world population day जनगणना ही देशाच्या भविष्याशी निगडित : शशिकांत जाधव

world population day

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">डी&period;जी&period; कॉलेज मध्ये world population day निमित्त विशेष व्याख्यान<&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><br>सातारा&colon; – world population day कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय&comma; सातारा येथील व्यावसायिक अर्थशास्त्र व बँक मॅनेजमेंट विभागाच्या वतीने जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले&period; या कार्यक्रमात जिल्हाधिकारी कार्यालय&comma; सातारा येथील महसूल विभागाचे तहसीलदार मा&period; शशिकांत जाधव यांचे विशेष मार्गदर्शन लाभले&period; कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यावसायिक अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ&period; विजय कुंभार यांनी करताना लोकसंख्या वाढीच्या समस्यांचा आणि त्यातील संधींचा आढावा घेतला&period; त्यांनी जागतिक लोकसंख्या दिनाच्या अनुषंगाने तरुण पिढीमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले&period;<br>शशिकांत जाधव यांनी आपल्या मार्गदर्शनात जनगणनेच्या प्रक्रियेचे सविस्तर आणि माहितीपूर्ण विवेचन केले&period; त्यांनी जनगणना ही देशाच्या भविष्याशी निगडित एक अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असल्याचे सांगून सर्व नागरिकांनी त्यात सक्रिय सहभाग घेणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले&period; जनगणनेमध्ये नागरिकांनी वय&comma; जात&comma; धर्म यासारखी खरी व अचूक माहिती देणे अत्यावश्यक असून&comma; ही माहितीच पुढील शासकीय धोरणांची आखणी ठरवते&period;world population day यंदाची जनगणना ही पूर्णतः डिजिटल पद्धतीने पार पडणार असून&comma; प्रक्रियेच्या प्रारंभी घरांची मोजणी केली जाते आणि त्यानंतर व्यक्तींची माहिती संकलित केली जाते&period; या प्रक्रियेत घरातील वस्तू जसे की दुचाकी&comma; चारचाकी&comma; टी&period;व्ही&period; इत्यादींचीही नोंद घेतली जाते&period; बालक&comma; स्त्रिया&comma; वयोवृद्ध&comma; विविध वयोगटांतील व्यक्ती तसेच सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमीची माहिती अचूकरीत्या संकलित करणेही महत्त्वाचे असते&period; या माध्यमातून देशातील भाषा आणि बोलीभाषांची मोजणीदेखील केली जाते&period; ही जनगणना एक महाकाय प्रक्रिया असून&comma; त्यात सुमारे २&period;५ लाखाहून अधिक अधिकारी व कर्मचारी कार्यरत असतात&period; या आकडेवारीचा उपयोग देशाची समग्र विकास योजना व विकास आराखडे तयार करणे&comma; ग्रामविकास योजना&comma; शहरी विकस योजना&comma; शैक्षणिक धोरणे&comma; आरोग्य सेवा&comma; संसाधनांचे वितरण अशा अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये केला जातो&period; जनगणना म्हणजे केवळ संख्या मोजणी नसून&comma; ती देशाच्या सामाजिक&comma; आर्थिक आणि शैक्षणिक स्थितीचे प्रतिबिंब असते&comma; असे त्यांनी नमूद केले&period;<br>देशाची लोकसंख्या ही देशाची संपत्ती असून लोकसंख्येचा विधायक वापर करून देशाचा आर्थिक विकास साध्य केल्यास देशाचे प्रगती जलद गतीने होऊ शकेल तसेच देशातील आर्थिक विषमता व वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण झालेल्या प्रश्नांची सोडवणूक केल्यास आर्थिक व सामाजिक प्रगती साध्य होऊ शकेल असे मत महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो&period; डॉ&period; गणेश जाधव यांनी व्यक्त केले&period; बँक मॅनेजमेंट विभागाचे विभाग प्रमुख डॉ&period; राजशेखर निल्लोलू यांनी उपस्थितांचे आभार मानले या कार्यक्रमासाठी व्यावसायिक अर्थशास्त्र व बँक मॅनेजमेंट विभागप्रमुख डॉ&period; विजय कुंभार&comma; विभागातील प्राध्यापक डॉ&period; विजय पाटील&comma; प्रा&period; भाग्यश्री भोसले&comma; प्रा&period; साझिया हुसेन&comma; प्रा&period; प्राजक्ता कुंभार&comma; प्रा&period; निकिता जाधव&comma; प्रा&period; रोहिणी धाईंजे&comma; व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: