Shikhar Shingnapur Shamhu Mahadev Mandir -महाराष्ट्राचे कुलदैवत शिंगणापूरचे शंभू महादेव मंदिर

Shikhar Shingnapur Shamhu Mahadev Mandir

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">Shikhar Shingnapur Shamhu Mahadev Mandir श्रावणात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">जाणून घ्या Shikhar Shingnapur Shamhu Mahadev Mandir शिखर शिंगणापूर शंभू महादेव मंदिराची संपूर्ण माहिती <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>सह्याद्रीच्या डोंगररांगेमधील काही डोंगरमाथे मंदिरांनी नटलेले आहेत&period; यातील काही मंदिरे अशी आहेत कि त्यांना धार्मिक&comma; ऐतिहासिक&comma; पौराणिक आणि राजकीयसुद्धा पार्श्वभूमी लाभली आहे&period; असे एक ठिकाण म्हणजे माण तालुक्यातील शिखर-शिंगणापूर&period;Shikhar Shingnapur Shamhu Mahadev Mandir -महाराष्ट्राचे कुलदैवत शिंगणापूरचे शंभू महादेव मंदिर हे सहयाद्रीच्या उपशाखा शंभू महादेवाच्या डोंगररांगेतील हे ठिकाण शेवटच्या डोंगरावर वसलेले आहे&period; आणि डोंगररांगा याच नावाने ओळखल्या जातात&period; श्रावण महिन्यात या तीर्थक्षेत्री दर्शनसाठी भाविक अलोट गर्दी करतात तर जाणून घेऊया Shikhar Shingnapur Shamhu Mahadev Mandir -महाराष्ट्राचे कुलदैवत शिंगणापूरचे शंभू महादेव मंदिराची संपूर्ण माहिती <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>या माणभूमीत संतोषगड&comma; वारुगड&comma; महिमानगड हे किल्ले तर आहेतच पण याचबरोबर या परिसरात भगवान शिवशंकराची पवित्र अष्टलिंग आहेत&period; या परिसरात श्री क्षेत्र वावरहिरे येथील श्री पाणलिंग मंदिर&comma; थदाळे येथील श्री वैलदेव मंदिर&comma; कोथळे येथील श्री खांबलिंग मंदिर&comma; नातेपुते गावात असलेले श्री गौरी हरेश्वर मंदिर&comma; पिंपरी गावात असलेले श्री उंबरदेव मंदीर&comma; शिखर शिंगणापूर येथील श्री शंभू महादेव मंदिर&comma; श्री अमृतेश्वर बळी मंदीर&comma; शिखर शिंगणापूर येथील श्री गुप्तलिंग मंदिर&comma; ठोंबरेवाडी येथील श्री एकलिंग मंदीर&comma; मोही येथील श्री बेलदेव मंदिर&comma; या सर्वाबरोबरच फोंडशिरस येथील श्री बाणलिंग मंदीर आणि दंगेरवाडी येथे असलेले जागृत श्री शंभू महादेव मंदीर अशी अष्टलिंगाबरोबरच दहा मंदिरे आहेत&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>शिखर-शिंगणापूरला येण्यासाठी दोन रस्ते असून पहिला फलटणमार्गे तर दुसरा दहिवडीमार्गे आहे&period; कोणत्याही मार्गे आले तरी पायथ्याला असणाऱ्या भव्य कमानीतून याडोंगरावर यावे लागते&period; डोंगरावर येण्यासाठी पायऱ्यांचा आणि दुसरा गाडीचा असे दोन मार्ग आहेत&period; गाडीने आल्यास मंदिराच्या तटबंदीपर्यंत येता येते&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>सुरुवातीला असणाऱ्या पंधरा पायऱ्या चढल्यावर आपल्याला मंदिराच्या आवारात येता येते&period; मुख्य दरवाज्याच्या अलीकडे खडकेश्वर मंदिर आहे&period; मुख्य दरवाज्यातील पायऱ्यांवर काही ठिकाणी आपल्याला छोट्या-छोट्या मूर्ती कोरलेल्या दिसतात&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>शिंगणापूरचे महादेव मंदिर समुद्रसपाटीपासून सुमारे ३५०० फूट उंचीवर आहे&period; या मंदिराला चारही बाजूने तटबंदी आहे&period; हेमाडपंथी शैलीतील हे मंदिर वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुना मानले जाते&period; समोर दिसणारा महादरवाजा उंच असून देवडीवर दोन्ही बाजूला आपल्याला हत्तीच्या मूर्ती पहावयास मिळतात&period; इथून पुढे आत आल्यावर मांगोबांचे एक छोटेखानी मंदिर आहे&period; मांगोबा मंदिरापासून काही पायऱ्यांवर दुसरा दरवाजा आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>त्यानंतर शिवकाळात बांधलेले मंदिराचे आवार आहे&period; मंदिराचे प्रांगण सुमारे ३८&period;१ मीटर लांबीचे आणि २७&period;४३ मीटर रुंदीचे असून या ठिकाणी असणाऱ्या फरसबंदीमुळे हे भव्य दिव्य वाटते&period; या प्रांगणाला चार प्रवेशद्वार आहेत&period; भिंतीत देवळाच्या मागील बाजूस लहान-लहान खोल्या आहेत&period; त्यापैकी काही देवस्थानांच्या घोड्याचे तबेले आहेत&comma; तर काही भांडारगृहासाठी व कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी उपयोगात आणल्या जात होत्या&period; सध्याछत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज श्री&period;उदयनराजे भोसले हे या मंदिराचे सर्वेसर्वा आहेत&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>सुरुवातीला दोन्ही बाजूला आपल्याला एक-एक दीपमाळ पहायला मिळते&period;काहीशा उंच असणाऱ्या या दीपमाळांवर जाण्यासाठी पायऱ्या आहेत&period; शिवाय आवारात आणखीही काही लहान दीपमाळा व दोन-तीन छोटेखानी मंदिरे आहेत&period; मंदिराच्या मागे डाव्या बाजूस एका कोनाड्यात एक पोर्तुगीज बनावटीची मोठी घंटा बांधलेली आहे&period; यात्रेच्या वेळी यात्रेकरूंना उतरण्यासाठी आवारात पडवी बांधलेली आहे&period; मंदिराचे पूर्ण आवार तटबंदीत असून त्याला चारी बाजूंस दरवाजे आहेत&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>महादेव मंदिर आवारात मध्यभागी असून मंदिरासमोर नंदी मंडप आहे&period; त्याच्या आसाभोवती फिरणारे खांब आहेत&period; नंदीमंडपाच्या समोर चांदीच्या पत्र्याने मढविलेली शिवाला शरण गेलेली पार्वतीची मूर्ती आहे&period; जवळच लहान नंदी देखील आहे&period; मंदिराला मंडप आणि गाभारा असे भाग असून मंडपाला चारही बाजूने प्रवेशद्वारे आहेत&period; अत्यंत सुबक आणि नाजूक कोरीव काम केलेल्या खांबांवर हा मंडप उभा आहे&period; या खांबावर वराहवध&comma; तलवारीने- बंदुकीने शिकारीचे प्रसंग&comma; मैथुन शिल्पे&comma; नक्षीकाम अशी शिल्पे घडविलेली आहेत&period; यातील वराहवध शिल्पाला खास महत्त्व आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>याविषयी एक कथाही ऐकायला मिळते&period; उर्वशीने इंद्रसभेत गाताना संगीतशास्त्राच्या केलेल्या चुकांचा आणि इंद्राने ते चालू ठेवू दिल्याचा संताप दुर्वास ऋषींना आलाआणि त्यांनी इंद्र आणि उर्वशीस शाप दिला की&comma; इंद्रा&comma; तू मृत्युलोकात वराह होशील आणि उर्वशी घोडी होईल&period; नंतर त्या दोघांनी त्यांचीकरुणा भाकल्यावर त्यांनी उ&colon;शाप दिला की इंद्र शिवस्पशनि यातून मुक्त होईल&period; आणि त्याप्रमाणे तो किरातरूपी शिवस्पर्शानि मुक्त झाला&period; त्याच्या या शिकारीचे शिल्प इथे मंदिरात पाहायला मिळते&period; मंडपाच्या मध्यभागी चौकोनी आकाराची रंगशिळा असून त्यावर पाच नंदी आहेत&period; आणखी एक गोष्ट इथे पहायला मिळते ती म्हणजे रंगशिळेवर नावास्पुर्तीची चांदीची नाणी ठोकलेली आहेत&period; इथून गाभाऱ्यातील शिवलिंगाचे दर्शन होते&period; गाभाऱ्याचा दरवाजा चांदीच्या पत्र्याने मढविलेला असून त्याची दगडी कमान अत्यंत बारीक कलाकुसरीने नटलेली आहे&period; गाभान्यातील शिवलिंग चौकोनी आकाराचे आणि दोन शाळुंका असणारे आहे&period; हे शिवलिंग स्वयंभू मानले जाते&period; आणि यावरील शाळुंका म्हणजे शिव-शक्तीचे प्रतीक मानले जाते&period; शिवलिंगाच्या मागे अलीकडच्या काळात स्थापलेली विष्णूची मूर्ती आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>मंदिराच्या बाहेरच्या बाजूला&comma; शिखरावर अनेक नर्तिका&comma; अप्सरा&comma; साधू&comma; देव-देवता यांच्या मूर्ती आहेत&period;मंदिर आवाराबाहेर&comma; डोंगराच्या एका बाजूला&comma; एक मोठी जुनी वास्तू आहे&period; तिला &&num;8216&semi;सदरसोपा&&num;8217&semi; म्हणतात&period; ही वास्तू म्हणजे शहाजी&comma; शिवाजी&comma; संभाजी&comma; यांच्या प्रतीकात्मक समाध्या मानले जाते&period; यांतील मधली समाधी शहाजी राजांनी&comma; डाव्या बाजूची शिवाजीमहाराजांची व उजवीकडील संभाजी राजांची आहे&period; संभाजी राजांच्या समाधीमध्ये शिवलिंग स्थापन केलेले आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>शंभूमहादेवाची यात्रा गुडीपाडव्यापासून सुरू होते&period; ती एकादशी बारसपर्यंत चालते&period; या कालावधीत शंकर-पार्वती हळदी समारंभ&comma; विवाह सोहळा&comma; ध्वज बांधने असे कार्यक्रम असतात&period; चैत्र शुद्ध अष्टमीला शिवपार्वती विवाह सोहळा पार पडतो&period; आख्यायिकेनुसार इंदूर राजघराण्याला विवाहाचे निमंत्रण मिळालेले नव्हते&period; याचा भक्तिरूपाने निषेध म्हणून राजघराण्याचे वारसकालगावडा राजे एकादशीला घोड्यावरून शिंगणापुरात येतात&period; पुष्कर तलावात स्नान करतात&period; एकादशीला सर्व भाविक उपवास करीत असताना कालगौडा न्याहारी करतात&period; त्यानंतर पायात चप्पल घालून गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतात&period; त्यानंतर उमाबनातील नांद्रुकीच्या झाडाखाली बसून कांदा&comma; चटणी आणि भाकरी खातात&period; त्यांच्याबरोबर आलेले सर्व भाविक महाप्रसाद घेतात&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>त्यानंतर याच दिवशी हरहर महादेवच्या जयघोषात बारसच्या दिवशी शिखर शिंगणापूरमध्ये हजारो कावडी दाखल होतात&period; या दिवशी मुंगी घाटातून करून शेकडो कावडी वर चढतात&period; कड्यावरून पाहताना माणसे मुंगीसारखी दिसतात&period; म्हणून या ठिकाणाला मुंगी घाट म्हणतात&period;सर्वांत शेवटी मानाची तेल्यात्याची कावड असते&period; ती मुंगी घाट चढल्यावर आणलेले पाणी महादेवाला घालतात&period; त्यालाच दार घालने असे म्हणतात&period; त्यानंतर यात्रेची सांगता होते&period; यात्रेनिमित्ताने मराठवाडा&comma; विदर्भ&comma; आंध्र प्रदेश&comma; कर्नाटक&comma; इंदोर येथून भाविक येतात&period;याशिवाय श्रावणातील सोमवार&comma; प्रत्येक अमावस्या व एकादशीस येथे लहान-मोठ्या यात्रा भरतात&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>याशिवाय शंभूमहादेवाच्या डोंगर रांगांमध्ये मुंगीघाट&comma; रानमळा&comma; भटहिरा&comma; सोनटक्का&comma; राजे छत्रपतींचे स्मारक&comma; सदर सोपा&comma; घडशिहेळ&comma; उमाबन&comma; पाण्याच्या टाकीचा डोंगर&comma; साखरबाई&comma; बारव परिसर&comma; मुंगीघाटी&comma; खारवने परिसर&comma; मालोजी राजेंनी बांधलेला दगडी पुष्कर तलाव परिसर&comma; हत्ती सोंड&comma; कोथळे माथा घाट परिसर अशी सर्व विलोभनीय स्थळे शिंगणापूरमध्ये आहेत&period;श्री विष्णु-लक्ष्मीने चैत्रअष्टमी या दिवशी शिवाचा पार्वतीशी विवाह लावून दिल्याची घटनायेथेच घडल्याची एक पुराण कथा सांगितली जाते&period; त्या आधारावर गावकरी प्रतिवर्षी याच दिवशी शिव पार्वतीच्या विवाहाचा सोहळा पार पाडतात&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>देवगिरीच्या यादव वंशातील सिंघण राजाने या मंदिराची उभारणी केली&period; सातारा जिल्ह्यातील अनेक घटना व घटनास्थळे यांच्याशी ऐतिहासिक काळात सिंघण राजाचा &lpar;१२१० से १२४७&rpar; संबंध येतो&period; कोल्हापूरच्या शिलाहार