High Court Kolhapur Bench :भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचे उद्घाटन

High Court Kolhapur Bench

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">• High Court Kolhapur Bench &colon; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस&comma; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे&comma; मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक आराधे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला शाही उद्घाटन समारंभ<&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">• High Court Kolhapur Bench &colon;सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परिश्रमातून अत्यल्प वेळेत हेरिटेज वास्तूला झळाळी<&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>High Court Kolhapur Bench मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचे उद्घाटन आज भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते फित कापून व कोनशिलेचे अनावरण करुन करण्यात आले&period; राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस&comma; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे&comma; व मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक आराधे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्किट बेंच इमारतीच्या उद्घाटनाचा भव्य सोहळा पार पडला&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>प्रमुख पाहुणे म्हणून सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर&comma; राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर&comma; खासदार शाहू महाराज छत्रपती&comma; खासदार धैर्यशील माने उपस्थित होते&period; यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती चंद्रशेखर&comma; सर्किट बेंचसाठी नियुक्त केलेले न्यायमूर्ती मकरंद कर्णिक&comma; न्यायमूर्ती शिवकुमार दिगे&comma; न्यायमूर्ती शर्मिला देशमुख&comma; न्यायमूर्ती एस&period; जी&period; चपळगावकर&comma; तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरे&comma; कोल्हापूर जिल्हा पालक न्यायमूर्ती मनीष पितळे&comma; न्यायमूर्ती अनिल किलोर तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती&comma; आमदार चंद्रदीप नरके&comma; आमदार शिवाजी पाटील&comma; ज्येष्ठ संपादक पद्मश्री डॉ&period; प्रतापसिंह जाधव&comma; जिल्हाधिकारी अमोल येडगे&comma; कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त के&period;मंजूलक्ष्मी&comma; विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी&comma; सार्वजनिक बांधकाम विभागाचे पुणे विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>कार्यक्रमाच्या सुरुवातीला पोलीस विभागाने उपस्थित मान्यवरांना गार्ड ऑफ ऑनर दिले&period; यानंतर सरन्यायाधीश भूषण गवई&comma; राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस&comma; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे&comma; मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक आराधे&comma; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या सह मान्यवरांनी सर्किट बेंच इमारत परिसराची पाहणी करुन झालेल्या कामाबद्दल कौतुक केले&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>सीपीआरच्या समोर असणाऱ्या या <strong>सर्किट बेंच <&sol;strong>इमारतीसाठी 46 कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाच्या वतीने मंजूर झाला आहे&period; जिल्हा प्रशासन&comma; महानगरपालिका&comma; सार्वजनिक बांधकाम विभाग&comma; पोलीस विभाग यांच्या समन्वयातून येथील इमारतींचे व या परिसराचे कमीत कमी वेळेत उत्कृष्ट पद्धतीने नूतनीकरण करण्यात आले आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>हेरिटेज इमारतींना सर्किट बेंचमुळे नवी झळाळी-<&sol;strong><&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>सीपीआर समोर असणारी जिल्हा न्यायालयाची इमारत सन १८७४ मध्ये बांधण्यात आली&period; जिल्हा न्यायालयाचा परिसर साधारण ४२०० चौरस फूट क्षेत्र आहे&period; कसबा बावडा येथील जागेत जिल्हा न्यायालयाची नवी इमारत स्थलांतरीत झाल्यामुळे ही इमारत बंद होती&comma; परंतू काही इमारतीमध्ये कौटुंबिक न्यायालयाचे काम करण्यात येत होते&period; या मूळ इमारतीचे अत्यंत कमी वेळेत नूतनीकरण करुन याच इमारतीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे कामकाज होत आहे&period; न्यायदानाची साक्ष देणाऱ्या हेरिटेज इमारतींना सर्किट बेंचमुळे नवी झळाळी मिळाली आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>सर्किट बेंचमुळे परिसराचा कायापालट-High Court Kolhapur Bench<&sol;strong><&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परिश्रमातून केवळ एका महिन्यात सर्किट बेंच इमारतींची डागडुजी आणि नूतनीकरण होत या परिसराचा कायापालट झाला आहे&period; यामुळे हा परिसर शहराच्या सौंदर्यात भर घालत आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>कामकाजाची वेळ-<&sol;strong><&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या कामकाजाची वेळ निश्चित झाली आहे&period; सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळता सर्व दिवस सकाळी 10&period;30 ते दुपारी 1&period;30 या वेळेत पहिले सत्र दुपारी 1&period;30 ते 2&period;30 मधली सुट्टी व त्यानंतर दुपारी 2&period;30 ते 4&period;30 या वेळेत दुसरे सत्र सुरु राहील&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>डिव्हिजन बेंचची व्यवस्था-<&sol;strong><&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>कौटुंबिक न्यायालयाच्या जुन्या हेरिटेज इमारतीत डिव्हिजन बेंचची व्यवस्था करण्यात आली आहे&period; या इमारतीत दोन्ही न्यायमूर्तींचे स्वतंत्र खासगी कक्ष आणि कार्यालयीन कक्ष आहेत&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>या परिसरात जुन्या हेरिटेज इमारतीत एक डीव्हीजनल बेंच आहे&period; तर आरसीसी इमारतीत 2 सिंगल बेंच आहेत&period; या इमारतीत रजिस्ट्रार कक्ष&comma; न्यायालयीन कामातील कर्मचाऱ्यांसाठी बसण्याची व्यवस्था&comma; रेकॉर्ड रुम करण्यात आली आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>विविध कार्यालये-<&sol;strong><&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर उजव्या बाजूच्या दुमजली इमारतीत सरकारी वकिलांची कार्यालये आहेत&period; या इमारतीसमोर असलेल्या छोट्या दुमजली इमारतीत काही सरकारी वकिलांची कार्यालये आहेत&period; परिसरात मध्यस्थी कक्ष करण्यात आला आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>राधाबाई बिल्डिंग-<&sol;strong><&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>ऐतिहासिक अशा राधाबाई बिल्डिंगमध्ये रजिस्ट्रार यांचे कार्यालय&comma; रेकॉर्ड रुम&comma; स्ट्रॉंग रुम व कार्यालये आहेत&period; नूतनीकरणामुळे या इमारतीच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे&period; या इमारतीमध्ये न्यायाधीशांसाठी लॉन्ज&comma; सरकारी वकिलांसाठी कक्ष तयार करण्यात आला आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांची सोय &&num;8211&semi;<&sol;strong><&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>या सर्किट बेंचमुळे कोल्हापूरसह सातारा&comma; सांगली&comma; सोलापूर&comma; रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 6 जिल्ह्यांतील नागरिकांना जलद आणि सुलभ न्याय मिळेल&period; या सर्किट बेंचमुळे पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांच्या वेळ&comma; श्रम व पैशांची बचत होईल&period; शिक्षण&comma; उद्योग&comma; व्यापार&comma; पर्यटन आदी विविध क्षेत्रांचा विकास साधला जाईल&period; या सर्किट बेंचमुळे कायद्याचे अभ्यासक&comma; वकिल व विद्यार्थ्यांना नवनवीन संधी उपलब्ध होतील&period; <&sol;p>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: