Jarandeshwar Temple श्रावण, पाऊससरी आणि जरंडेश्वर दर्शन

Jarandeshwar Hanuman Temple

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">Jarandeshwar Trek श्रावणातील भक्ती आणि शक्तीचे प्रतिक जरंडेश्वर डोंगर<&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">Jarandeshwar Yatra श्रावण महिन्यातील दर शनिवारी भाविकांची होतेय गर्दी <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>Jarandeshwar सातारारोड पाडळीपासून जवळ असलेले&comma; निसर्गाच्या कुशीत उंच डोंगरावर वसलेले&comma; भक्ती आणि शक्तीचे प्रतीक असलेले व सातारा जिल्ह्यातील असंख्य भक्तगणांचे श्रध्दास्थान म्हणजेच श्री जरंडेश्वर मारूती&period; नवसाला पावणारा मारुती म्हणजे श्री जरंडेश्वर अशी परिसरात ख्याती असल्यामुळे उंच डोंगरावर असूनही भक्तांच्या गर्दीमुळे हा परिसर शनिवारी आपल्याला गजबजून गेलेला पहायला मिळतो&period; विशेष करून श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी या ठिकाणी भक्तीला अक्षरश&colon; महापूर आलेला असतो&period; या दिवशी या ठिकाणी अभिषेक&comma; आरती&comma; भजन&comma; प्रवचन असे विविध धार्मिक कार्यक्रम यांचे आयोजित केले जाते&period; जरंडेश्वर Jarandeshwar हे अत्यंत पुरातन देवस्थान असून दिवसेंदिवस येथे येणाऱ्या भक्तांची संख्या वाढत आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>साताऱ्यामध्ये आले की पूर्व बाजूला जरंडेश्वरचा एक उंच डोंगर आपले लक्ष वेधून घेतो&period; खरं तर &&num;8216&semi;श्वर&&num;8217&semi; म्हणजे शिव शंकराचे स्थान&period; पण या ठिकाणी मुख्य मंदिर आहे ते हनुमानाचे&period; जरंडेश्वर हा डोंगर चोहोबाजूंनी सपाट जमीन असलेला असून सह्याद्रीची रांग सोडून अगदी दिमाखात उभा आहे&period; याची समुद्रसपाटीपासूनची उंची ३७६० फूट इतकी आहे&period; पुराणकाळातील या डोंगराबद्दल एक गोष्ट सांगितली जाते&period; रामायणातील युद्धकांडात रावणपुत्र इंद्रजिताच्या बाणाने लक्ष्मण जखमी झाला होता&period; त्यावेळी त्याला वाचविण्यासाठी वैद्यांनी द्रोणागिरी पर्वतावरील संजीवनी ही औषधी वनस्पती आणण्यास सांगितली&period; हनुमानाने ती जबाबदारी स्वीकारून अख्खा द्रोणागिरी पर्वत उचलून आणला&period; त्यावेळी त्या पर्वताचा एक भाग खाली पडला तो म्हणजे जरंडेश्वर डोंगर&period; जरंडेश्वरवर डोंगरावर भरपूर प्रमाणात औषधी वनस्पती सापडतात&period; येथील वनस्पती एकूण १२० रोगांवर उपयोगी पडतात असे स्थानिक सांगतात&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>श्री जरंडेश्वरबद्दल आणखी एक गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे भगवान शंकरानी याच ठिकाणी जरासुराचा वध केला तसेच श्री जरंडेश्वर मंदिर समर्थांनी बांधल्याचेही सांगितले जाते&period; या मंदिराचा सभामंडप सन १९३० च्या सुमारास दासगिरी महाराजांनी बांधला&period; या मंदिराचे बांधकाम घडीव दगडांचे असून याचा सभामंडप प्रशस्त असून त्याचे संपूर्ण रंगकाम करण्यात आले आहे&period;<br>श्री जरंडेश्वर या ठिकाणी येण्यासाठी चार मार्ग आहेत&period; पहिला