Get Together :तब्बल ३९ वर्षांनी गुरु-शिष्यांची अविस्मरणीय भेट

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading"><em>कृतज्ञता सोहळ्याच्या माध्यमातून <&sol;em> पार पडला रम्य सोहळा <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>Get Together &colon;श्री मुधाईदेवी विद्‌यामंदिर देऊरच्या सन १९८६ च्या दहावीच्या माजी विदयार्थ्यांचा गुरुजानाप्रती कृतज्ञता सोहळा व स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला&period; कार्यक्रमाचे प्रास्ताविक हसीना पटेल यांनी केले&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>श्री मुधाईदेवी विद्‌यामंदिर देऊरच्या सन १९८६ चे दहावीचे विद्यार्थ्यांचा कृतज्ञता सोहळा व स्नेहमेळावा कोमल ऍग्रो टूरीझम येथे आयोजित करण्यात आलेला होता&period; <&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>त्यावेळी गुरुजणांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना सातारामधील प्रतिथयश उद्‌योजक व संस्थेचे विश्वस्त&comma; माजी विदयार्थी इंजि&period;अरविंद कदम म्हणाले कि गुरू म्हणजे अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेऊन आपल्या विद‌या आपल्या विद्यार्थ्यांना मोठे करणारे ज्ञानपीठ होय&period; माणूस हा पैसा आणि प्रतिष्ठेने नव्हे तर आपल्या विचारांनी&comma; आपल्या ज्ञानाने मोठा होत असतो आणि हे ज्ञानदान करून विद‌यार्थ्यांना मोठे करणारे आमचे सर्व गुरुजन होते&period; त्यांनी आम्हा सर्वाना कितीही संकटे आली तरी जिद्द आणि चिकाटीने अडचणींचा सामना करून संघर्षपूर्ण परिस्थितीतून मार्ग काढण्याची शिकवण दिली त्यामुळेच त्यांच्यामुळेच आम्ही घडलो असे सांगितले&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>यावेळी बोलताना माजी मुख्याध्यापक श्री&period; विजयसिंह गायकवाड यांनी सांगितले कि सन १९८६ चे दहावीचे विद्यार्थी प्रामाणिक आणि अतिशय गरिबीतून वर आलेले असून त्यांनी कष्टाने&comma; समर्पणवृत्तीने अभ्यास असून आज यशस्वी झालेले आहेत&period; यांच्या जिद्दीचा प्रवास समाजासाठी प्रेरणादायी आणि आदर्शवत आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>यावेळी श्री मुधाईदेवी विदयामंदिर देऊरच्या सन १९८६ च्या दहावीच्या माजी विदयार्थ्यांनी आपल्या गुरुजणांप्रती कृतज्ञता व्यक्त करून Lifetime Satisfaction Award च्या स्वरूपात स्मृती चिन्ह&comma; शाल-श्रीफल व बुके देऊन सर्व गुरुजणांचा सत्कार करण्यात आला&period; या वेळी उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांचा गुलाबपुष्प व स्मृतीचिन्ह देऊन गुरुजणांच्या हस्ते सत्कार करण्यात आला&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>यावेळी श्री डांगे सर&comma; श्री&period;आर जी चव्हाण&comma; श्री&period;अशोक यादव&comma; श्री&period;आर बी सुतार&comma; श्री&period;गावडे सर या शिक्षकांनी आप‌ली मनोगते व्यक्त केली तसेच माजी विदयार्थ्यांच्या वतीने मनोगत व्यक्त करताना श्री&period; संजय राजे&comma; हसीना पटेल महेश एरंडे यांनी आपल्या शालेय जीवनातील तसेच दहावीच्या आठवणीना उजाळा देत आपल्या भावना व्यक्त केल्या&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>या अविस्मरणीय कृतज्ञता सोहळा व स्नेहमेळावा कार्यक्रमाचे प्रायोजकत्व व आयोजन श्री&period;अरविंद कदम&comma; श्री&period; जगन्नाथ देशमुख&comma; श्री&period; शिवाजी लोखंडे&comma; श्री&period; संजय कदम&comma; श्री&period; संजय राजे&comma; श्री&period;प्रसाद जंगम&comma; हसीना पटेल यांनी केले होते&period; या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री&period; लक्ष्मण कदम यांनी केले&period; या कार्यक्रमास सन १९८६ च्या दहावीच्या बॅचचे माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: