Satara News: कृष्णा कालव्याचा दुरुस्तीचा प्रश्न मार्गी लावणार- जलसंपदामंत्री विखे पाटील

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading"><em>आमदार शशिकांत शिंदेंच्या प्रश्नावर जलसंपदा मंत्र्यांचे उत्तर<&sol;em><&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>Satara News&colon; साताऱ्यासह सांगली जिल्ह्यातील शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या कृष्णा कालव्याची देखभाल दुरुस्तीअभावी कराडजवळ पडझड झाली आहे&comma; जलपर्णीचा प्रादुर्भाव&comma; वाढलेली झुडपे&comma; साचलेल्या गाळामुळे कालव्याची<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>वहनक्षमता कमी झाली असून&comma; या कालव्याची गळती थांबवून वहनक्षमता वाढविण्यासाठी आणि सैदापूरसारख्या ठिकाणी नागरी वस्त्यांमधून कालव्यात सोडले जाणारे सांडपाणी थांबवण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही&comma; उपाययोजना केली अथवा करण्यात येत आहे&quest; असा प्रश्न आमदार शशिकांत शिंदे यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला&period; Satara News<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>त्यावर &&num;8216&semi;ब्रिटीशकालीन कृष्णा कालव्यातील पाण्याची गळती थांबवून वहनक्षमता पुनर्स्थापित करण्याकरीता आवश्यक ठिकाणी अस्तरीकरण व विमोचकाच्या दुरूस्तीच्या कामांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून&comma; त्यास प्रशासकीय मान्यता घेण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही प्रगतीत आहे&&num;8217&semi;&comma; असे उत्तर जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>कृष्णा कालव्याची पाण्याची गळती थांबवून वहनक्षमता वाढविण्याबाबतचा प्रश्न उपस्थित करताना आमदार शशिकांत शिंदे म्हणाले&comma; की साताऱ्यासह सांगली जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या कृष्णा कालव्याची कराडजवळ देखभाल&comma; दुरुस्ती न झाल्यामुळे पडझड झाली आहे&comma; जलपर्णीचा प्रादुर्भाव&comma; वाढलेली झुडपे&comma; साचलेल्या गाळामुळे कालव्याची वहनक्षमता कमी होऊन शेतीपर्यंत पाणी पोहोचण्यास अडचणी येत आहेत&period; सैदापूर येथे नागरी वस्त्यांमधील सांडपाणी थेट कृष्णा कालव्यात सोडण्यात येत असल्यामुळे दूषित झालेल्या पाण्याला दुर्गंधी येत आहे आणि ते शेती व इतर वापरासाठी अयोग्य ठरत आहे&period; याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय&quest; तसेच कालव्याच्या पडझड झालेल्या भागांची दुरुस्ती&comma; अस्तरीकरणाची कामे करून पाण्याची गळती थांबविण्यासाठी आणि वहनक्षमता वाढविण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याबाबत त्याचबरोबर सैदापूरसारख्या ठिकाणी नागरी वस्त्यांमधून कालव्यात सोडले जाणारे सांडपाणी थांबवण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही&comma; उपाययोजना केली अथवा करण्यात येत आहे&quest; याबाबतचा खुलासा करावा&period; <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>त्यावर उत्तर देताना जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले&comma; की ब्रिटीशकालीन कृष्णा कालव्याच्या एकूण ८६ किलोमीटर लांबीपैकी ८० टक्के भाग हा काळ्या मातीतून जात असल्यामुळे सातत्याने झाडे-झुडपे वाढतात&semi; परंतु ती काढून आवश्यकतेनुसार दुरूस्ती करून पाणी आवर्तन दिले जाते&period; सैदापूर येथील नागरी वस्त्यांमधील सांडपाणी रोखण्याकामी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत संबंधित ग्रामपंचायतीस वेळोवेळी कळविण्यात आले आहे&period; तसेच गॅबीयन भिंतीचे काम प्रगतीपथावर आहे&period; पडझड झालेल्या कालव्याच्या भागांची दुरुस्तीची&comma; अस्तरीकरणाची विशेष दुरुस्तीची कामे विविध ठिकाणी प्रगतीपथावर आहेत&period; <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>कृष्णा कालव्यातील पाण्याची गळती थांबवून वहनक्षमता पुनर्स्थापित करण्याकरीता कालव्याच्या एकूण ८६ किलोमीटर लांबीपैकी आवश्यक ठिकाणी अस्तरीकरण&comma; विमोचकाच्या दुरूस्तीच्या कामांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून&comma; त्यास प्रशासकीय मान्यता घेण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही क्षेत्रीय स्तरावर प्रगतीत असल्याची माहिती मंत्री विखे पाटील यांनी दिली&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>&num;shetkari &num;water &num;shashikantshinde &num;radhakrishnapatil &num;satara &num;karad &num;Satara News<&sol;p>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: