वाठार स्टेशन येथील मुस्लिम समाज बांधवांनतर्फे नेत्र तपासणी शिबिर

प्रजासत्ताक दिनानिमित्त स्तुत्य उपक्रम
वाठार स्टेशन ता.कोरेगाव येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत मुस्लिम समाज बांधवांनी जामे मस्जिद वाठार स्टेशन येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले होते. या नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या शिबिरामध्ये नेत्र तपासणी तसेच उपलब्ध असणारे उपचार व त्यावर मार्गदर्शन देखील करण्यात आले.प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ११ वाजता हे शिबिर वाठार स्टेशन येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन वाठार स्टेशन ज्येष्ठ नागरिक साहेबराव मुगटराव जाधव तात्या व वाठार स्टेशनच्या नूतन सरपंच सीमा चव्हाण व शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमोल आवळे यांच्या हस्ते करण्यात आले . या नेत्र तपासणी शिबिरास शंभरहून अधिक लोकांनी नेत्र तपासणीचा लाभ घेतला तसेच माफक दरात चष्मे वाटप करण्यात आले. या नेत्र शिबिराचे मार्गदर्शन डॉ. मनोहर डोळे व त्यांच्या सर्व टिम केले व या नेत्र शिबिरासचे आयोजन मुस्लिम समाजाचे जेष्ठ नेते हमीद भाई पठाण व मा. श्री . दयानंद गोविंदराव खरात यानी विशेष सहकार्य केले व कार्यक्रमाचे आभार निसार भाई यांनी व्यक्त केले . या नेत्र शिबिरास उपस्थित वाठार स्टेशन चे नूतन सरपंच सीमा चव्हाण.
उपसरपंच. इर्शादभाई मोमीन, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सातारा अमोल आवळे, निवृत्ती भाऊ करे, माजी सरपंच ऋषीसेन जाधव, नामदेव जाधव, सुभेदार मेजर अनिल काळोखे, गणेश चव्हाण, माजी उपसरपंच संजय भोईटे, माजी उपसरपंच सचिन जाधव, विजयपवार, भगवान चव्हाण, गफारभाई शेख, शब्बीर शेख, अमिर सय्यद, फैयाज शेख, अलीम सय्यद, अशपाक सय्यद.
समद शेख, हाफिज भाई पटेल, शरीफ शेख तसेच वाठार स्टेशनचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.






