भारतातील सर्वात उंच धबधबा 

सातारा वजराई धबधबा 

जगप्रसिद्ध कास पुष्प पठारामुळे सातारा पर्यटकांसाठी फेव्हरेट ठरला आहे

जगप्रसिद्ध कास पुष्प पठारामुळे सातारा पर्यटकांसाठी फेव्हरेट ठरला आहे

आता सातारानजीक असलेल्या भांबावली वजराई धबधब्याची ख्याती वाढली आहे .

भारतातील सर्वात उंच धबधबा म्हंणून याची ओळख निर्माण झाली आहे. .

सातारा पासून ३२ किमी दूर निसर्गाच्या गर्द कुशीत हा धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.

उरमोडी नदीवर असलेला हा धबधबा १८४० फूट उंच असून तीन टप्प्यात कोसळतो .

उंचीहून कोसळणारे उरमोडीचे पाणी, हिरवा गर्द निसर्ग आणि सोबतीला रिमझिम पाऊस असे निसर्गाचे देखणे रूप  हे इथले वैशिष्ठय

पावसाळी हंगामात निसर्गाचे हे विलोभनीय रूप पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करीत असतात.

याच सोबत जवळचे कास पुष्प पठार हे पाहणेही आलेच

सोबत याच परिसरातील ठोसेघर या धबधब्यालाही पर्यटक भेट देतात

तर मग तुम्ही कधी  भेट देताय या भांबवली वजराई धबधब्याला