घराण्याच्या भोजराजाशी लढाई जुंपली तेव्हा सिंघणाची या परिसरातच होती&period;सिंघणराजाने या डोंगराच्या पायथ्याला एक तलाव बांधला&period; त्याला आज पुष्करतीर्थ म्हटले जाते&period; मालोजीरावांनी व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी देणगी देऊन याची डागडुजी केली&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>आजचे शिंगणापूर हे त्याकाळचे सिंघणपूर होते&period; छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी भोसले यांची पाटीलकीचे वतन वेरुळ येथे होते&period; तेथील स्वयंभू घृष्णेश्वराचे ते निस्सीम भक्त होते&period; त्याचप्रमाणे शिंगणापूरच्या शंभू महादेवाचेही ते भक्त होते&period; येथे पाण्याचे फार दुर्भिक्ष हे त्यांच्या लक्षात आले&period; त्यासाठी एखादा मोठा तलाव बांधवा हा त्यांचा मनसुबा होता&period; सिंघण राजाने बांधलेल्या कच्च्या तलावाचेच काम मालोजीने पक्क्या स्वरुपात पूर्ण केले&comma; असेही मानतात&period;शिखर शिंगणापूर येथे शिवरायांनी काही काळ वास्तव्य केल्याचे सांगितले जाते&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>Shikhar Shingnapur Shamhu Mahadev Mandir शिखर शिंगणापूर या ठिकाणी इ&period;स&period; १६५१ साली एक महत्त्वाची घटना घडली&period; बळजबरीने मुसलमान झालेल्या नेताजी पालकरांना शुद्धीकरण करून पुन्हा हिंदू धर्मात याच ठिकाणी घेतले गेले&period; इ&period;स&period; १८१६ मध्ये ठाण्याच्या कारागृहातून त्र्यंबकजी डेंगळे सुटले आणि शिंगणापूरच्या डोंगरात लपून त्याने १८०० माणसे जमवली&period; जनरल स्मिथला ही गोष्ट कळताच त्याने&comma; त्यांना डोंगरातून पळवून लावले&period; पुढे त्र्यंबकजी डेंगळेचा पंढरपूर येथे खून झाल्याची नोंदही आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>शिंगणापूर गावात उजव्या बाजूस महादेव मंदिराचीच प्रतिकृती असणारे अमृतेश्वराचे मंदिर आहे&period; तटबंदीमध्ये असणाऱ्या या मंदिरात येण्यासाठी दोन दरवाजे आहेत&period; मंदिराच्या एका बाजूला घुमटासारखे एक छोटेखानी सदाशिवाचे मंदिर आहे&period; या मंदिराला मंडप आणि गाभारा असे दोन भाग असून गाभार्यातील शिवलिंग दोन शाळुंका असणारे आहे&period; मंडपामध्ये गोल रंगशिळा आहे&period; हे मंदिर घडीव दगड एकमेकांवर ठेवून बांधलेले आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>शिंगणापूरपासून काही अंतरावरच दहिवडी हे तालुक्याचे ठिकाण आहे&period; तिथून गोंदवले हे ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे हे जन्मस्थळ असून आध्यात्मिक अभ्यासकेंद्र म्हणूनही ते प्रसिद्ध आहे&period; गोंदवल्यापासून जवळच म्हसवड असून तिथले सिद्धनाथाचे मंदिर प्रसिद्ध आहे&period; इथल्या रथोत्सवास राज्यासह कर्नाटक&comma; आंध्र प्रदेशातूनही भाविक लाखोंच्या संख्येने गर्दी करतात&period; सातारा ते शिखर-शिंगणापूर हे अंतर फलटणमार्गे ९० कि&period;मी&period; आहे&period; तर दहिवडीमार्गे हे अंतर ८८ कि&period;मी&period; आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>याशिवाय मोही गावात श्री बेलदेव&comma; वावरहिरे गावात श्री पाणलिंग वैलदेव&comma; कोथळेमध्ये श्री खांबलिंग&comma; पिंपरीमध्ये श्री उंबरदेव&comma; नातेपुत्यात श्री गौरीहर व फोंडशिरस येथे श्री बाणलिंग अशी मंदिरे आहेत&period; त्यांची प्रदक्षिणा केल्याने भरपूर पुण्य प्राप्त होते अशी लोकधारणा आहे&period; अष्टलिंग दर्शनच्या या सहलीत या मंदिराबरोबरच आपल्याला छत्रपती शिवरायांच्या घराण्याचे दैवत शिखर शिंगणापूरबरोबरच