ताजी बातमी: उबाठाला जय महाराष्ट्र, अहिल्यानगर जिल्हाप्रमुख आणि शिवसैनिक एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत दाखल,

अहिल्यादेवीनगर जिल्ह्यातील उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, जिल्हा संपर्कप्रमुख दिलीप सातपुते, शहरप्रमुख सचिन जाधव, युवासेना जिल्हाप्रमुख आकाश कतोरे यांच्यासह उबाठा गटाचे १२ नगरसेवक, माजी महापौर आणि शेकडो कार्यकर्त्यांनी उबाठाला जय महाराष्ट्र करीत आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. त्याचसोबत मुंबई तील शेकडो उबाठा कार्यकर्त्यांनीही हाती भगवा झेंडा घेत शिवसेनेत प्रवेश केला.
यात अहिल्यादेवी नगरचे माजी महापौर संजय शेंडगे, संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, स्थायी समिती सभापती गणेश कवडे, नगरसेवक सचिन शिंदे, श्याम नळकांडे, सुरेश तिवारी, संतोष ग्यानाप्पा, बबलू शिंदे, संग्राम कोटकर, दत्तात्रय कावळे, परेश लोखंडे, संदीप दातरंगे, कैलास शिंदे यांच्यासह उप शाखाप्रमुख, विभागप्रमुख आणि शाखाप्रमुख यांचा समावेश आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना भगवा हाती देऊन स्वागत केले यावेळी ते म्हणाले वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी अडीच वर्षांपूर्वी आम्ही ४० आमदारांसह उठाव केला होता. त्याची प्रचिती मागील अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून केलेल्या कामातून दिसली. त्यामुळेच अनेक पक्षांतील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. आज या १२ नगरसेवकांच्या प्रवेशाने अहिल्यादेवीनगर जिल्ह्यातील शिवसेना अधि मजबूत झाली आहे. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये महायुतीच्या सर्वाधिक जागा निवडून येतील असा विश्वास याप्रसंगी बोलताना व्यक्त केला. अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही यासमयी दिली.
यावेळी माजी खासदार राहुल शेवाळे, माजी नगरसेवक राम रेपाळे, शिवसेना प्रवक्त्या सौ.शीतल म्हात्रे, ज्येष्ठ माजी नगरसेविका तृष्णा विश्वासराव, राजुल पटेल तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Shisena #EknathShinde #Ahiyadevinagar #Mumbai #Maharashtra
Shivsena – शिवसेना Rahul Shewale – राहुल शेवाळे Ram Repale Sheetal Mukesh Mhatre – शीतल मुकेश म्हात्रे






