Vidhansabha Election: आमदार महेश शिंदेंसाठी मुख्यमंत्री Eknath Shinde मैदानात

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">सातारा जिल्ह्यात महायुतीची पहिली प्रचार सभा<&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<figure class&equals;"wp-block-image size-full"><img sizes&equals;"&lpar;max-width&colon; 720px&rpar; 100vw&comma; 720px" src&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;wp-content&sol;uploads&sol;2024&sol;11&sol;FB&lowbar;IMG&lowbar;1730811888708&period;jpg" alt&equals;"" class&equals;"wp-image-709"&sol;><&sol;figure>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>सातारा जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील आमदार व  महायुतीचे अधिकृत उमेदवार महेश शिंदे यांच्या प्रचारार्थ भव्य सभेचे आज आयोजन करण्यात आले होते&period; याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी महेश शिंदे यांनाच मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन केले&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>आमदार महेश शिंदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मैदानात उतरले असून सातारा जिल्ह्यात पहिली प्रचारसभा कोरेगाव येथील भंडारी मैदानावर पार पडली&period; <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले पश्चिम महाराष्ट्राचा हा भाग ऊस उत्पादक भाग म्हणून ओळखला जातो&period; या भागातील लोकांचे प्रश्न जाणून घेत ते सोडवण्याचा प्रयत्न महेश शिंदे यांनी केला असल्याचे मत यासमयी व्यक्त केले&period; लाडक्या बहिणींनी यावेळी मोठ्या उत्साहात माझे स्वागत केले&period; तसेच मला राख्या बांधून माझ्यावर फुलांचा वर्षाव केला&period; आपणा सर्वांचा हा स्नेह आणि विश्वास हीच आमची खरी ताकद असल्याचे मत याप्रसंगी व्यक्त केले&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<figure class&equals;"wp-block-image size-full"><img sizes&equals;"&lpar;max-width&colon; 720px&rpar; 100vw&comma; 720px" src&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;wp-content&sol;uploads&sol;2024&sol;11&sol;FB&lowbar;IMG&lowbar;1730811906725&period;jpg" alt&equals;"" class&equals;"wp-image-710"&sol;><&sol;figure>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>महाविकास आघाडीच्या काळात काही जण याच विधानसभा मतदारसंघात येऊन उघडपणे शिवसेनेला आव्हान देण्याची भाषा बोलून दाखवत होते&comma; त्याची कैफियत अनेकदा मांडून आणि प्रलंबित प्रश्नांसाठी निधी मागूनही नेतृत्त्वाला त्याची दखल घ्यावीशी वाटत नव्हती&comma; अखेर शिवसेनेला वाचवण्यासाठी आणि मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही उठाव केला त्यात महेश शिंदे यांनी मला साथ दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>राज्यातील महायुती सरकारने सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना&comma; लेक लाडकी लखपती योजना&comma; अन्नपूर्णा योजना&comma; साडेसात एचपी पर्यंत वीजबिल माफ करण्याची योजना&comma; वयोश्री योजना&comma; तीर्थ दर्शन योजना अशा विविध लोकोपयोगी योजना राबवल्या आहेत&period; मात्र काही मंडळींनी या योजनांची चौकशी करून त्या बंद करण्याची घोषणा केली आहे&comma; तसेच ती राबवणाऱ्यांना जेलमध्ये टाकण्याचा पण प्रयत्न केला आहे&period; मात्र सर्वसामान्य लोकांसाठी १०० वेळा तुरुंगात जायला तयार असल्याचे मत यासमयी व्यक्त केले&period; या सभेला नागरिकांचा मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता महेश शिंदे प्रचंड बहुमताने विजयी होतील असा विश्वास यावेळी व्यक्त केला&period;&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>याप्रसंगी साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले तसेच शिवसेना &&num;8211&semi; भाजपा &&num;8211&semi; राष्ट्रवादी &&num;8211&semi; आरपीआय महायुतीचे सर्व स्थानिक पदाधिकारी&comma; कार्यकर्ते तसेच कोरेगावकर मोठ्या संख्येने उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: