Palkhi : जेजुरीचा निरोप घेत पालखी सोहळा वाल्हे मुक्कामी पोहचला

महर्षी वाल्मिकी ऋषींच्या गावी माउलींचा सोहळा
PUNE जिल्ह्यातील आजचा शेवटचा मुक्काम, उद्या सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार
Sant Dyaneshawar Maharaj Palkhi Sohala संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आज जेजुरीचा निरोप घेत पुढे पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. जेजूरीनंतर आज माऊली महर्षी वाल्मिकी ऋषींच्या कर्मभूमी असलेल्या वाल्हे या गावात मुक्कामासाठी पोहचला. जेजुरी ते वाल्हे हे अंतर सर्वात कमी पल्ल्याचे असून दौण्डज खिंडीत विसावा घेतल्यावर दुपारीच पालखी सोहळा वाल्हे मुक्कामी पोहचला. पुणे जिल्हयातील आजचा शेवटचा मुक्काम राहणार असून पालखी सोहळा उद्या स्टार जिल्हयात प्रवेश करणार आहे.
Palkhi विसावा दौण्डज खिंडीत आणि दुपारीच मुक्कामी वाल्हे
आज पहाटे सहा वाजताच ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण सुरु केले. काल पालखीचे मोठ्या उत्साहात भंडारा उधळत जेजुरीत स्वागत झाले होते. आज पालखी जेजुरीचा निरोप घेऊन वाल्हे गावाकडे निघाली हा सर्वात कमी अंतराचा पल्ला असून पालखी सोहळा दौडज खिंडीत विसावला आणि दुपारीच वाल्हे गावात प्रवेश केला. प्रथेप्रमाणे वाल्हेकरांनी पालखी खांद्यावर घेऊन मिरवणूक काढली व गुढ्या उन्हरून माऊलींचे स्वागत केले. पंढरपूर पर्यंतच्या प्रवासात फक्त वाल्हे या गावीच माऊलींची समाज आरती दुपारी होते हेही विशेष .या समाज आरतीला लाखो भाविकांनी हजेरी लावली.
Palkhi पुणे जिल्हातील आज शेवटचा मुक्काम
१९ जूनला संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. २ १ दिवसाच्या या प्रवासात पालखी सोहळा पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यातून प्रवास करतो. पुणे जिल्ह्यात आळंदीनंतर पुढे पुणे,सासवड ,जेजुरी,वाल्हे असा मुक्काम झाले. पुणे जिल्यातील सात दिवसांचा प्रवास आणि आजचा वाल्हे गावी शेवटचा मुक्काम असून उद्या पालखी सोहळा सातारा जिल्हयात प्रवेश करेल.
उद्या सातारा (Satara) जिल्हयात पालखी सोहळा प्रवेश आणि शाहीस्नान
Pune जिल्ह्यातील सात दिवसाचा प्रवास संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा उद्या दुपारी सातारा Satara जिल्हात प्रवेश करेल . पालखी सोहळ्याचे जनक संत हैबतबाबा आरफळकर याचे गाव आरफळ हे सातारा जिल्ह्यात असून संत हैबतबाबाच्या कर्मभूमीत पालखी सोहळा प्रवेश करणार आहे. नीरा येथील विसावा उरकून पालखी नीरा नदीच्या तीरावर असलेल्या पुलावरून सातारा जिल्ह्यात प्रवेश करेल. याठिकाणी निरा नदीत माऊलींच्या पादुकांना शाहीस्नान केले जाईल. यानंतर पाडेगाव येथे सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालखी सोहळ्याचे स्वागत होईल आणि सातारा जिल्ह्यातील पहिल्या मुक्क्मासाठी लोणंदकडे सोहळा निघेल. पुढील चार दिवस पालखी सातारा जिल्ह्यात असेल.
Pune – Satara- Lonand- palkhi-route





