CRIME NEWS: करमाळा पोलिसांच्या हातावर तुरी, आरोपी झाला पसार

CRIME NEWS: करमाळा पोलिसांच्या हातावर तुरी, आरोपी झाला पसार

CRIME NEWS सातारा जिल्ह्यातुन घेतला होता गुन्हेप्रकरणी ताब्यात

CRIME NEWS वाटेत जेवणाला थांबले आणि आरोपी पळाला

CRIME NEWS तडवळे समंत वाघोली ता. कोरेगाव गावच्या हद्दीत लघुशंकेला व जेवणाला थांबलेल्या करमाळा जि. सोलापूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात असणारा आरोपीने पोलिसाच्या हाताला हिसका देऊन, धूम ठोकत पसार झाल्याची घटना घडली आहे. या धक्कादायक घटनेत पोलिस अधिकाऱ्यालाच आरोपीच्या प्रतिकाराचा सामना करावा लागला.

यांबाबत वृत्त असे की,वाठार पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्हा रजिस्टर नं. 207/2025 नुसार हा प्रकार दि. 21 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडला. यामुळे एकच खळबळ उडाली.
फिर्यादी रोहित चंद्रसेन शिंदे (वय 38, सहाय्यक पोलिस निरीक्षक, सध्या करमाळा पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण) हे जेवणासाठी आणि लघुशंकेसाठी फौजी ढाब्याजवळ थांबले असता, आरोपी सागर राम गायकवाड (वय 24, मूळ रा. निपाणी-वडगाव, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर, सध्या रा. मत्यापूर, जि. सातारा) याने आपल्याविरुद्ध सुरू असलेल्या कारवाईत अटक होऊ नये, याकरिता आरोपीने पाऊस व चिखल तसेच अंधाराचा आणि ऊसाच्या शेतीचा फायदा घेत,पोलीस कॉन्स्टेबल रामगुडे व फिर्यादी अधिकारी यांच्या हाताला हिसका देऊन घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकारामुळे गायकवाड याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 262 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास ग्रेड पोलीस उपनिरीक्षक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. आरोपीचा शोध तीव्र करण्यात आला असून, वाठार पोलीस ठाण्याचे सपोनि श्री.अविनाश माने यांनी भेट देऊन पाहणी केली.
सदर प्रकरणामुळे पोलिस दलालाही सतर्कतेचा इशारा मिळाला असून, आरोपीच्या धाडसी पलायनाने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Top 10 Netflix Web Series to Watch Right Now (Feb 2026) Maharashtra kesari 2025 :पृथ्वीराज मोहोळ ६ ७ व्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी (Copy)