साताऱ्यात शनिवारी Digital Media संपादक पत्रकार संघटनेची कार्यशाळा

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई अध्यक्षस्थानी <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>सातारा &colon; डिजिटल मीडिया Digital Media संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य&comma; जिल्हा साताराच्या वतीने मान्यवरांचा सन्मान व जिल्ह्यातील संपादक पत्रकार बंधू-भगिनींसाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन शनिवार दि&period; १ मार्च रोजी करण्यात आले आहे&period; सकाळी दहा ते चार या वेळेत सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजच्या कर्मवीर भाऊराव पाटील सभागृहात कार्यशाळेचे आयोजन केले आहे&period; यावेळी सातारा जिल्ह्यातील नवनियुक्त मंत्रिमहोदय यांचा सन्मान करण्यात येणार आहे व डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष&comma; माध्यमतज्ञ&comma; ज्येष्ठ पत्रकार राजा माने साहेब यांचा मानपत्र देऊन विशेष सत्कार व डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सातारा जिल्हा पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वितरित करण्यात येणार आहेत&period;<br>पर्यटन&comma; खनिकर्म व माजी सैनिक कल्याणमंत्री तथा सातारा पालकमंत्री ना&period; शंभूराज देसाई हे कार्यशाळेचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत&period; यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले&comma; सार्वजनिक बांधकाम मंत्री ना&period; श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले&comma; ग्रामविकास व पंचायतराज मंत्री ना&period; जयकुमार गोरे&comma; मदत व पुनर्वसन मंत्री ना&period; मकरंद पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात येईल&period; या कार्यक्रमासाठी सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील&comma; सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन&comma; जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख&comma; जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती वर्षा पाटोळे&comma; छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ&period; राजेंद्र मोरे&comma; डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत&comma; राज्य समन्वयक तेजस राऊत&comma; राज्य सचिव महेश कुगावकर&comma; पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले&comma; राज्य सहसमन्वयक गणेश बोतालजी&comma; राज्य अध्यक्ष साप्ताहिक संघटना संजय कदम&comma; राज्य कार्यकारिणी सदस्य सचिन भिलारे हे उपस्थित राहणार आहेत&period;<br>डिजिटल पत्रकारांची दिशा पुढील काळात कशी असावी याबाबत मार्गदर्शन या कार्यशाळेत करण्यात येणार आहे&period; पत्रकारितेची मूल्य आणि पत्रकार म्हणून असणारी सामाजिक जबाबदारी याबाबत चर्चा या कार्यशाळेत होईल&period; डिजिटल पत्रकारांना मान्यता मिळवण्यासाठी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना काय काम करत आहे याबाबत माहिती कार्यशाळेत देण्यात येईल&period; डिजिटल पत्रकार म्हणून कशी वाटचाल करावी लागेल याची दिशा या कार्यशाळेच्या माध्यमातून निश्चित मिळेल&period; तरी जिल्ह्यातील संपादक पत्रकार बांधवांनी कार्यशाळेस उपस्थित रहावे&comma; असे आवाहन जिल्हाध्यक्ष संतोष शिराळे&comma; सातारा शहराध्यक्ष अजित सोनवणे यांनी केले आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<figure class&equals;"wp-block-image size-large"><img sizes&equals;"&lpar;max-width&colon; 1024px&rpar; 100vw&comma; 1024px" src&equals;"https&colon;&sol;&sol;maharashtraone&period;com&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;01&sol;IMG-20250122-WA0012-1024x663&period;jpg" alt&equals;"netsoft computer" class&equals;"wp-image-762"&sol;><figcaption class&equals;"wp-element-caption">netsoft computer<&sol;figcaption><&sol;figure>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><&sol;p>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: