छञपती संभाजी महाराज पतसंस्थेच्या सभासदांना दसऱ्याची लाभांश भेट

दसऱ्याचे शुभमुहूर्तावर सभासदांच्या खात्यावर जमा करण्यास प्रारंभ

पश्चिम महाराष्ट्रात ५५ शाखांचा विस्तार करीत सर्वांचा विश्वास संपादन केलेल्या पिंपोडे बुद्रुक ता.कोरेगाव येथील छञपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेने ३५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जाहीर केल्याप्रमाणे संस्थेच्या सर्व सभासदांना ६ टक्के लाभांश वाटपाचा शुभारंभ दसऱ्याचे शुभमुहूर्तावर करण्यात आला आहे.सालाबादप्रमाणे याहीवर्षी दसऱ्याचे शुभमुहूर्तावर सर्व सभासदांच्या बचत ठेव खाती ६ टक्के लाभांशाची रक्कम जमा करण्यास प्रारंभ करण्यात आल्याची माहिती संस्थेचे संस्थापक रामभाऊ लेंभे यांनी दिली.
ग्रामीण भागात स्थापन होऊन शहरांकडे झेपावणाऱ्या छञपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेस सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षांत ६ कोटी ६३ लाख ढोबळ नफा झाला असून आवश्यक तरतूदी वजा जाता निव्वळ नफा ४ कोटी १ लाख ४८ हजार झालेला आहे.त्यातून सभासदांना ६ टक्के लाभांश वाटणी करण्याची शिफारस संचालक मंडळाने केली होती.३५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यास सभासदांनी एकमताने मंजूरी दिली आहे.गतवर्षीच्या संमिश्र व्यवसायात १६८ कोटी ८७ लाखांची वाढ होऊन ३१ मार्च २०२४ अखेर संस्थेचा संमिश्र व्यवसाय ११६५ कोटी ४ लाख झालेला आहे.
अडीचणीतील १५ पतसंस्थांचे विलिनीकरण करुन ठेवीदारांना दिलासा देणाऱ्या ,आय.एस.ओ.मानांकित छञपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेचे गतिमान कामकाज सक्षम बँकेप्रमाणेच संगणकीकृत असून मोबाईल बँकिंग सुविधा उपलब्ध असल्याचे सांगून संस्थापक रामभाऊ लेंभे यांनी संस्थेकडे ३० सप्टेंबर २०२४ अखेर ठेवी ७०६ कोटी ४८ लाख , कर्जवाटप ५४५ कोटी २१ लाख,गुंतवणुक १९७ कोटी ०२ लाख,खेळते भांडवल ७९० कोटी ६५ लाख,सभासद संख्या ७३९२४,संमिश्र व्यवसाय १२५१ कोटी ६९ लाख असल्याचे नमूद केले.यावेळी संस्थेचे चेअरमन डाॅ.सोपानराव चव्हाण, व्हाईस चेअरमन श्रीकांत शेटे,संचालक सुरेशबापू साळुंखे,अशोकराव लेंभे,रावसाहेब लेंभे,तात्यासाहेब ढमाळ, हणमंत निकम,जयवंत घोरपडे,संजय भोसले,भरत साळुंखे,गौतम कांबळे,सौ.उषा अशोकराव पवार, श्रीमती सुलभा अरूण साळुंखे,सतिश बिचुकले, नारायण सोनावणे,कार्यकारी संचालक भावेश ढमाळ, अधिकारी,सेवक उपस्थित होते.





