Palkhi माऊलींची पालखी पिवळ्या सोन्यात न्हाहली..

Palkhi माऊलींची पालखी पिवळ्या सोन्यात न्हाहली..

खंडेरायाच्या जेजुरीत भंडारा उधळून माऊलींचे स्वागत

येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात वारकरी तल्लीन

तीर्थक्षेत्र आळंदीहून पंढरीकडे निघाल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी Palkhi Sant Dyaneshar Maharaj Palkhi Sohla सोहळा आज खंडेरायाच्या जेजुरीत मुक्कामासाठी दाखल झाला. जेजुरीकरानी भंडाऱ्याच्या उधळण करीत माऊलींचे उत्साहात स्वागत केले यामुळे माऊलींची पालखी पिवळ्या सोन्यात न्हाहून निघाली. तर माऊली- माऊली सोबत येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात लाखो वारकरी तल्लीन झाले. एक दिवसाच्या मुक्कामासाठी पालखी सोहळा जेजुरीत विसावला.

बंधूभेट आणि सासवड नगरीचा निरोप

Pune येथील दोन दिवसाचा मुक्काम उरकून पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ झाला यावेळी मार्गातील सर्वात मोठा पल्ला तोही ३२ किमीचा आणि दिवेघाटाची अवघड वाट वारकरी एका दिवसात मोठ्या उत्साहात पार करुन सासवड मुक्कामी येतात, याठिकाणी बंधू संत सोपानकाकाची भेट घेण्यासाठी उत्सुकता असते. या बंधूभेटीने थकलेल्या वारकऱयांना शिणवटा जातो. यासाठी सासवडला दोन दिवस पालखी मुक्कामी असते. दोन दिवसांनी ताजेतवाने झालेले वारकरी उत्साहाने जेजुरी मुक्कामाकडे निघाले भजन कीर्तन गात संध्याकाळी ५ च्या सुमारास पालखी सोहळा जेजुरी नगरीत दाखल झाला. तर संत सोपानकाकांच्या पालखीनेही पंढरपूरकडे प्रस्थान केले.

खंडेरायाची जेजुरीला माऊली भक्तीचे उधाण

अहं वाघा सोहं वाघा प्रेमनगारा वारी।
सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी॥
मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी॥
इच्छा मुरळीस पाहू नका पडाल नरकाद्वारी।
बोध बुधली ज्ञान दिवटी उजळा महाद्वारी॥
आत्मनिवेदन रोडगा निवतील हारोहारी।
एका जनार्दनी धन्य खंडेराव त्यावरी कुंचा वारी॥

अशी महती असलेली वारी आज महाराष्ट्राचे आराध्य असलेल्या जेजुरीमध्ये Sant Dyaneshar Maharaj Palkhi Sohla पालखी सोहळा मुक्कामासाठी विसावला, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे जेजुरीकरानी भंडारा उधळून स्वागत केले. घरोघरी आलेले वारकरी आणि त्याच्यासोबत भजन ,हरिपाठ आणि कीर्तन यामुळे संपूर्ण जेजुरीला माऊली भक्तीचे उधाण आल्याचे चित्र होते.

उद्या सोहळा वाल्मिकी ऋषींच्या कर्मभूमीत वाल्हे गावाकडे होणार मार्गस्थ

उद्या सकाळी माऊलींचा पालखी सोहळा वाल्मिकी ऋषींच्या कर्मभूमीत वाल्हे गावाकडे मार्गस्थ होईल, वाल्हे येथे टप्पा हा सर्वात कमी लांबीचा असल्याने दुपारीच पालखी वाल्हे मुक्कामी पोहचेल याठिकाणी गुढी उभारून वाल्हेकर ग्रामस्थ परंपरेने माऊलींचे स्वागत भक्तिभावात करतात. हा पुणे जिल्हातील पालखीचा शेवटचा मुक्काम असेल यानंतर २६ रोजी पालखी सातारा जिल्हात प्रवेश करेल. Sant Dyaneshar Maharaj Palkhi Sohla

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Top 10 Netflix Web Series to Watch Right Now (Feb 2026) Maharashtra kesari 2025 :पृथ्वीराज मोहोळ ६ ७ व्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी (Copy)