Maharashtra kesari 2025 :पृथ्वीराज मोहोळ ६ ७ व्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी

Maharashtra kesari 2025 :पृथ्वीराज मोहोळ ६ ७ व्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी

Maharashtra kesari 2025 सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला केले चितपट

आजोबांनंतर नातवाने जिंकली महाराष्ट्र केसरी गदा

वडिलांचे हुकलेले महाराष्ट्र केसरीचे स्वप्न लेकाने पूर्ण केले

Maharashtra kesari 2025 : अहिल्यानगर येथे सुरु असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पुण्याच्या पैलवान पृथ्वीराज मोहोळ याने सोलापूरच्या पैलवान महेंद्र गायकवाड याला चिटपट करीत कुस्तीक्षेत्रातील मानाचा ‘महाराष्ट्र केसरी’ बहुमान जिंकला. तो ६७ वा महाराष्ट्र केसरी बनला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते चांदीची गदा देऊन महाराष्ट्र केसरी सन्मान सुपूर्द करण्यात आला.

अहिल्यानगर येथील वाडिया पार्क येथे स्व. बलभीम आण्णा जगताप कुस्तीनगरी यंदाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली, गेल्या पाच दिवसापासून विविध गटात सामने पार पडले.

माती गटातील विजेता आणि मॅट मधील विजेता यांच्यात महाराष्ट्र केसरी साठी विजयी लढाई झाली. अंतिम सामन्यात पैलवान पृथ्वीराज मोहोळ आणि पैलवान महेंद्र गायकवाड यांच्यात अंतिम कुस्ती रंगली यामध्ये पै.पृथ्वीराज मोहोळ यांनी पै. महेंद्र गायकवाड यांचा दोन विरुद्ध एक गुणांनी पराभव केले. केवळ सहा सेकंद शिल्लक असतांनाच पै. महेंद्र गायकवाड याने मैदान सोडले. पै. पृथ्वीराज मोहोळ याने मानाचा महाराष्ट्र केसरी ‘किताब पटकवला.

आजोबांनंतर नातवाने जिंकली महाराष्ट्र केसरीची गदा

Maharashtra kesari 2025 महाराष्ट्र केसरी ‘किताब जिंकलेला पै. पृथ्वीराज मोहोळ हा पै. अमृत मोहोळ यांचा नातू आहे. आजोबा पै. अमृता मोहोळ हे नावाजलेले मल्ल होते त्यांनी १९९० साली वर्धा येथे झालेली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जिंकून मानाची गदा जिंकली होती त्यानंतर नातू पै. पृथ्वीराज मोहोळ याने ही स्पर्धा जिंकून पुन्हा महाराष्ट्र केसरीची गदा उंचावली. यामुळे एकाच घरात आजोबा व नातू यांनी महाराष्ट्र केसरी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. विशेष म्हणजे ज्यांनी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची स्थापना करुन महाराष्ट्र केसरी सुरुवात केली त्या मामासाहेब मोहोळ यांच्या मुठा गावातील आणि भावकीतील पै. पृथ्वीराज मोहोळ याचा वारसा आहे. त्याचे वडील राजेंद्र मोहोळ चुलते सचिन आणि सागर मोहोळ हे देखील नामांकित मल्ल आहेत.

FB IMG 1738517202834

६७व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत मानाची गदा पटकावत पै. पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता ठरला, तर उप महाराष्ट्र केसरी हा पै. महेंद्र गायकवाड ठरला.

महाराष्ट्र केसरी हा किताब पटकावल्याबद्दल पै. पृथ्वीराज मोहोळ यांस मानाची चांदीची गदा देऊन सन्मान केला गेला. यावेळी उपमुख्यमंत्री मा.श्री. अजितदादा पवार, केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधानपरिषद सभापती राम शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार अरुणकाका जगताप, संयोजक संग्राम जगताप यांच्यासह महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे पदाधिकारी, राज्यभरातील मल्ल आणि कुस्ती शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी केले अभिनंदन

स्पर्धेत पुण्याचा सुपुत्र, पैलवान पृथ्वीराज मोहोळ यानं महाराष्ट्र केसरी हा किताब पटकावला, मानाची गदा जिंकली. या उत्तुंग यशाबद्दल मी पृथ्वीराजचं मनापासून अभिनंदन करतो, त्याला पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो. यासारख्या रोमांचक खेळांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील क्रीडा संस्कृतीचं जतन केलं जातंय, याचं समाधान वाटतं. त्याचप्रमाणे अनेक युवा खेळाडूंना प्रेरणा देखील मिळते. संपूर्ण महाराष्ट्राला पृथ्वीराजचा सार्थ अभिमान आहे.

Murlidhar Mohol Dattatray Bharane Sangram Arunkaka Jagtap Ram Shinde

netsoft computer
netsoft computer

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Top 10 Netflix Web Series to Watch Right Now (Feb 2026) Maharashtra kesari 2025 :पृथ्वीराज मोहोळ ६ ७ व्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी (Copy)