हरवत चाललेल्या भरतकाम व विणकाम कलेची विद्यार्थ्यांकडून जोपासना

देऊरच्या श्री मुधाईदेवी विद्यामंदिरात प्रदर्शनी
उद्योजक कल्पेश भोज यांचे हस्ते उदघाटन
मोबाईलच्या युगात अनेक कला या दुर्मिळ झाल्या आहेत यापैकी भरतकाम आणि विणकाम अशा हस्तकला या आपल्या लोकसंस्कृती मध्ये घरोघरी जपल्या जायच्या मात्र मोबाईल आणि आधुनिकतेच्या लाटेमध्ये या कला लोप पावत चालल्या अशावेळी याची जोपासना व्हावी यासाठी देऊरच्या श्री मुधाई देवी विद्यालयाने पुढाकार घेतला असून त्यांनी यांचे विशेष प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देऊन ही कला जपण्याचे मोलाचे काम सुरु केले आहे.
श्री मुधाईदेवी विद्यामंदिर व श्री.मारुतराव कृष्णाजी माने कनिष्ठ महाविद्यालय (कला,विज्ञान आणि व्यवसाय शिक्षण विभाग), देऊर यांच्या वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभाचे निमित्ताने संकुलात पारंपरिक मात्र लोप पावत असलेल्या भरतकाम आणि विणकामाच्या कलाकुसरीच्या शालेय विद्यार्थी मित्रांनी तयार केलेल्या साहित्याचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.त्याचे उद्घाटन माजी शालेय विध्यार्थी, पिंपोडे खुर्द निवासी, एस.के.एंटरप्रायझेस लि. पूणेचे प्रो.प्रा. कल्पेश प्रकाश भोज
यांच्या शुभ हस्ते नुकतेच संपन्न झाले.
शालेय वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिल्याबद्दल व सद्या लोप पावत असलेल्या विणकाम, भरतकाम या घरगुती कला कुसरींच्या विद्यार्थी मित्रांनी तयार केलेल्या वस्तूंचे व साहित्यांचे हस्तकला दालनाचे उद्घाटन केल्यानंतर त्याची पाहणी करताना शाळेने याकामी मुलांना प्रोत्साहन देऊन या कलांच्या संवर्धनासाठी प्रेरित केल्याबद्दल व याद्वारे त्यांच्या छंद विकसनासाठी, फावला वेळ योग्य,उपयुक्त कारणासाठी सत्कारणी लावल्याबद्दल व त्यांच्यात एका जागी स्थिर राहून काम करण्याची व त्याची एकाग्र क्षमता विकसित करण्यासाठी असे उपक्रम सर्वच शाळांनी राबविले पाहिजेत जेणेकरून मोबाईलच्या विळख्यात अडकलेल्या मुलांमध्ये चांगल्या सवयी विकसित करता येतील असे मत प्रतीपादित केले.
कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख उपस्थित म्हणून माजी विद्यार्थी व राज्य दहशतवाद विरोधी पथक, मुंबईचे पोलीस निरीक्षक श्रीमान शैलेश गायकवाड,तळोजा पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक व माजी विद्यार्थी श्रीमान प्रतापसिंह सुरेशराव चव्हाण,माजी विद्यार्थी व ओम एंटरप्रायझेस तळीयेचे प्रो.प्रा. श्रीमान ओंकार लक्ष्मणराव चव्हाण,माजी विद्यार्थी व आसनगाव निवासी,सद्या मध्य पूर्वेतील अबुधाबी येथे कार्यरत श्रीमान रतन मोहनराव शिंदे,संस्था सचिव श्रीमान राजेंद्र बाळासाहेब कदम,संस्था विश्वस्त श्रीमान धनसिंगराव सदाशिवराव कदम, शालेय समिती अध्यक्ष श्रीमान देवेंद्र बाळासाहेब कदम,विज्ञान सल्लागार समितीचे अध्यक्ष श्रीमान राजाराम कृष्णा कदम,शिक्षक प्रतिनिधी श्री.मनेश धुमाळ,विद्यार्थी प्रतिनिधी निखिल कर्पे विद्यार्थीनी प्रतिनिधी साजमा इनामदार उपस्थित होते.
पंचक्रोशीतील माजी हुशार,अभ्यासू, गुणवंत आणि कर्तृत्ववान विद्यार्थी मित्रांचा शालेय व्यासपीठावरून गुणगौरव व्हावा. त्यांच्या उत्तुंग कार्याची ओळख समस्त जणांस होताना आमच्या विद्यार्थी मित्रांना प्रेरणा,प्रबलन,प्रोत्साहन आणि सुयोग्य मार्गदर्शन मिळून त्यांच्या जीवनास दिशा मिळावी,माजी विद्यार्थी मित्रांना शालेय गुणवत्ता, भौतिक सुविधा यांची माहिती देता यावी व शालेय विद्यार्थी मित्रांचे कोविड पश्चात कमी होत गेलेले ध्यान एकाग्र रहावे व सर्वांच्या सहकार्याने शालेय प्रगतीस चालना मिळावी अशा बहुविध उद्देशाने या कार्यक्रमाचे नियोजन केले गेले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य प्रदीप ढाणे,सूत्र संचालन प्रा.सुरेश निंबाळकर आणि आभार प्रदर्शन पर्यवेक्षक ज्ञानेश्वर देशमुख यांनी केले.






