलर सिस्टिम, ग्रामपंचायत नवीन ग्रामसचिवालय इमारत, श्री काळुबाई मंदिर सभा मंडप, तरुणांसाठी अद्यावत जिम, अंतर्गत रस्ते या विषयावर चर्चा करून ग्रामस्थांच्या वतीने विकास कामाबाबतचे निवेदन खा. पाटील मोहिते पाटील यांना देण्यात आले.

यावेळी गावाच्या कामा संदर्भात सकारात्मक चर्चा करून प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपण प्रयत्नशील व कटिबद्ध राहू असे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मत व्यक्त केले.

यावेळी लोकनियुक्त सरपंच नारायण सावंत, विकास सोसायटीचे चेअरमन धनसिंग सावंत, व्हा. चेअरमन भरत घिगे, आदिनाथ सावंत लक्ष्मण सावंत, तानाजी भोसले, निलेश सावंत, दत्तात्रय साळुंखे घिगेवाडीचे ग्रामस्थ उपस्थित होते.

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Top 10 Netflix Web Series to Watch Right Now (Feb 2026) Maharashtra kesari 2025 :पृथ्वीराज मोहोळ ६ ७ व्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी (Copy)