Bhakti One: नाथसाहेब विराजमान, देऊरला श्रींची भक्तिभावात प्रतिष्ठापना आणि कलशारोहण

Bhakti One: नाथसाहेब विराजमान, देऊरला श्रींची भक्तिभावात प्रतिष्ठापना आणि कलशारोहण

श्री भैरवनाथ- जोगेश्वरी मंदिराचे उदघाटन दिमाखात

माहेरवासिनींचा केला साडी चोळी देऊन सन्मान

Bhakti One: देऊर (ता. कोरेगाव) येथील ग्रामस्थांनी गावात लोकवर्गणीतून ग्रामदैवत श्री भैरवनाथ व श्री खंडोबा देवाची सुरेख मंदिरे उभारली असून अवघ्या १० महिन्यात ग्रामस्थांच्या एकजुटीतुन ४५ लाख रुपये लोकवर्गणी जमा होऊन मंदिर साकारले आहे. या मंदिरातील श्री भैरवनाथ- जोगेश्वरी देवीच्या मूर्तींची विधिवत व भक्तिभावात भैरवनाथाच्या नावाने चांगभलंच्या जयघोषात प्रतिष्ठापणा करण्यात आली याचबरोबरोबर संत यांच्या हस्ते कलशारोहण करण्यात आले. यानंतर भाविकांनी श्रीच्या दर्शनासाठी गर्दी केली.

1741530907964

श्री भैरवनाथाचे नवीन मंदिर साकार
Bhakti One: गावात ग्रामदैवत भैरवनाथ व कुलदैवत खंडोबा देवांची मंदिर व्हावीत यासाठी गेलीं अनेक वर्ष ग्रामस्थांनी प्रयत्न केले मात्र मंदिर साकारण्याचा कामाला मुहूर्त सापडत नव्हता मागील वर्षी गावच्या ग्रामदैवत भैरवनाथ जोगेश्वरी देवाची यात्रा भरवण्यासाठी नेहमीप्रमाणे गावकरी महाशिवरात्री ला गावातील विठ्ठल मंदिराच्या पारावर जमले यावेळी सर्व विषय झाल्यानंतर गावातील ग्रामस्थ व युवकांनी गावातील जुन्या मंदिराचा जीर्णोद्धार कधी होणार मंदिर होणार की नाही असे प्रश्न उपस्थित करून नवीन मंदिर उभारावे अशी मागणी यात्रा कमिटी कडे केली याच वेळी एका वर्षात म्हणजेच येणारी यात्रा आपण नवीन मंदिरात भरवू असा विश्वास यात्रा कमिटी मधील युवक ग्रामस्थांनी उपस्थित ग्रामस्थांना दिला आणि या कामाचा शुभारंभ ही जून महिन्यात मोठ्या दणक्यात झाला या वेळी जवळपास 45 लाखच खर्चाचं मंदिर लोकवर्गणी तून उभारण्याचा निर्णय घेण्यात आला यासाठी निधीचा मोठा प्रश्न होता आणि मंदिर गावच्या पैशातूनच व्हावे अशी भूमिका होती यासाठी गावातील काही युवकांनी एकत्रित येऊन ग्रामदैवत भैरवनाथ जोगेश्वरी जिर्णोद्धार कमिटी साकारली आणि प्रसिध्द शिल्पकार प्रकाश राठोड यांना या मंदिर उभारण्याचे काम देण्यात आले. गावच्या यात्रा कमेठी कडे शिल्लक असलेलं 14 लाख भाग भांडवल सुरवातीच्या कामासाठी उशाला होत त्यानंतर मंदिराला रक्कम कमी पडू नये यासाठी गावातील काहीं युवकांनी मोठी मेहनत घेत गावातून जमेल तशी लोकवर्गणी जमा करण्याचा निर्णय घेतला त्याला देऊरकरांनी मोठा प्रतिसाद दिला व सढळ हाताने देणगी देत ४५ लाख रुपयाचे लोकवर्गणी जमा झाली यामुळे मंदिर पूर्णत्वाकडे नेले. आज या मंदिराचे उदघाटन विधिवत पुजा व धर्म संस्कार करुन करण्यात आले. यामुळे मंदिर निर्माण समिती व देऊर ग्रामस्थांचे स्वप्न साकार झाले.

1741530056363

१० महिन्यात उभे राहिले देखणे मंदिर

Bhakti One: या मंदिराची उभारणी करताना मंदिराचा गाभारा आतून ग्रॅनाईट आणि बाहेरून दगडी असा विद्युत रोषणाई सह साकारण्यात आला आहे. गाभाऱ्या बाहेर सभा मंडप आणि महाद्वार अस तीन टप्यात आकर्षक अस काम झालं पाया आणि चार फुटापर्यंत फाउंडेशन संपूर्ण दगडी बांधकाम करून बांधण्यात आले आहे दोन शिखर असलेलं हे मंदिर रात्रीच्या अंधारात ही प्रकाशमय करण्यात आल आहे त्यामुळे हे मंदिर या गावात आगळ वेगळ असून गावच्या सर्व ग्रामस्थांनी ही या मंदिराच्या उभारणीसाठी मोठा आर्थिक आधार दिल्यानं हे शक्य झाल्याच समाधान ग्रामस्थांनी व्यक्त केलं आहे.


ग्रामप्रदक्षिणा मिरवणूक आणि महापूजेचे आयोजन

Bhakti One: या दोन्ही मंदिराचा जीर्णोद्धार मूर्तीस्थापना व कलशारोहन सोहळा 7 मार्च ते 10 मार्च दरम्यान संपन्न झाला. काल या श्रीच्या मुर्त्यांची सजवलेल्या रथातून टाळ मृदूंगाच्या साथीने भव्य मिरवणूक काढण्यात आली, आज सकाळ पासून मंत्रोउच्चारात होमहवन व महापुजेचे आयोजन करण्यात आले. यानंतर श्री भैरवनाथ व जोगेश्वरी मातेच्या मूर्ती यांची प्रतिष्ठापणा मंदिराच्या गाभाऱ्यात करण्यात आली.
यावेळी भैरवनाथच्या नावानं चांगभलं च्या गजरात कलशारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थित भाविकांनी भैरवनाथाच्या नावाने चांगभलं गजर केला. या सोहळ्यासाठी मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली तर स्वागत कमानी उभारल्या होत्या. यावेळी उपस्थित भाविकांनी श्रीचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला.

गावाकऱ्यांनी केला माहेरवासिनी लेकी बहिणीचा यथोचित सन्मान

या सोहळ्याला गावातील माहेरवासिनी लेकी बहिणींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली त्यांच्या उपस्थितीने सोहळ्याला शोभा आली. गावकऱ्यांनी या माहेरवासिनी लेकी बहिणींचा साडी चोळी देऊन माहेरपणाचा यथोचित सन्मान केला. यामुळे माहेरवासिनी भारावून गेल्या.

Dhansing Kadam
Dhansing Kadam

PRAKASH KUMBHAR

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Top 10 Netflix Web Series to Watch Right Now (Feb 2026) Maharashtra kesari 2025 :पृथ्वीराज मोहोळ ६ ७ व्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी (Copy)