Hindu Muslim Unity Example in India बनवडी गावाने जपला हिंदू मुस्लिम ऐक्याचा वसा 

Hindu Muslim Unity Example in India बनवडी गावाने जपला हिंदू मुस्लिम ऐक्याचा वसा 

हजरत दर्गा संदल व नवरात्री मिरवणुकीची अभूतपूर्व भेट

पोलिसांच्या पुढाकाराने घडला ऐतिहासिक संगम ; एकीचे दुर्मिळ दर्शन- ग्रामस्थांनी केला एकीचा जागर 

सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने यांच्या प्रयत्नांना यश – गावात धार्मिक ऐक्याचा नवा अध्याय

Hindu Muslim Unity Example in India बनवडी (ता. कोरेगाव) गावाच्या इतिहासात कधीही न घडलेला अभूतपूर्व प्रसंग शुक्रवारी बनवडी येथे अनुभवायला मिळाला. हजरत पीर दस्तगीर दर्ग्याची संदल मिरवणूक आणि बनवडी सार्वजनिक नवरात्री उत्सव मंडळाची मिरवणूक यांची ऐतिहासिक भेट पहिल्यांदाच  घडून आली. या दुर्मिळ संगमाचे श्रेय पोलिस प्रशासनाच्या पुढाकाराला जाते.बनवडी गावाने जपला हिंदू मुस्लिम ऐक्याचा वसा एकीचे दुर्मिळ दर्शन देत  ग्रामस्थांनी केला एकीचा जागर केला. Banwadi village Hindu Muslim unity

सालाबाद प्रमाणे बनवडी येथे हजरत पीर दस्तगीर दर्ग्याचा उरूस संपन्न झाला याची संदल मिरवणूक बनवडी गावात निघते यावर्षी संदल मिरवणूक आणि बनवडी सार्वजनिक नवरात्री उत्सव मंडळाची मिरवणूक हि एकाचवेळी एकाच दिवशी आली अशा वेळी ग्रामस्थांनी एकीचे अद्भुत दर्शन घडवीत गावाच्या एकीचा वारसा पून्हा अधोरेखित केला व सामाजिक सलोख्याचा आदर्श घालून दिला. दोन्ही मंडळीनी एकत्र येत शिवगर्जना केली व एकमेकांचा श्रीफळ शाल देऊन सन्मान केला. यावेळी अबालवृद्ध ग्रामस्थ यांनी हजेरी लावत जयजयकार केला. 

वाठार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने यांच्या समन्वयातून व प्रयत्नातून दोन वेगळ्या धार्मिक परंपरांच्या मिरवणुका एकत्र आल्या आणि बंधुता, ऐक्य व सौहार्दाचे दर्शन घडले. गावातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत या घटनेला उत्साहाचे स्वरूप दिले.

ज्येष्ठ नागरिकांच्या मते, यापूर्वी बनवडीच्या इतिहासात असे दृश्य कधीही पाहायला मिळाले नव्हते. दोन्ही समाज एकत्र आल्यामुळे गावात सामाजिक ऐक्याचे नवे पर्व सुरू झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.ही घटना फक्त बनवडीपुरती मर्यादित न राहता संपूर्ण परिसरात धार्मिक सौहार्द व सामाजिक सलोख्याचा संदेश पसरवणारी ठरली आहे. पोलिसांच्या मध्यस्थीमुळे गावात शांतता, बंधुता आणि मैत्रीचे नवे बीज रुजले आहे.

गावकऱ्यांनी एकमुखाने पोलिस प्रशासनाचे आभार मानले असून, “हेच खरे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहेआणि बनवडी गाव याचा आदर्श वस्तुपाठ आहे ,” अशा शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली. Communal harmony example in Maharashtra

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Top 10 Netflix Web Series to Watch Right Now (Feb 2026) Maharashtra kesari 2025 :पृथ्वीराज मोहोळ ६ ७ व्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी (Copy)