वाठार स्टेशनला कामगार संघटनेकडून पत्रकारांचा सन्मान

वाठार स्टेशनला कामगार संघटनेकडून पत्रकारांचा सन्मान

कामगार बहुद्देशीय संघटनेचा वर्धापनदिनी विविध कार्यक्रम

सामाजिक संघटनांच्या कार्याचाही केला गौरव

वाठार स्टेशन (ता . कोरेगाव ) येथील कामगार बहुद्देशीय संस्थेच्या चौथ्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने कामगारांच्या विविध प्रश्नावर सातत्याने आवाज उठवणाऱ्या भागातील सर्व पत्रकार बांधवांचा सन्मान करीत नवीन उपक्रम राबवला गेला याचबरोबर सामाजिक मंडळांच्या कार्याचाही गौरव कामगार संघटनेकडून करण्यात आला .

वाठार स्टेशन येथील राधाकृष्ण मंगल कार्यालयात कामगार बहूद्देशीय संघटनेच्या चौथ्या वर्धापनदिनाच्या आयोजन करण्यात आले होते. यावेळी वाठार पोलीस ठाण्याचे सपोनि अविनाश माने, शिवसेना जिल्हाउपप्रमुख अविनाश फडतरे Avinash Phadtare , कामगार कल्याण अधिकारी सुनील कांबळे, निलेश भोईटे, सचिन जाधव, शिवसेना वाहतूकसेने जिल्हाउपाध्यक्ष विशाल जाधव, घिगेवाडी सरपंच नारायण सावंत, संस्थेचे अध्यक्ष सचिन टिके यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष सचिन टिके यांनी कामगार संघटनेचे कार्य व कामकाज विशद करून संस्थेच्या चार वर्षातील कार्याचा आढावा मांडला. सोहळ्यात बांधकाम कामगार बहुद्देशीय संघटनेच्या वतीने भागातील विविध दैनिकांच्या पत्रकारांना रणजित लेंभे, तेजस लेंभे,संजय कदम, शैलेश धुमाळ, कमलाकर खराडे, रेवण महाजन, मुकुंदराज काकडे, संदीप पवार, विजय कुमार दोरके, जलालभाई पठाण, प्रकाश राजे यांचा समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले. तसेच पिंपोडे जिमखाना व वाठार येथील सामाजिक संस्था यांनाही गौरवण्यात आले.

यावेळी वाठार पोलीस ठाण्याचे सपोनि अविनाश माने म्हणाले कामगार हे असंघटित असतात त्यांना एकत्र करून त्यांच्या संघटना चालवणे हे कार्य कौतुकास्पद आहे यामुळे कामगारांच्या विकासाला चलन मिळेल. शिवसेना जिल्हाउपप्रमुख अविनाश फडतरे, कामगार कल्याण अधिकारी सुनील कांबळे, पत्रकार प्रकाश राजे यांची भाषणे झाली. बंडा लेंभे यांनी सर्वांचे आभार मानले.

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Top 10 Netflix Web Series to Watch Right Now (Feb 2026) Maharashtra kesari 2025 :पृथ्वीराज मोहोळ ६ ७ व्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी (Copy)