विद्यार्थ्यांनी स्पर्धेला धाडसाने सामोरे जावे: पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड

देऊर येथील श्री मुधाई देवी विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण प्रसंगी मार्गदर्शन
विद्यार्थ्यांनी आपल्यातील सुप्त कलागुणांचा विकास करून विविध क्षेत्रात यश संपादन करावे. शालेय जीवनामध्ये आपल्या आवडीचा छंद, खेळ यांची जोपासना करून पुढे त्या क्षेत्रात यश प्राप्त करावे. वाचनाची सवय लावावी, ज्ञान हे वाचनातून वाढत जाते. हे करीत असताना स्पर्धा आणि विविध परीक्षेत धाडसाने सहभागी व्हावे यामुळे जीवनाला दिशा मिळते असे प्रतिपादन मुंबई पोलीस निरीक्षक एटीएस श्री शैलेश गायकवाड यांनी केले.
देऊर (ता. कोरेगाव ) येथील श्रीमुधाई देवी विद्यामंदिर व श्री मारुतराव कृष्णाजी माने कनिष्ठ महाविद्यालय देऊरच्या वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते, अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष देवेंद्र कदम होते. याप्रसंगी माजी विद्यार्थी,नवी मुंबई पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह चव्हाण यांनी आपल्या मनोगतात माझ्या जीवनाच्या जडणघडणीत शाळेचा सिंहाचा वाटा आहे. विद्यार्थ्यांनी शाळेतील संस्काराच्या शिदोरीवर आपल्या जीवनाची प्रगती करावी. अध्यक्षीय भाषणात देवेंद्र कदम म्हणाले माजी विद्यार्थी हे शालेय विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे असतात. जीवनात अपयश आले तरी खचून न जाता पुन्हा पुन्हा प्रयत्न करून, जीवन यशस्वी करावे. माजी विद्यार्थिनी व पोलीस उपनिरीक्षक पुणे पूजा माळी रासकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. श्री मुधाईदेवी शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री हणमंतराव कदम उपस्थित होते. विश्वस्त श्री संजीव कदम उपस्थित होते. “शालेय बगीचा विकसन प्रकल्प”भूमिपूजन तडवळे (सं.वाघोली) उपसरपंच राहुल भोईटे यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी विद्यार्थी अभिजीत पवार उपस्थित होते. या कार्यक्रमात “फनी गेम्स” चे उद्घाटन डॉ. शुभम लोखंडे यांच्या हस्ते झाले. श्री मा. कृ. माने. कनिष्ठ महाविद्यालय विज्ञान सल्लागार समितीचे अध्यक्ष राजाराम कदम उपस्थित होते. यावेळी माजी विद्यार्थिनी वैशाली पवार उपस्थित होत्या. ” सृजनाविष्कार दालनाचे”उद्घाटन रतन शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी श्री मुधाईदेवी शिक्षण संस्थेचे सचिव राजेंद्र कदम उपस्थित होते. “हस्तकला दालनाचे”उद्घाटन कल्पेश भोज यांच्या हस्ते झाले.यावेळी श्री. मुधाईदेवी शिक्षण संस्थेचे विश्वस्त धनसिंग कदम उपस्थित होते. “संस्कृती कलादर्शन दालनाचे” उद्घाटन ओंकार चव्हाण यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी “भारतीय व्यायाम दर्शन”लेझीम पथकाचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. इयत्ता 5वी ते 12वी पर्यंतच्या सर्व शाखामधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. तसेच कला क्रीडा व शाळाबाह्य वि्विध स्पर्धेमधील यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. तसेच या वर्षाचा उत्कृष्ट खेळाडू म्हणून सुरज माने व आदर्श विद्यार्थिनी म्हणून कु.हिंदवी कुचेकर यांचा विशेष गौरव करण्यात आला. सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून कु. संचिता शिंदे हिचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी “सफर सह्याद्रीची” या हस्तलिखिताचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. विद्यालयातील विद्यार्थ्यांचा”विविध गुणदर्शनाचा सांस्कृतिक कार्यक्रमाला” संपन्न झाला.या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी विद्यार्थिनी चेतना चव्हाण-लोहार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे विश्वस्त प्रवीण कदम, विज्ञान सल्लागार समितीचे सदस्य सतीश देशमुख, वाठार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गहिनीनाथ सातव, कविता देशमुख, मा.प्राचार्य उत्तमराव महामुलकर उपस्थित होते. या कार्यक्रमास मा.प्राचार्य विजयसिंह गायकवाड, नितीन भंडारी, पर्यवेक्षक सुरेश निंबाळकर, कार्यवाह संजय भोईटे, विद्यार्थी प्रतिनिधी निखिल करपे, विद्यार्थिनी प्रतिनिधी कु.साजमा सय्यद, शिक्षक प्रतिनिधी मनेश धुमाळ, शिक्षिकेतर प्रतिनिधी अशोक कदम, पंचक्रोशीतील पालक वर्ग, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी,उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य प्रदीप ढाणे यांनी केले. सूत्रसंचालन प्रसाद गायकवाड व प्रा.नंदकुमार शेडगे यांनी केले. पर्यवेक्षक ज्ञानेश्वर देशमुख यांनी आभार मानले.






