Breaking News सातारा–लोणंद महामार्गावर निकृष्ट कामाचा उद्रेक; सेना भाजपने केला रस्तारोको, काम बंदचा इशारा

Breaking News संताप अनावर; अधिकाऱ्यांसमोर कामाची केली पोलखोल
Breaking News काम उखडून टाकू! — बैठकीशिवाय काम सुरू केल्यास आंदोलन तीव्र होणार
सातारा–लोणंद राष्ट्रीय महामार्गाचे तथाकथित “विकासकाम” प्रत्यक्षात ठेकेदारांच्या मुजोरपणामुळे धोक्याचा सापळा ठरत असल्याचा आरोप करत ग्रामस्थ आज रस्त्यावर उतरले. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून, आता सहनशक्ती संपली आहे, असा थेट इशारा अंबवडे संमत वाघोली येथे सेना भाजपच्या कार्यकत्यांनी व कार्यकर्त्यांनी दिला.
गेल्या वर्षांपासून सुरू असलेले महामार्ग रुंदीकरणाचे काम हरियाणाच्या के सी पी एल कंपनीकडे देण्यात आले आहे. मात्र कामाच्या पहिल्या दिवसापासूनच दर्जाहीन बांधकाम, अर्धवट नाल्या, कमी जाडीचे स्लॅब आणि निष्काळजीपणा यामुळे अपघातांची मालिका सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
रस्त्याच्या दुतर्फा बांधलेल्या भल्या मोठ्या नाल्यांना योग्य मजबुती न दिल्याने त्यात वाहने अडकत असून, परिसरातील ऊस शेती, शाळा, व्यवसायिक ठिकाणे अक्षरशः धोक्याच्या छायेत आली आहेत. “हे विकासकाम नाही, तर मृत्यूचा सापळा आहे,” अशा तीव्र शब्दांत नागरिकांनी संताप व्यक्त केला.
या पार्श्वभूमीवर सेना–भाजप नेत्या अरुणा बर्गे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.या पार्श्वभूमीवर सेना-भाजप नेत्या अरुणा बर्गे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनात भाजपा तालुकाध्यक्ष निलेश यादव, शिवसेना तालुकाध्यक्ष संजय काटकर, तालुकाउपप्रमुख चंद्रकांत पवार, ऍड. संजय सकुंडे, प्रशांत पवार, धनाजी मोहिते, मनोज गाढवे, किरण सकुंडे, प्रदीप कदम, तानाजी गोळे, प्रवीण कदम, सुरज मोरे, पोपट दिघे, शेखर पिसाळ, देवेंद्र कदम यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. संतप्त जमावाने राष्ट्रीय महामार्ग विभाग व ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना रस्त्यावरच घेराव घालत जाब विचारला. प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी नेऊन निकृष्ट कामाची उघड पोलखोल करण्यात आली. यावेळी अधिकारी यांनी गोलमाल उत्तरे देण्याचा प्रयत्न केला.
यावेळी National Highways Authority of India (NHAI) चे अधिकारी सुभाष घंटे तसेच केसीपीएलचे अजित शिंगटे यांच्याशी तीव्र शाब्दिक चकमक झाली.
ग्रामस्थांचा ठाम इशारा
आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्व गावकऱ्यांसमवेत तातडीची बैठक घेतल्याशिवाय एकही मशीन रस्त्यावर उतरू देणार नाही. जर जबरदस्तीने काम रेटून नेण्याचा प्रयत्न झाला, तर झालेलं काम उखडून टाकू आणि त्यातून होणाऱ्या सर्व नुकसानीस ठेकेदार कंपनी व NHAI जबाबदार असतील, असा थेट इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.
प्रशासन झोपेत आहे का? — ग्रामस्थांचा सवाल
वारंवार तक्रारी करूनही तसेच हा मार्ग ज्या गावातून जातोय त्या तडवळे, वाठार स्टेशन , देऊर , पिपोडे खुर्द, अंबवडे या सर्वच गावात ठेकेदाराने मनमानी करीत काम सुरु केले आहे. ना कोणता प्लॅन दाखवत आहे कि नियोजन नाही . केलेल्या कामाचा दर्जा अति सुमार असून यावर गेल्या पाच महिन्यात प्रत्येक गावात आंदोलन झाले आहे मात्र कंपनी याकडे दुर्लक्ष्य करीत आहे. आता आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.
Breaking News, Satara Lonand Highway Protest, Koregaon Breaking News, Ambavade Wagholi Rasta Roko, NHAI Road Work Scam, KCPPL Company Issue, Maharashtra Highway News, Road Accident Risk, Local Protest News
हे पण वाचा सातारा–लोणंद राष्ट्रीय महामार्गात निकृष्ट कामाचा संताप!राष्ट्रवादीने केला रास्ता रोको, काम उखडण्याचा इशारा