मार्ग सातारामार्गे त्रिपुटी व पुढे जांबवरून यावे लागते&period; साताऱ्यापासून त्रिपुटीमार्गेवर चढण्यासाठी असणारी पाऊलवाट अवघड असली तरी सुरक्षित मानली जाते&period; या वाटेने मंदिरापर्यंत जाण्यासाठी सर्वात जास्त गर्दी असते&period; याच्या पायथ्याला वाहनतळासाठी मोठी जागा आहे&period; तेथे वाहने पार्क करून भक्तगण वर मंदिराच्या दिशने जातात&period; दुसरा मार्ग सातारा रोड पाडळीमार्गे असून या मार्गांनी येताना जवळपास १२०० पायऱ्या लागतात&period; या दोन्हीही मार्गावरून येताना वन विभागाच्या वतीने या परिसराचे सुशोभिकरण करण्यात आले आहे&period; जागोजागी पायऱ्या&comma; आजूबाजूला पक्ष्यांची माहिती देणारे फलक&comma; अधेमध्ये आकर्षक लाकडी बाक आहेत&period; तिसरा मार्ग शिवथरकडून भीमनगरमार्गे आहे तर चौथा मार्ग कोरेगावकडून येताना जळगाव मार्गे आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>वर आल्यानंतर डोंगरमाथ्यावर समोरच आपल्याला श्री हनुमानाचे मोठे मंदिर दिसते&period; कुठूनही वरती आले की प्रथम एक मोठे पिंपळाचे झाड आणि त्याच्याशेजारी एक चौथरा आहे&comma; त्या ठिकाणी आपण येतो&period; या ठिकाणी आल्यावर डोंगर चढताना होणारा त्रास&comma; अंगावर येणाऱ्या वाऱ्यामुळे अगदी नाहीसा होतो&period; या चौथऱ्याच्या बाजूला बाकोबा नावाच्या बोक्याचे एक छोटेसे स्मारक आहे&period; मंदिरासमोर सुमारे ३०० वर्षांपूर्वीची दीपमाळ आहे&period; मंदिर एक मीटर उंच चौथऱ्यावर बांधलेले असून गाभाऱ्यातील समर्थांनी स्थापलेली हनुमानाची मूर्ती स्वयंभू आहे&period; भोवताली गुलमोहोराची झाडे आहेत&period; आणखीही काही मंदिरे&comma; गोशाळा या परिसरात आहेत&period; मारूती मंदिरात महादेवाची पिंड आहे&period; या मंदिराचा सभामंडप शिवाय मंडपामध्ये जरंडेश्वरावर राहिलेल्या स्वामींच्या&comma; रामदास&comma; शिवाजी महाराज&comma; तुकाराम यांच्या सुबक मूर्ती आहेत&period; त्याचबरोबर पुराणातील आणि शिवचरित्रातील काही प्रसंगही या ठिकाणी रेखाटले आहेत&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>Jarandeshwar श्री जरंडेश्वर मंदिराच्या डावीकडील बाजूस असलेल्या एका खोलीमध्ये अत्यंत पुरातन काळातील मोठे जाते आहे&period; हे जाते प्रत्यक्षात सितामाईंनी वापरले असल्याचे सांगितले जाते&period; जरंडेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूला दासमारुतीचे छोटे मंदिर आहे&period; याच्यासमोरच श्रीराम मंदिर आहे&period; या मंदिराची उभारणी १८६२ च्या सुमारास काळोजीबुवांनी केली&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>या मंदिर बांधणीबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते&period; काळोजी बुवांना मंदिर &lpar;राम&rpar; जरंडेश्वराच्या पुढे बांधावे की मागे असा प्रश्न पडला&period; त्या वेळी त्यांना हनुमानाने दृष्टांत दिला आणि सांगितले की&comma; श्रीराम माझ्या पाठीशी असल्यामुळे त्यांचे हे मंदिर माझ्या मागच्याच बाजूस बांधण्यात यावे&period; हे राममंदिरही एका चौथऱ्यावर बांधलेले आहे&period; मंदिराच्या गाभाऱ्यात राम&comma; लक्ष्मण&comma; सीता यांच्या संगमरवरी मूर्ती आहेत&period; शिवाय गणेशाची एक छोटी मूर्ती आहे&period; मंदिराच्या बाहेरील मंडपामध्ये द्वारपालांच्या साडेपाच फुटी मूर्ती आहेत&period; राममंदिर आणि जरंडेश्वर मंदिर या दोन्हींची बांधणीही हेमाडपंथी पद्धतीची आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>राममंदिराच्या मागच्या बाजूला चुन्याचा घाणा आहे&period; याच्याजवळ मोठ्या आकाराचे पाच-सहा दगडी गोटे आहेत&period; जरंडेश्वराच्या उजव्या बाजूला मंदिराची देखरेख करण्यासाठी असणाऱ्या पुजाऱ्यांचा मठ आहे&period; श्रीराम मंदिराच्या मागे थोडे पुढे गेल्यानंतर उजव्या हाताला २०-२५ फूट पायऱ्या उतरून खाली उतरल्यानंतर एक घळ दिसते&period; येथे काळ्या पाषाणात एक चौकोनी गुहा तयार केलेली आहे&period; या ठिकाणी चार-पाच मोठे मोठे दगड नैसर्गिकरित्या एकमेकांवर अडकून तयार झालेली गुहा म्हणणे जास्त योग्य होईल&period; सध्या त्यामधे पादुका स्थापन केलेल्या आहेत&period; पूर्वीच्या काळी श्रीसमर्थ आपल्या जरडेश्वरावरील वास्तव्यात एकांतवासात प्रभू रामचंद्राचे स्मरण करण्यासाठी या घळीमध्ये येऊन बसत असत&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>यामध्ये आज एखादाच माणूस बसू शकेल एवढी जागा आहे&period; समर्थांच्या उपासनाघळींपैकी सर्वांत साध्या प्रकारची असणारी ही घळ आहे&period; इ&period;स&period; १६४५ साली याच घळीत समर्थ उपासनेसाठी आले असल्याची नोंद आहे&period; इ&period;स&period; १६५५च्या सुमारास जरंडेश्वरवरती छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांची भेट झाल्याचे सांगितले जाते&period; एवढेच नव्हे तर प्रभू रामचंद्र&comma; लक्ष्मण व शनिवार सीता यांनीही काही काळ येथे वास्तव्य केल्याचे सांगितले जाते&period; या देवस्थान परिसराच्या ठिकाणी अनेक साधुनी तपश्चर्या केली असल्याचेही सांगितले जाते&period; असे हे जरंडेश्वर स्थान खऱ्या अर्थाने पाहण्यासारखे आहे&period; जरंडेश्वर मंदिर परिसरात केवळ मंदिर व दोन-तीन छोट्या खोल्या आहेत&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>डोंगरावर जरंडेश्वर येथे पाऊलवाटेने चढत जात असताना हिरवीगार सृष्टी&comma; थंडगार हवा आणि उंचावरून खाली दिसणारी गावे मनाला भुरळ पाडतात आणि हे दृश्य अत्यंत विलोभनीय असते&period; वर चढून गेल्यावर मंदिराचा परिसराचा अत्यंत शांत व मनाला ताजेपणा देणारे वातावरण क्षणात भक्तांचा शीण घालवते&period; दर शनिवारी सातारा परिसरातून जरंडेश्वराच्या दर्शनाला आणि ट्रेकिंगचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी लोक येतात&period; डोंगरावर शुष्क&comma; खुरटी&comma; पानझडी झाडे विपुल प्रमाणात आहेत&period; दुर्मिळ वनौषधी आहेत&comma; रानभाज्या आहेत&period; प्रचंड जैवविविधता आहे&period; या देवस्थानास शासनाने &&num;8216&semi;ब&&num;8217&semi; वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा दिलेला आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>जरंडेश्वरवरून उतरत असताना मध्यातून डावीकडे गेल्यास थोड्या आतमध्ये बारा बैलांची गुहा आपल्याला पहावयास मिळते&period; गडावरील मंदिर बांधताना बैलांनी येथील दगड वाहून नेण्यास भरपूर मदत केली असे स्थानिक सांगतात&period; येथून पुढे गेल्यानंतर आपल्याला एक पाण्याचे तळे लागते&period; जरंडेश्वरवरून अजिंक्यतारा&comma; यवतेश्वर&comma; मेरूलिंग&comma; वैराटगड&comma; चंदन&comma; वंदन&comma; नांदगिरी&comma; वर्धनगड&comma; पाटेश्वर&comma; जनाई मळाई अशा बऱ्याच गड व डोंगर टेकड्या पहावयास मिळतात&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>सातारा ते जरंडेश्वर हे अंतर १५ कि&period;मी&period; असून साताऱ्याहून कोरेगावकडे जाताना त्रिपुटी हे गाव लागते&period; त्रिपुटीत गोपालनाथ महाराजांचे समाधी मंदिर आहे&period; त्याच्यालगतच खूप मोठा बांधीव तलाव आहे&period; बाजूला गोपालनाथ महाराजांचा मठ आहे&period; मठाच्या बाजूला एक विहीर आहे&period; त्रिपुटीतून जांब गावाकडे जाणाऱ्या मार्गावर हनुमानाची एक मोठी मूर्ती आहे&period; पुढे डावीकडे जांबकडे एक रस्ता जातो&period; त्या रस्त्याने जरंडेश्वरच्या पायथ्यापर्यंत गाडी जाते&period; गडावर पोचण्यासाठी ४५ मिनिटे लागतात&period; गडावर राहण्याची सोय होऊ शकते&period; सध्या डोंगरावर खाण्यापिण्याची सोय व्हावी म्हणून छोट्याश्या हॉटेलची व्यवस्था केलेली आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>भक्ती आणि शक्तीचे प्रतिक असणाऱ्या मारुतीरायाच्या दर्शनासाठी श्री क्षेत्र जरंडेश्वर डोंगर श्रावणात सर्वांनाच खुणावत असतो&period; डॉ&period; कमलसिंग क्षत्रिय व प्रा&period; सूर्यकांत अदाटे यांनी याअगोदर सातत्याने प्रा&period;संभाजीराव कदम महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्र सेना यांच्या माध्यमातून जरंडेश्वर डोंगरावर स्वच्छता तसेच प्लॅस्टिक संकलनाचे कार्य केलेले आहे&period; या ठिकाणी या कार्यात श्री जरंडेश्वर जीर्णोद्धार समिती आणि पाडळी येथील जेष्ठ नागरिक संघसुद्धा हिरीरीने कार्यरत असतो&period; <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>२५ जुलैपासून श्रावण महिना सुरु होत असल्याने २६ जुलै रोजी पहिला शनिवार येत आहे&period; श्रावणातील शनिवारी जरंडेश्वर दर्शनासाठी होणारी भक्तभाविकांची गर्दी लक्षात घेता &OpenCurlyQuote;स्वच्छता हीच सेवा’ या भावनेतून श्री क्षेत्र जरंडेश्वर मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नसून सामाजिक परिवर्तनाचे केंद्रही होऊ शकते&comma; याची जाणीव जनतेला झाली पाहिजे या दृष्टीकोनातून या स्वच्छतेच्या आणि प्लॅस्टिकमुक्तीच्या सामाजिक उपक्रमात जरंडेश्वर डोंगरावर येणाऱ्या स्थानिक नागरिक&comma; भक्तगण&comma; सामाजिक संस्था सहभागी होऊन जरंडेश्वर डोंगर कायमचा प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी त्यांनी आवाहन केलेले आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>&num;Jarandeshwar Temple &num;Jarandeshwar Temple in Satara &num;Jarandeshwar Temple in Maharashtra &num;&num;Jarandeshwar Temple Visit &num;Jarandeshwar Trek &num;Jarandeshwar Trek