Satara News :त्या मुजोर तलाठ्यावर कडक कारवाई करा, सातारा जिल्ह्यातील पत्रकारांची एकमुखी मागणी

Satara News :त्या मुजोर तलाठ्यावर कडक कारवाई करा, सातारा जिल्ह्यातील पत्रकारांची एकमुखी मागणी

Satara News पालकमंत्री, जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर,

Satara News कोरेगाव येथील पत्रकार नवनाथ तुकाराम पवार यांना तलाठी प्रशांत प्रकाश पवार याने केलेल्या मारहाणीची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची ग्वाही आज पालकमंत्री शंभूराज देसाई व पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली.

कोरेगाव येथील पत्रकार नवनाथ पवार यांना “मटक्याची बातमी का लावलीस ?”अशी विचारणा त्यांची गाडी अडवून तलाठी प्रशांत पवार याने मारहाण केल्याप्रकरणी कोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. मात्र, तो जुजबी असून, या तलाठ्यावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक करून कडक कारवाई करण्याची मागणी आज कोरेगाव तालुका, सातारा शहर, सातारा तालुका पत्रकार संघ, कोरेगाव व सातारा शहर इलेक्ट्रोनिक मीडिया संघटनांच्या वतीने पालकमंत्री श्री. देसाई, पोलिस अधीक्षक श्री. दोशी व अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांची स्वतंत्ररित्या भेट घेऊन निवेदनाद्वारे करण्यात आली. त्यावर श्री. देसाई, श्री. दोशी बोलत होते. या वेळी मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष शरद काटकर, नवनाथ पवार, डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे राज्य समन्वयक गणेश बोतालजी, माजी जिल्हाध्यक्ष व साप्ताहिक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजय कदम, कोरेगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हणमंतराव बर्गे, सातारा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अजय कदम, संतोष नलवडे, अजित जगताप, राहुल ताटे, निलेश रसाळ आदी प्रमुख पत्रकार उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, नवनाथ पवार हे कोरेगाव तालुक्यात डिजिटल सोशल मिडिया व साप्ताहिकात बातमीदार म्हणून काम करत आहेत. शुक्रवारी (२२ऑगस्ट) सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास “तु मटक्याची बातमी का लावली?” अशी विचारणा त्यांना तलाठी प्रशांत पवार याने मारहाण केली. याबाबत तलाठी पवार याच्यावर कोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे. परंतु, पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केलेला नाही. प्रशांत पवार हा महाराष्ट्र शासनाचा कर्मचारी असून, तो महसुल खात्यात तलाठी या पदावर कार्यरत आहे. तसेच तो कोरेगावमध्ये मटक्याचा अवैध धंदा करत आहे. याबाबतची माहिती कोरेगाव पोलीस ठाण्याला आहे. परंतु, त्याचेवर अद्यापपर्यंत एकही गुन्हा दाखल नाही. तसेच त्यास प्रशासन व पोलीस खाते संरक्षण देत आहे. तो शहरात दहशत माजवून चुकीच्या पध्दतीने अवैध स्वरुपाचे धंदे करत आहे. अशा अपप्रवृत्तीस कोरेगावचे पोलीस प्रशासन संरक्षण देत आहे.
Satara News महाराष्ट्र शासनाच्या वतीने मंत्री नितेश राणे यांनी मटक्याचे धंदे राज्यात बंद करण्याबाबत मोहीम राबवली आहे. परंतु, कोरेगाव शहरातील मटक्याचा धंदा बंद होत नाही. तसेच प्रशांत पवार याने त्याच्या पदाचा दुरुपयोग, केलेला आहे. कर्तव्यात कसुर केली आहे. त्यामुळे त्याला निलंबीत करुन त्याचेविरुध्द अवैध मटक्याचा व्यवसाय करीत असल्याबाबत गुन्हा दाखल करावा अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडावे लागेल. निवेदन स्वीकारल्यावर पालकमंत्री श्री.
देसाई यांना नवनाथ पवार त्यांनी मारहाणीचा वृत्तांत सांगितला. त्यावर श्री. देसाई यांनी पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांना बोलवून घेत पत्रकार नवनाथ पवार यांना तलाठी प्रशांत पवार याने केलेल्या मारहाणीच्या ठिकाणी सीसीटिव्ही फुटेज आहे किंव्हा कसे हे पाहून प्रकरणाचा सखोल तपास करून तात्काळ योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलिस अधीक्षक श्री. दोशी यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे. अजून सर्व कागदोपत्री सविस्तर माहिती घेऊन पत्रकार संरक्षण कायद्याचे कलम मूळ गुन्ह्यात वाढवता येत असेल तर ते वाढवून पुढील कारवाई तातडीने करण्याच्या सूचना पोलिस निरीक्षकांना देण्याची ग्वाही पत्रकारांना दिली.

यावेळी निलेश रसाळ, सचिन कदम, सचिन मस्के,संदीप माने, वैभव बोडके,ओंकार सोनवले,
पांडुरंग बर्गे, प्रकाश गायकवाड, सोमनाथ शिंदे, अजमुद्दिन मुल्ला, दादा वाकडे, अधिक बर्गे, सतीश गायकवाड आदी उपस्थित होते.

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Top 10 Netflix Web Series to Watch Right Now (Feb 2026) Maharashtra kesari 2025 :पृथ्वीराज मोहोळ ६ ७ व्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी (Copy)