IND VS AUS भारत आज ऑस्ट्रेलियासोबत भिडणार

विश्वचषकातील पराभवाची परतफेड करण्याची भारताला संधी
IND VS AUS लढतीकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष
IND VS AUS : दुबई येथे आज मंगळवारी होणाऱ्या चॅ म्पियन्स टॉफीच्या उपांत्य फेरीत भारत व ऑस्ट्रेलिया यांच्या रुपाने दोन बलाढ्य क्रिकेट शक्ती एकमेकांशी भिडतील. अलीकडचा इतिहास जरी ऑस्ट्रेलियाच्या बाजूने झुकणारा असला, तरी भारताचा भर त्यांचा फिरकी मारा व येथील परिचयाची परिस्थिती यावर असेल. तथापि, हे सोपे काम नाही, कारण पॅट कमिन्स, जोश हेझलवूड आणि मिशेल स्टार्क या प्रमुख खेळाडूंविना असूनही ऑ स्ट्रेलिया हा मजबूत संघ आहे.
काही दिवसांपूर्वी लाहोर येथे इंग्लंडविरुद्ध त्यांनी ३५२ धावांचा यशस्वीरीत्या केलेला जबरदस्त पाठलाग ही बाब दाखवून देतो. २०११ च्या विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताने ऑ स्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा विजय मिळवला होता. २०१५ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत आणि २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या जेतेपदाच्या लढतीत भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. त्याशिवाय २०२३ २०२३ मध्ये झालेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीतही त्यांना पराभव पत्करावा लागला. गेल्या १४ वर्षांपासूनचे हे चित्र यावेळी बदलून दाखविण्याची भारतीय संघाला खरोखरच आशा आहे आणि त्या आशावादाचे मुख्य कारण यावेळी संघात असलेली. काही अव्वल फिरकी गोलंदाजांची उपस्थिती हे आहे. स्पर्धेपूर्वी पाच फिरकी गोलंदाज समाविष्ट करण्याच्या भारताच्या निर्णयावर सर्वत्र टीका झाली होती, परंतु आता दुबईतील संथ खेळपट्ट्यांवर हा एक मास्टरस्ट्रोक असल्याचे सिद्ध होत च आहे. सर्व सामने दुबईमध्ये खेळण्याची संधी मिळाल्यामुळे येथील परिस्थितीशी चांगलेच परिचित झाल्याने भारताला वर्चस्व गाजवता आले आहे.
IND VS AUS फिरकी अस्त्र प्रभावी ठरणार
IND VS AUS दुबईतील खेळपट्ट्या या संथ असल्याने भारताने पाच फिरकी गोलंदाज खेळवण्याचा निर्णय घेतला याची बरीच चर्चा झाली मात्र हेच फिरकी अस्त्र भारतासाठी प्रभावी अस्त्र ठरले आहे. किवी विरुद्धच्या सामन्यात वरून चक्रवर्ती, कुलदीप यादव , रवींद्र जडेजा यांनी ९ बळी मिळवत किवी संघाला नामोहरण केले होते त्यामुळे आजच्या सामन्यात फिरकीची जादू कशी चालणार याकडे सर्वांचे लक्ष असेल, ऑस्ट्रेलिया कडे ऍडम झॅम्पा हा एकमेव अस्सल फिरकीपटू आहे तर ग्लेन मॅक्सवेल आणि ट्रेविस हेड हे चांगली कामगिरी करू शकतात.
चॅम्पियन्स ट्रॉफीत IND VS AUS हेड टू हेड रेकॉर्ड
आयसीसीच्या या मिनी वर्ल्डकप स्पर्धेत भारत व ऑस्ट्रेलिया IND VS AUS आतापर्यंत दोनवेळा आमनेसामने आले आहेत. या दोन्ही सामन्यात टीम इंडियाचा वरचष्मा राहिला आहे. १९९८ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताने ऑस्ट्रेलियाला ४४ धावांनी तर २००० साली झालेल्या स्पर्धेत कांगारुंचा २० धावांनी पराभव केला होता. आता, उभय संघ तिसऱ्यांदा आज आमनेसामने येत आहेत. यामुळे टीम इंडिया आपला वरचष्मा कायम राखणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. याउलट आयसीसीच्या वनडे सामन्यात हे रेकॉर्ड मात्र उलटे आहे. उभय संघात आतापर्यंत १५१ सामने झाले असून ऑस्ट्रेलियाने ८४ तर भारताने ५७ सामने जिंकले आहेत.
एकूण सामने १५१, ऑस्ट्रेलिया ८४ सामन्यात विजयी, भारत ५७ सामन्यात विजयी