महिमानगड&comma; संतोषगड&comma; वारुगड&comma; सीतामाईचा डोंगर मोही येथील माणदेशी एक्स्प्रेस ललिता बाबर यांचे घर ही ठिकाणे आपल्यास पहाता येतात&period; कोथळे गावापासून जवळच सुप्रसिद्ध असा मुंगी घाट आहे&period; हे पण आपण या ठिकाणी पाहू शकता&period; तर मग महाराष्ट्राचे कुलदैवत शिंगणापूरचे महादेव मंदिर पहायला येताय ना&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p id&equals;"Shikhar-Shingnapur-Shamhu-Mahadev-Mandir">&num;Shikhar Shingnapur Shamhu Mahadev Mandir&comma; Shambhu Mahadev Mandir&comma; <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>हे पण आवर्जून वाचा क्लिक करा<&sol;strong> <a href&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;jarandeshwar-temple-&percnt;e0&percnt;a4&percnt;b6&percnt;e0&percnt;a5&percnt;8d&percnt;e0&percnt;a4&percnt;b0&percnt;e0&percnt;a4&percnt;be&percnt;e0&percnt;a4&percnt;b5&percnt;e0&percnt;a4&percnt;a3-&percnt;e0&percnt;a4&percnt;aa&percnt;e0&percnt;a4&percnt;be&percnt;e0&percnt;a4&percnt;8a&percnt;e0&percnt;a4&percnt;b8&percnt;e0&percnt;a4&percnt;b8&percnt;e0&percnt;a4&percnt;b0&percnt;e0&percnt;a5&percnt;80-&percnt;e0&percnt;a4&percnt;86&percnt;e0&percnt;a4&percnt;a3&percnt;e0&percnt;a4&percnt;bf-&percnt;e0&percnt;a4&percnt;9c&percnt;e0&percnt;a4&percnt;b0&percnt;e0&percnt;a4&percnt;82&sol;" data-type&equals;"link" data-id&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;jarandeshwar-temple-&percnt;e0&percnt;a4&percnt;b6&percnt;e0&percnt;a5&percnt;8d&percnt;e0&percnt;a4&percnt;b0&percnt;e0&percnt;a4&percnt;be&percnt;e0&percnt;a4&percnt;b5&percnt;e0&percnt;a4&percnt;a3-&percnt;e0&percnt;a4&percnt;aa&percnt;e0&percnt;a4&percnt;be&percnt;e0&percnt;a4&percnt;8a&percnt;e0&percnt;a4&percnt;b8&percnt;e0&percnt;a4&percnt;b8&percnt;e0&percnt;a4&percnt;b0&percnt;e0&percnt;a5&percnt;80-&percnt;e0&percnt;a4&percnt;86&percnt;e0&percnt;a4&percnt;a3&percnt;e0&percnt;a4&percnt;bf-&percnt;e0&percnt;a4&percnt;9c&percnt;e0&percnt;a4&percnt;b0&percnt;e0&percnt;a4&percnt;82&sol;">Jarandeshwar Temple श्रावण&comma; पाऊससरी आणि जरंडेश्वर दर्शन<&sol;a><&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<div class&equals;"wp-block-media-text is-stacked-on-mobile" style&equals;"grid-template-columns&colon;15&percnt; auto"><figure class&equals;"wp-block-media-text&lowbar;&lowbar;media"><img src&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;07&sol;WhatsApp-Image-2025-06-24-at-10&period;34&period;39-AM-997x1024&period;jpeg" class&equals;"wp-image-1666 size-full"&sol;><&sol;figure><div class&equals;"wp-block-media-text&lowbar;&lowbar;content">&NewLine;<p><strong>लेखन &&num;8211&semi; सहा&period;प्रा&period;सुर्यकांत शामराव अदाटे<br>प्रा&period;संभाजीराव कदम महाविद्यालय&comma; देऊर<&sol;strong> &lpar;लेखक सहाय्यक प्राध्यापक म्हणून सेवारत असून अनेक दैनिकातून विपुल साहित्य लेखनाचा अनुभव&comma; गड- किल्ले व प्रवास भेटीची आवड&comma; लोकजीवन आणि लोकसंस्कृतीचे अभ्यासक आहेत&period;&rpar;<br>९९७५७५९३२५<&sol;p>&NewLine;<&sol;div><&sol;div>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><&sol;p>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: