MHADA NEWS: पुणे म्हाडाची खुशखबर ,सदनिकांसाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे नागरिकांना आवाहन

MHADA NEWS- नोंदणी प्रक्रिया कशी असेल जाणून घ्या सविस्तर माहिती
पुणे, दि.१६ : पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, पुणे यांच्यामार्फत महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास (मिळकत व्यवस्थापन, गाळ्यांची विक्री, हस्तातरण व अदलाबदल) विनियम, १९८१ आणि म्हाडा अधिनियम (जमिनीची विल्हेवाट) नियम १९८१ मधील तरतुदीनुसार पुणे, सोलापुर, सांगली, सातारा कोल्हापूर जिल्ह्यातील विविध योजनांतर्गत ५२ अनिवासी गाळे व २८ कार्यालयीन गाळे ई-लिलाव पद्धतीने वितरीत करण्याचे नियोजित आहे. विस्तृत पात्रता, निकष प्रत्येक गाळ्याचे विस्तृत विवरण, सामाजिक आरक्षण, अटी व शर्ती तसेच ऑनलाईन अर्ज सूचना माहिती पुस्तिका इत्यादीच्या सर्व माहितीसाठी नागरिकांनी www.eauction.mhada.gov.in व www.mhada.gov.in संकेतस्थळाला भेट देवून अर्ज करावा, असे आवाहन मंडळाचे मुख्य अधिकारी यांनी केले आहे.
MHADA NEWS पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, पुणे यांचेमार्फत १५% सामाजिक गृहनिर्माण योजना व २०% सर्वसमावेशक योजनेतील सोडतीनंतर मागणी अभावी रिक्त राहीलेल्या सदनिका विकासकाकडून प्राप्त अहवालानुसार प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य या तत्वावर वाटप करण्याचे नियोजित आहे. वाटपामध्ये पारदर्शकता ठेवण्याच्या हेतूने सर्वसाधारण प्रवर्गामधील गरजू व पात्र अर्जदारांना सदनिका वितरीत करण्यासाठी १० एप्रिल २०२५ दुपारी १२:०० वा. पासून ऑनलाईन पद्धतीने खालील संकेतस्थळावर नोंदणी प्रक्रिया सुरु आहे. अर्जदारांना सुचित करण्यात येते की, त्यांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करुन उपलब्ध सदनिकांसाठी अर्ज करावा. विकासकांकडून सोडतीनंतर विक्रीअभावी शिल्लक सदनिका जसजशा उपलब्ध होतील तसतशा प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर सर्वसाधारण प्रवर्गामधील गरजू व पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्याची प्रक्रीया निरंतर चालू राहिल. गरजू व पात्र लाभार्थ्यांनी https://bookmyhome.mhada.gov.in/ या संकेतस्थळावर नोदणी पूर्ण करुन उपलब्ध सदनिकांसाठी अर्ज करावा.
MHADA NEWS पंतप्रधान महाेदयांनी १७ नोव्हेंबर २०२४ रोजी केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० ची घोषणा केली असून त्यास अनुसरुन महाराष्ट्र शासनाने सर्वांसाठी घरे संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजनेची (शहरी) २.० राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत शासन निर्णय जारी केला आहे. त्याअनुषंगाने सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की, वरील योजनेअंतर्गत पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ पुणे मार्फत नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करुन देण्यासाठी गृहनिर्माण प्रकल्प राबविण्याचे नियोजित आहे. या योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या सदनिकांसाठी लाभार्थ्यांची नोंदणी व निवड प्रथम करावयाची असल्याने https://pmaymis.gov.in PMAYmis22024/Auth/Login.aspx या यूनिफाईड वेब पोर्टलवर या वेबलिंकवर सदनिका घेण्यास इच्छुक असणाऱ्या जास्तीत जास्त अर्जदारांनी नोंदणी करावी.
सदनिका वितरणाची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन व पारदर्शक असून देकार पत्र हे उपमुख्य अधिकारी,म्हाडा यांच्या डिजीटल स्वाक्षरीने ऑनलाईन पद्धतीने लाभार्थ्यांच्या लॉग-इन आयडीमध्ये उपलब्ध करुन देण्यात येते. कोणतेही देकार पत्र मानवी हस्ताक्षर करुन तसेच रबरी शिक्क्याचा वापर करुन दिले जात नाही, अशी माहिती मंडळाचे मुख्य अधिकारी राहुल साकोरे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे.
#MHADA NEWS #MHADA #MHADAHOME #MHADALOTTERY





