Shivjayanti :सातासमुद्रापार ऑस्ट्रेलियात घुमली शिवजयंतीची ‘शिवगर्जना’

Shivjayanti :सातासमुद्रापार ऑस्ट्रेलियात घुमली शिवजयंतीची ‘शिवगर्जना’

Shivjayanti :सह्याद्री सिडनी परिवाराकडून शिवजयंतीचे आयोजन

Shivjayantiचे यंदाचे १ ३ वे वर्ष,

शोभायात्रा अन सांस्कृतिक कार्यक्रमांनी शिवभक्तीचा जागर

Shivjayanti : छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती देशभरात उत्साहात साजरी होत असताना सातासमुद्रापार ऑस्ट्रेलियात देखील शिवभक्तीला उधाण आले. ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरात यानिमित्ताने शिवगर्जना घुमली आणि शिवाजी छत्रपती महाराजांच्या शिवभक्तीचा जागर साजरा करण्यात आला.

Shivjayanti ऑस्ट्रेलियात स्थायिक झालेल्या मराठी बांधवांच्या सह्याद्री सिडनी या परिवाराच्या संकल्पनेतून गेल्या बारा वर्षांपासून सिडनी शहरामध्ये शिवजयंती साजरी केली जाते. यंदाचे शिवजयंतीचे १ ३ वे वर्ष आहे यामाध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि विचारांचा वारसा सातासमुद्रापार परदेशी लोकमानसात पोहचवण्याचे कार्य होत आहे. यंदा देखील छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे दिमाखदार आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिव प्रतिमेची पालखीतून ढोल ताशाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. तसेच मराठी संस्कृतीचे महत्व पटवून देणारी मराठमोळी शोभायात्रा यामुळे शिवजयंती सोहळ्याला खऱ्या अर्थाने शोभा आली. यानंतर शिव प्रतिमेचे पूजन व सांस्कृतिक कार्यक्रम यांनी शिवभक्तीचा जागर करण्यात आला.

Shivjayanti घरापासून परदेशात स्थिरावलेल्या मराठी भाषिक युवकांनी सहकुटुंब या शिवजयंती सोहळ्यात सहभागी होऊन शिवाजी महाराजांचे विचार जपण्याचे कार्य केले, गेल्या १ २ वर्षांपासून आम्ही याठिकाणी सिडनीमध्ये सह्याद्री सिडनी परिवाराच्या माध्यमातून मराठी संस्कृती जपण्याचे काम करीत आहोत. अनेक सॅन उत्सव साजरे करीत असतो त्यात मातीपासून लांब असलो तरी आमची मूळ मराठी मातीशी घट्ट रुजवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंतीचे आयोजन करणे आमच्यासाठी गौरवाची आणि अभिमानाची बाब आहे या सोहळ्यामुळे आम्हाला वर्षभर ऊर्जा मिळते अशा शब्दात सह्याद्री सिडनी परिवाराच्या संयोजकांनी भावना व्यक्त केल्या.

golden digital store
golden digital store

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Top 10 Netflix Web Series to Watch Right Now (Feb 2026) Maharashtra kesari 2025 :पृथ्वीराज मोहोळ ६ ७ व्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी (Copy)