IND VS NZ: क्रिकेट ‘चॅम्पियन’ कोण ? फैसला आज होणार

IND VS NZ : भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याकडे क्रिकेटप्रेमींच्या नजरा
IND VS NZ दुबई येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना भारत विरुद्ध न्युझीलंड मध्ये रंगणार असून यातील विजेत्या संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावण्याची संधी मिळणार आहे त्यामळे कोण होणार आयसीसी क्रिकेटचा चॅम्पियन याचा फैसला आज होणार आहे. भारत विरुद्ध न्युझीलंड सामन्याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले असून आतापर्यंत प्रतिस्पर्थ्यांना नमविण्यात सातत्याने यशस्वी झालेल्या भारतीय संघाला आज रविवारी १२ वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यासाठी न्यूझीलंडचा पाडाव करावा लागेल
भारताने आतापर्यंत चॅम्पियन्स स्पर्धेत या भारताने सर्वोत्तम कामगिरी केली आहे, साखळी मालिकेत बांगलादेश , न्यूझीलंड व पाकिस्तानचा पराभव करून वर्चस्व राखले तर सेमी फायनल मध्ये बलाढय ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत कल्याने टीम इंडियाचा हौसला बुलंद आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरेल. दुसरीकडे किवीज संघ देखील मजबूत असून त्यांनी पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका संघाला धूळ चारली आहेत त्यामुळे किवीज चा संघ डार्क हॉर्स असेल. दोन्ही संघाची झुंज हि प्रेक्षणीय होणार असून अवघ्या क्रिकेट जगताचे लक्ष या लढतीकडे लागले आहे .
फिरकी चौकडीवर मदार
IND VS NZ फिरकी चौकडीने दुबईतील खेळपट्टीचां व्यवस्थित फायदा उठविलेला असल्याने जेतेपदाच्या सामन्यापूर्वी भारत अधिक आरामदायी वाटेल. भारत अंतिम सामन्यासाठी चार फिरकी गोलंदाज आणि दोन वेगवान गोलंदाज हे समीकरण कायम ठेवण्याची शक्यता आहे. वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव या उजव्या आणि डावखुऱ्या फिरकी गोलंदाजांच्या समीकरणाने प्रतिस्पर्थ्यांना अडचणीत आणले आहे. त्याचबरोबर रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल हेही भारतीय गोलंदाजीचे मुख्य स्तंभ आहे. त्यांनी फलंदाजांना आपल्या अचूकतेने बांधून ठेवून चुका करण्यास भाग पाडलेले आहे.
जर अंतिम सामना खरोखरच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यासाठी वापरल्या गेलेल्या खेळपट्टीवर खेळवला जाणार असेल, तर हे चार गोलंदाज न्यूझीलंडला अडचणीत आणू शकतात. त्यांचा सामना करण्याच्या बाबतीत न्यूझीलंडच्या सर्वांत जास्त आशा केन विल्यमसन आणि रचिन रवींद्रवर असतील. ते त्यांच्या संघातील फिरकी गोलंदाजांविरुद्धचे सर्वांत सक्षम फलंदाज आहेत. तथापि किवींनाही त्यांचे स्वत:चे फिरकी गोलंदाज कर्णधार मिशेल सँटनर, मायकेल ब्रेसवेल, रवींद्र आणि ग्लेन फिलिप्स हेही असाच प्रभाव पाडण्याचा विश्वास असेल.
किवी फिरकीपटूंनी गेल्या वर्षी कसोटी मालिकेत भारताला जबर तडाखा दिला होता आणि २००० नंतरचे आपले पहिल्या आयसीसी एकदिवसीय जेतेपद मिळवू पाहणाऱ्या न्यूझीलंडला यावेळीही त्यांच्याकडून भरपूर आशा असतील. योगायोगाने त्यांनी २५ वर्षांपूर्वी केनियामध्ये झालेल्या नॉकआउट्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतालाच चार गड्यांनी हरवले होते. पण भारताला यावेळी असे घडू द्यायचे नाही आणि गेल्या वर्षीचा टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर त्यांच्या खात्यात आणखी एक आयसीसी ट्रॉफी जोडायची आहे.
विल्यमसन-भारतीय फिरकीपटू झुंज रंगणार
IND VS NZ भारतीय फिरकी गोलंदाज आणि केन विल्यमसन यांच्यात दुबईतील खेळपट्टीवर चांगलीच झुंज रंगण्याची शक्यता असून विल्यमसन त्यांना तोंड कसे देतो ते सामन्याचा निकाल ठरविण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. भारत फायनलमध्ये चार फिरकी गोलंदाज आणि दोन वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरू शकतो. भारताच्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात जी खेळपट्टी वापरण्यात आली होती तीच उद्या वापरली जाणार असून त्या सामन्यात फिरकीपटूंना काही प्रमाणात मदत मिळाली होती. त्यामुळे न्यूझीलंडसाठी विल्यमसनचे कौशल्य महत्त्वपूर्ण ठरणार आहे. काही दिवसांपूर्वी भारताविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने ८१ धाव केल्या होत्या आणि त्यातून त्याचा दर्जा दिसला होता.
अंतिम सामन्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद
IND VS NZ रविवारी येथे २०२५ च्या चॅम्पियन्स करंकड क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. या सामन्याची तिकीटे यापूर्वीच विकली गेल्याने बऱ्याच क्रिकेट शौकिनांच्या पदरी निराशा झाली आहे.
या शेवटच्या सामन्यासाठी दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर २५ हजार तिकीटे उपलब्ध करुन देण्यात आली होती
या सामन्यासाठी तिकीटांचे दर प्रत्येकी २५० ते १२००० डिरॅम आकारण्यात आले आहेत. तिकीट विक्रीतून आयोजकांना सुमारे ९ दशलक्ष डिरॅम मिळणार आहे.






