सातारा जिल्ह्यातील देऊरच्या अनिकेत शिंदेंचे UPSC परीक्षेत यश

UPSC EPFO परीक्षेत पटकावला देशात 18 वा क्रमांक
देऊरचे सुपुत्र चि. अनिकेत नंदा जितेंद्र शिंदे यांची संघ लोकसेवा आयोग ( UPSC ) द्वारे घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये देशात 18 वा क्रमांक मिळवून EPFO अंमलबजावणी अधिकारी, भारत सरकार या पदी निवड झाली. यापूर्वीही त्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा 2023 परीक्षेमध्ये राज्यात 92 वा क्रमांक मिळवून महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रित अधिकारी
पदी निवड झाली आहे. त्यांचे शिक्षण श्री मुधाईदेवी विद्यामंदिर देऊर व त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण सयाजीराव हायस्कूल सातारा येथे झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनि्हर्सिटीमध्ये त्यांनी B.Tech ही अभियांत्रिकी पदवी मिळवली.कुटुंबाच्या व मित्र-मैत्रिणींच्या भक्कम पाठिंब्यामुळे आणि अभ्यासातील सातत्यामुळे आपण हे यश मिळवू शकलो अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.






