आशीर्वाद हॉस्पिटलच्या शिबिरातून तात्यांचे सामाजिक विचार पुढे नेण्याचे कार्य

आशीर्वाद हॉस्पिटलच्या शिबिरातून तात्यांचे सामाजिक विचार पुढे नेण्याचे कार्य

खासदार नितीन पाटील यांच्या हस्ते नेत्र चिकित्सा शिबिराचे उदघाटन

वाठार स्टेशनला २ ५ ० गरजू रुग्णांनी घेतला लाभ

कोरेगाव ता.२५ : खासदार लक्ष्मणराव पाटील तात्या यांनी समाजकारण करताना नेहमी सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून कार्य केले, आज जिल्ह्यात मकरंदआबा पाटील आणि मी जिल्हाभरात काम करताना तात्यांनी जपलेला जिव्हाळा आणि माणसांचा गोतावळा याचा अनुभव येतो. त्यांच्या विचाराने प्रेरित कार्यकर्ते आज समाजकारणात मोठ्या संख्येने सक्रिय असून तात्यांच्या विचारांची शिदोरी घेऊन कार्यरत आहेत. वाठारला डॉ . सूयोग लेंभे, सुहास जाधव, सागर लेंभे या युवा कार्यकर्त्यांनी घेतलेल्या नेत्र चिकित्सा शिबिरातून तात्यांचे सामाजिक विचार पुढे नेण्याचे कार्य होत आहे हि बाब सुखावणारी आहे असे उदगार खासदार नितीन पाटील यांनी काढले.

वाठार स्टेशन (ता.कोरेगाव) येथे पोलिस स्टेशन समोरील आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये माजी खासदार (कै.) लक्ष्मणराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज (मंगळवार) मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिर आयोजित करण्यात आले होते. बुधराणी हॉस्पिटल (पुणे), मानव विकास संस्था तसेच आशीर्वाद हॉस्पिटल व समर्थ मेडिकल यांच्या पुढाकारातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी गरजू रुग्णांना मोफत चष्मे दिले गेले तर मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे . . खासदार नितीन पाटील यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले यावेळी आमदार सचिन कांबळे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर, जिल्हा बँकेचे संचालक रामभाऊ लेंभे, बाजार समिती अध्यक्ष कल्याण भोसले, राजूकाका भोसले , मंगेश धुमाळ, नागेश जाधव, अजय कदम , सुरेश साळुंखे, वाठारच्या सरपंच सिमा चव्हाण, उपसरपंच सचिन जाधव, दत्तात्रय धुमाळ, तडवळे सरपंच राहुल भोईटे यांची प्रमुख उपस्थिती होती .

यावेळी खासदार नितीन पाटील म्हणाले, या भागाचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून प्रयत्न सुरु राहतील. शेतकऱ्यांच्या शेतीला मुबलक पाणी मिळाले पाहिजे हा अट्टाहास तात्यांचा नेहमी असायचा तो विचार मंत्रालयात मंत्री मकरंद आबा व आमदार सचिन पाटील यांच्या सहकार्यातून या विषयी विशेष बैठक घेऊन लवकरच कार्यवाही करु आणि तात्यांचे स्वप्न पूर्ण करू असा विश्वास दिला.

आमदार सचिन पाटील म्हणाले, स्वर्गीय तात्याचा जिव्हाळा व आपुलकी अनुभवण्याचा योग्य एका भेटीत आला होता तोच वारसा मंत्री मकरंद आबा व खासदार नितिनकाका यांच्या माध्यमातून जाणवतो. कार्यकर्ता जपणारा पाटील परिवार आहे त्याची प्रचिती आजच्या जयंतीनिमित्त जमलेल्या गर्दीतून दिसून येते. पाण्यासाठी अग्रक्रम देऊन या भागाला पाणी देण्यासाटी कटिबद्ध राहणे हि तात्यांच्या विचारांची जपणूक असेल यासोबत वाठार भागातील रुग्णाला शासनाच्या आरोग्य योजना व उपचार योजनांचा लाभ घेता यावा यासाठी डॉ . सुयोग लेंभे यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलला सर्वोतपरी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

याप्रसंगी प्रास्ताविक करताना डॉ. सुयोग लेंभे म्हणाले, सर्वसामान्य माणसासाठी खासदार लक्ष्मणराव पाटील तात्या यांनी आयुष्यभर कार्य केले. त्यांच्यामाध्यमातून अनेकांना सामाजिक करायची प्रेरणा व ऊर्जा मिळाली. त्यांनी दिलेल्या शिकवणीतून त्यांच्या विचाराचा वारसा पुढे चालवण्यासाठी आम्ही दरवर्षी या शिबिराचे आयोजन करतो. यावर्षी पाचवे वर्ष आहे तात्यांचा जयंतीदिनी हा कॅम्प होत असतो यातून असून गरजू रुग्णांना लाभ मिळतो, भविष्यातही हा विचार कायम ठेवू.

शिबीराच्या यशस्वितेसाठी डॉ . देवयानी लेंभे , दीपिका लेंभे, शामल जाधव यांनी परिश्रम घेतले . सुहास जाधव यांनी सर्वांचे स्वागत केले तर सागर लेंभे यांनी आभार मानले.

Prabhukrupa Automobiles

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Top 10 Netflix Web Series to Watch Right Now (Feb 2026) Maharashtra kesari 2025 :पृथ्वीराज मोहोळ ६ ७ व्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी (Copy)