Health Camp- वाठार स्टेशनला मंगळवारी नेत्रचिकत्सा शिबीर

Health Camp- वाठार स्टेशनला मंगळवारी नेत्रचिकत्सा शिबीर

माजी खासदार ( कै.) लक्ष्मणराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजन

पिंपोडे बुद्रुक, ता.२४: माजी खासदार ( कै.) लक्ष्मणराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त वाठार स्टेशन (ता.कोरेगाव) येथे उद्या (मंगळवार) मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिर आयोजित करण्यात आले आहे. बुधराणी हॉस्पिटल (पुणे), मानव विकास संस्था तसेच आशीर्वाद हॉस्पिटल व समर्थ मेडिकल यांच्या पुढाकारातून हे शिबिर होईल. यावेळी गरजू रुग्णांना मोफत चष्मे दिले जाणार आहेत. खासदार नितीन पाटील यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन होणार असून आमदार सचिन कांबळे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होईल. पोलिस स्टेशनसमोरील आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये सकाळी दहा वाजता सुरु होणाऱ्या या शिबिराचा रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ.सुयोग लेंभे व सुहास जाधव यांनी केले आहे.

यावेळी डॉ. सुयोग लेंभे म्हणाले, सर्वसामान्य माणसासाठी खासदार लक्ष्मणराव पाटील तात्या यांनी आयुष्यभर कार्य केले. त्यांच्यामाध्यमातून अनेकांना सामाजिक करायची प्रेरणा व ऊर्जा मिळाली. त्यांनी दिलेल्या शिकवणीतून त्यांच्या विचाराचा वारसा पुढे चालवण्यासाठी आम्ही दरवर्षी या शिबिराचे आयोजन करतो. यावर्षी मंगळवार रोजी जयंतीदिनी हा कॅम्प होत असून गरजू रुग्णांनी याचा अवश्य लाभ घ्यावा.

Prabhukrupa Automobiles

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Top 10 Netflix Web Series to Watch Right Now (Feb 2026) Maharashtra kesari 2025 :पृथ्वीराज मोहोळ ६ ७ व्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी (Copy)