Ganesh Festival देऊरच्या जाणता राजा मित्र मंडळाचा प्रबोधनाचा जागर

Ganesh Festival गणपती उत्सवात कीर्तनसेवेचा उपक्रम
जाणता राजा मंडळाचे कार्य प्रेरणादायी- संदीप महाराज गुरव
डॉल्बीमुक्त व गुलालविरहित मिरवणुकीचीही जपली जाते परंपरा
Ganesh Festival देऊर (ता . कोरेगाव ) येथील जाणता राजा मित्र मंडळाने आपल्या परंपरेनुसार यंदाच्या गणेशोत्सवातही अनावश्यक खर्चाला फाटा देत सामाजिक प्रबोधनाचा जागर केला आहे. डॉल्बीमुक्त व गुलालविरहित मिरवणुकीची परंपरा कायम राखत असताना यंदापासून उत्सवात कीर्तनसेवेचे पर्व सुरु केले आहे, युवा संघटन करीत सुरु असलेले जाणता राजा मित्र मंडळाचे कार्य प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन युवा कीर्तनकार संदीप महाराज गुरव यांनी केले
देऊर (ता.कोरेगाव) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांच्या कीर्तनसेवेने यंदाच्या गणेशोत्सवात प्रबोधनाचा हरी जागर करण्यात आला यावेळी ते बोलत होते. यावेळी संदीप महाराज गुरव म्हणाले १९९५ साली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये असलेल्या स्थापन झालेल्या जाणता राजा मित्र मंडळाने मंडळाच्या स्थापनेपासून सामाजिक कामाचा वारसा जपला आहे. वृक्षारोपण, नेत्रचिकित्सा शिबीर, रक्तदान शिबीर असे उपक्रम दरवर्षी राबवले जातात अशावेळी यंदापासून कीर्तनसेवेचे नवे प्रबोधनपर्व सुरु केले आहे. यामाध्यमातून समाजप्रबोधनाची परंपरा सुरु केली आहे. या माध्यमातून महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार या व्यासपीठावर सेवा देतील यातून समाजाची सेवा घडेल.
Ganesh Festival युवकांनी समाजासाठी कार्य करीत असताना सर्वसामान्य माणसाचे जीवन कसे आनंददायी होईल यासाठी पुढाकार घ्यावा, संतांची शिकवण हि माणूस जोडणारी आहे आहे अशावेळी माणूस जोडत जात सुंदरशा समाजाच्या निर्मितीला आपल्यापासून सुरुवात करावी, देऊर मधील युवकांनी ठरवलं तर ते गावचा चेहरा बदलविण्याची ताकद ठेवतात त्यांना जेष्ठानी सहकार्य करावे असे सांगून दिशा दिली .
यावेळी जंगली महाराज आश्रमाचे मठाधिपती ब्रम्हानंद महाराज, युवा कीर्तनकार योगेश महाराज यादव, कृष्णा महाराज वाघ, गुरुदत्त महाराज गुरव, दत्ता महाराज कोलगुडे, आशिष महाराज नावडकर, युवा कीर्तनकार रोहिदास महाराज मालुसरे, तुकाराम महाराज जानुगडे, ज्ञानेश्वर कदम, घाडगे महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी कीर्तनसेवेचे संयोजक सागर कदम यांच्या हस्ते संदीप महाराज गुरव यांचा सन्मान करण्यात आला. सोहळ्यासाठी जाणता राजा मित्र मंडळाचे अध्यक्ष रोहित पवार, उपाध्यक्ष तेजस कदम, किशोर शिंदे, अजय कर्पे, महेश शिंदे, शंकर हातरके, विकास हातरके, अतुल रानभरे, मयूर राजे, समीर कदम, श्रीधर पोळ, सोमनाथ जंगम, महेश राजे, शुभम राजे, मयूर कदम, शंभूराज पवार, जय पवार, सोन्या पवार, अतुल रानभरे, ओंकार जंगम, गणेश शिंदे, वैभव कदम, अरुण पालकर, ओंकार वेळेकर,आशिष पवार, सौरभ पवार, अधिक शिंदे, अक्षय ओझर्डे, राजू कदम, वैभव राजे, शशिकांत पवार, योगेश पवार, जितेंद्र पवार, प्रमोद पालकर, विजय पवार, तेजस भंडारी, विश्वनाथ राजे व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. सागर कदम यांनी स्वागत माधव भोईटे यांनी प्रास्ताविक केले. पत्रकार प्रकाश राजे यांनी सूत्रसंचालन करीत आभार मानले.





