Satara News: कृष्णा कालव्याचा दुरुस्तीचा प्रश्न मार्गी लावणार- जलसंपदामंत्री विखे पाटील

Satara News: कृष्णा कालव्याचा दुरुस्तीचा प्रश्न मार्गी लावणार- जलसंपदामंत्री विखे पाटील

आमदार शशिकांत शिंदेंच्या प्रश्नावर जलसंपदा मंत्र्यांचे उत्तर

Satara News: साताऱ्यासह सांगली जिल्ह्यातील शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या कृष्णा कालव्याची देखभाल दुरुस्तीअभावी कराडजवळ पडझड झाली आहे, जलपर्णीचा प्रादुर्भाव, वाढलेली झुडपे, साचलेल्या गाळामुळे कालव्याची

वहनक्षमता कमी झाली असून, या कालव्याची गळती थांबवून वहनक्षमता वाढविण्यासाठी आणि सैदापूरसारख्या ठिकाणी नागरी वस्त्यांमधून कालव्यात सोडले जाणारे सांडपाणी थांबवण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही, उपाययोजना केली अथवा करण्यात येत आहे? असा प्रश्न आमदार शशिकांत शिंदे यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला. Satara News

त्यावर ‘ब्रिटीशकालीन कृष्णा कालव्यातील पाण्याची गळती थांबवून वहनक्षमता पुनर्स्थापित करण्याकरीता आवश्यक ठिकाणी अस्तरीकरण व विमोचकाच्या दुरूस्तीच्या कामांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून, त्यास प्रशासकीय मान्यता घेण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही प्रगतीत आहे’, असे उत्तर जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले.

कृष्णा कालव्याची पाण्याची गळती थांबवून वहनक्षमता वाढविण्याबाबतचा प्रश्न उपस्थित करताना आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, की साताऱ्यासह सांगली जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या कृष्णा कालव्याची कराडजवळ देखभाल, दुरुस्ती न झाल्यामुळे पडझड झाली आहे, जलपर्णीचा प्रादुर्भाव, वाढलेली झुडपे, साचलेल्या गाळामुळे कालव्याची वहनक्षमता कमी होऊन शेतीपर्यंत पाणी पोहोचण्यास अडचणी येत आहेत. सैदापूर येथे नागरी वस्त्यांमधील सांडपाणी थेट कृष्णा कालव्यात सोडण्यात येत असल्यामुळे दूषित झालेल्या पाण्याला दुर्गंधी येत आहे आणि ते शेती व इतर वापरासाठी अयोग्य ठरत आहे. याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय? तसेच कालव्याच्या पडझड झालेल्या भागांची दुरुस्ती, अस्तरीकरणाची कामे करून पाण्याची गळती थांबविण्यासाठी आणि वहनक्षमता वाढविण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याबाबत त्याचबरोबर सैदापूरसारख्या ठिकाणी नागरी वस्त्यांमधून कालव्यात सोडले जाणारे सांडपाणी थांबवण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही, उपाययोजना केली अथवा करण्यात येत आहे? याबाबतचा खुलासा करावा.

त्यावर उत्तर देताना जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले, की ब्रिटीशकालीन कृष्णा कालव्याच्या एकूण ८६ किलोमीटर लांबीपैकी ८० टक्के भाग हा काळ्या मातीतून जात असल्यामुळे सातत्याने झाडे-झुडपे वाढतात; परंतु ती काढून आवश्यकतेनुसार दुरूस्ती करून पाणी आवर्तन दिले जाते. सैदापूर येथील नागरी वस्त्यांमधील सांडपाणी रोखण्याकामी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत संबंधित ग्रामपंचायतीस वेळोवेळी कळविण्यात आले आहे. तसेच गॅबीयन भिंतीचे काम प्रगतीपथावर आहे. पडझड झालेल्या कालव्याच्या भागांची दुरुस्तीची, अस्तरीकरणाची विशेष दुरुस्तीची कामे विविध ठिकाणी प्रगतीपथावर आहेत.

कृष्णा कालव्यातील पाण्याची गळती थांबवून वहनक्षमता पुनर्स्थापित करण्याकरीता कालव्याच्या एकूण ८६ किलोमीटर लांबीपैकी आवश्यक ठिकाणी अस्तरीकरण, विमोचकाच्या दुरूस्तीच्या कामांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून, त्यास प्रशासकीय मान्यता घेण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही क्षेत्रीय स्तरावर प्रगतीत असल्याची माहिती मंत्री विखे पाटील यांनी दिली.

#shetkari #water #shashikantshinde #radhakrishnapatil #satara #karad #Satara News

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Top 10 Netflix Web Series to Watch Right Now (Feb 2026) Maharashtra kesari 2025 :पृथ्वीराज मोहोळ ६ ७ व्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी (Copy)