In Mansoon &num;Jarandeshwar Yatra In Shravan &num;Jarandeshwar Yatra Koregaon &num;Shravan Yatra Mahiti &num;Jarandeshwar Mahiti <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>हे पण आवर्जून वाचा <&sol;strong><a href&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;shikhar-shingnapur-shamhu-mahadev-mandir-&percnt;e0&percnt;a4&percnt;ae&percnt;e0&percnt;a4&percnt;b9&percnt;e0&percnt;a4&percnt;be&percnt;e0&percnt;a4&percnt;b0&percnt;e0&percnt;a4&percnt;be&percnt;e0&percnt;a4&percnt;b7&percnt;e0&percnt;a5&percnt;8d&percnt;e0&percnt;a4&percnt;9f&percnt;e0&percnt;a5&percnt;8d&percnt;e0&percnt;a4&percnt;b0&percnt;e0&percnt;a4&percnt;be&percnt;e0&percnt;a4&percnt;9a&percnt;e0&percnt;a5&percnt;87-&percnt;e0&percnt;a4&percnt;95&percnt;e0&percnt;a5&percnt;81&percnt;e0&percnt;a4&percnt;b2&percnt;e0&percnt;a4&percnt;a6&sol;" data-type&equals;"link" data-id&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;shikhar-shingnapur-shamhu-mahadev-mandir-&percnt;e0&percnt;a4&percnt;ae&percnt;e0&percnt;a4&percnt;b9&percnt;e0&percnt;a4&percnt;be&percnt;e0&percnt;a4&percnt;b0&percnt;e0&percnt;a4&percnt;be&percnt;e0&percnt;a4&percnt;b7&percnt;e0&percnt;a5&percnt;8d&percnt;e0&percnt;a4&percnt;9f&percnt;e0&percnt;a5&percnt;8d&percnt;e0&percnt;a4&percnt;b0&percnt;e0&percnt;a4&percnt;be&percnt;e0&percnt;a4&percnt;9a&percnt;e0&percnt;a5&percnt;87-&percnt;e0&percnt;a4&percnt;95&percnt;e0&percnt;a5&percnt;81&percnt;e0&percnt;a4&percnt;b2&percnt;e0&percnt;a4&percnt;a6&sol;">Shikhar Shingnapur Shamhu Mahadev Mandir -महाराष्ट्राचे कुलदैवत शिंगणापूरचे शंभू महादेव मंदिर<&sol;a><&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<div class&equals;"wp-block-media-text is-stacked-on-mobile" style&equals;"grid-template-columns&colon;15&percnt; auto"><figure class&equals;"wp-block-media-text&lowbar;&lowbar;media"><img src&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;07&sol;WhatsApp-Image-2025-06-24-at-10&period;34&period;39-AM-997x1024&period;jpeg" class&equals;"wp-image-1666 size-full"&sol;><&sol;figure><div class&equals;"wp-block-media-text&lowbar;&lowbar;content">&NewLine;<p><strong>लेखन &&num;8211&semi; सहा&period;प्रा&period;सुर्यकांत शामराव अदाटे<br>प्रा&period;संभाजीराव कदम महाविद्यालय&comma; देऊर<&sol;strong> &lpar;लेखक सहाय्यक प्राध्यापक म्हणून सेवारत असून अनेक दैनिकातून विपुल साहित्य लेखनाचा अनुभव&comma; गड- किल्ले व प्रवास भेटीची आवड&comma; लोकजीवन आणि लोकसंस्कृतीचे अभ्यासक आहेत&period;&rpar;<br>९९७५७५९३२५<&sol;p>&NewLine;<&sol;div><&sol;div>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><&sol;p>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: