मराठी भाषेकडून राष्ट्राच्या सांस्कृतिक निर्माणाचे महान कार्य : पंतप्रधान नरेंद्र मोदी

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">राजधानीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन उत्साहात<&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>स्वभाषेच्या अभिमानाची शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांकडून – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस<&sol;strong><&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p> <strong>संस्कृतीचे बलस्थान असणाऱ्या भाषेने माणसे जोडावी &&num;8211&semi;  संमेलन अध्यक्षा डॉ&period; तारा भवाळकर<&sol;strong><&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी&comma; नवी दिल्ली दि&period;21 &colon; <&sol;strong>भाषा केवळ संवादाचे माध्यम नसून ती संस्कृतीची संवाहक असते&period; भाषा समाजातच जन्मतात आणि समाजाच्या निर्मितीत मोठी भूमिका निभावतात&period; मराठी भाषेने महाराष्ट्रातीलच नव्हे देशातील अनेक महापुरूषांच्या विचारांना अभिव्यक्ती देऊन सांस्कृतिक निर्माणाचे महान कार्य केले आहे&comma; असे गौरवोद्गार देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज येथे काढले&period; भारतीय भाषांमध्ये कधीही वैरभाव नव्हता&period; येथील सर्व भाषांनी एकमेकांना समृद्ध केले असून भाषिक भेदांपासून दूर राहून भाषा संवर्धित  करणे ही सर्वांची सामुहिक जबाबदारी असल्याचे आवाहनही प्रधानमंत्र्यांनी केले&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन&nbsp&semi; प्रधानमंत्री नरेंद्र मोदी&nbsp&semi; यांच्या हस्ते झाले&period; यावेळी ते बोलत होते&period; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस&comma; संमेलनाचे स्वागताध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार&comma; संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा डॉ&period;तारा भवाळकर&comma; मावळते अध्यक्ष डॉ&period;रवींद्र शोभणे&comma;&nbsp&semi; अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा&period;उषा तांबे&comma; कार्यवाह डॉ&period; उज्ज्वला मेहेंदळे &comma; कोषाध्यक्ष प्रकाश पागे&comma; संमेलनाचे निमंत्रक संजय नहार&nbsp&semi; आदी व्यासपीठावर उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>साहित्य संमेलनासाठी आलेल्या सर्वांचे मराठीत स्वागत करून प्रधानमंत्री म्हणाले&comma; मराठी साहित्य संमेलन एका भाषेपुरते मर्यादित नाही&period; त्यास स्वातंत्र्य संग्रामाचा गंध असून तो एक मोठा सांस्कृतिक वारसा आहे&period; &nbsp&semi; 1878 पासून देशातील अनेक महान व्यक्तींनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले&period;&nbsp&semi; या परंपरेशी जोडेले जाण्याचा मला विशेष आनंद आहे&period; जागतिक मातृभाषा दिनाचे औचित्य साधून होत असलेले संमेलनाचे आयोजन प्रशंसनीय आहे&period; ज्ञानेश्वरांनी &&num;8216&semi;माझ्या मराठाचि बोलू कौतुके&comma; अमृताते पैजा जिंके&&num;8217&semi; असे म्हटले आहे&period; मराठी भाषेवर माझे खूप प्रेम आहे&period; मराठी भाषा शिकण्याचे प्रयत्न मी निरंतर करीत आहे&period; अशा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे काम पूर्ण करण्याची संधी मिळाल्याचे मला मोठे समाधान आहे&comma; असेही श्री मोदी यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्ष&comma; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे 300 वे जयंती वर्ष आणि डॉ&period;बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेचे अमृत महोत्सवी&nbsp&semi; वर्ष साजरे केल्याच्या पार्श्वभुमीवर हे संमेलन होत आहे&comma; असे सांगून पंतप्रधान म्हणाले&comma; 100 वर्षापूर्वी राष्ट्रीय&nbsp&semi; स्वयंसेवक संघाची स्थापना झाली होती&period; वेदापासून विवेकानंदांपर्यंत&nbsp&semi; नव्या पिढीला पोहोचविण्याचा संस्कारयज्ञ या माध्यमातून चालविला जात आहे&period; संघाच्या माध्यमातून मराठी भाषा आणि परंपरेशी जोडले जाण्याची मला संधी मिळाली&period;&nbsp&semi; मराठी एक परिपूर्ण भाषा असल्याचे स्पष्ट करताना प्रधानमंत्री म्हणाले&comma; मराठीत शुरतेसोबतच वीरता देखील आहे&comma; सौंदर्य आणि संवेदना दोन्ही आहेत&comma; समानता आणि समरसता आहे&comma; मराठीत अध्यात्म आणि आधुनिकताही आहे&period; शक्ती&comma; भक्ती आणि युक्तीदेखील आहे&period; देशाला आध्यात्मिक ऊर्जेची गरज असतांना महाराष्ट्राच्या थोर संतांनी ऋषींचे ज्ञान मराठीत जनतेसमोर ठेवले&period; संत ज्ञानेश्वर&comma; संत तुकाराम&comma; रामदास&comma; संत गाडगे महाराज&comma; तुकडोजी महाराज&comma; गोरा कुंभार आदी अनेक संतांनी भक्ती आंदोलनाच्या माध्यमातून समाजाला नवी दिशा दिली&period; आधुनिक युगात ग&period;दि&period;माडगुळकर आणि सुधीर फडके यांच्या गीत रामायणाने समाजावर प्रभाव टाकला आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>गुलामीच्या शेकडो वर्षाच्या कालखंडात मराठी भाषा आक्रमणकर्त्यांपासून मुक्तीचा जयघोष बनली&period; छत्रपती शिवाजी महाराज&comma; संभाजी महाराज आणि बाजीराव पेशव्यांसारख्या वीरांनी शत्रूंना मागे सारले&period; स्वातंत्र्य संग्रामात वासुदेव बळवंत फडके&comma; लोकमान्य टिळक&comma; वीर सावरकरांनी इंग्रजांची झोप उडवली&period; मराठी साहित्याने देशप्रेमाची धारा प्रवाहीत झाली&period; या साहित्याने देशप्रेमाचा जागर केला&comma; जनतेला नवी ऊर्जा दिली&period; अशा शब्दात मराठीची महती व्यक्त करून पंतप्रधान म्हणाले&comma; मराठी साहित्याने समाजातील वंचित&comma; शोषितांसाठी मुक्तीचे दरवाजे खुले करण्याचे कार्य केले&period; महात्मा ज्योतिबा फुले&comma; सावित्रीबाई फुले&comma; महर्षि कर्वे&comma; डॉ&period;बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक मराठी समाजसुधारकांनी नवा विचार देण्यचे कार्य केले&period; मराठी भाषेने&nbsp&semi; समृद्ध दलित साहित्य देण्याचे कार्य केले&period; मराठी भाषेने प्राचीन विचारांसोबत&nbsp&semi; विज्ञानही मांडले&period; महाराष्ट्राने प्रागतिक विचार स्विकारले&period; मुंबई देशाची आर्थिक राजधानी बनली आहे&period; मुंबईने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला पुढे नेले&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>देशाची भाषिक विविधता आपल्या एकतेचा मजबूत आधार असून मराठी याचे उत्तम उदाहरण असल्याचे सांगताना प्रधानमंत्री म्हणाले&comma; भाषा एखाद्या आईप्रमाणे मुलांना नवा विचार देते&comma; विकासाशी जोडते&comma;&nbsp&semi; भेद करीत नाही&period; भाषेने माणूसकीच्या विचारांना अधिक व्यापक केले आहे&period; मराठीने इतर भाषेतून साहित्य स्विकारले आणि त्या भाषांनाही समृद्ध केले&period; अनेक चांगल्या रचनांचे मराठीत भाषांतर झाले आणि मराठीतीतील&nbsp&semi; उत्तम साहित्याचे इतर भाषात भाषांतर झाले&period; भाषांनी स्वत&colon; सोबत इतरांना समृद्ध केले&period; हा समरसतेचा प्रवाह आणखी पुढे नेण्याची गरज आहे&period;&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>मराठीसोबत सर्व प्रमुख भाषेतून उच्च शिक्षणाला प्राधान्य देण्यात येत आहे&period; महाराष्ट्रातील युवक आता मातृभाषेतून उच्च शिक्षण घेवू शिकेल&comma; असे सांगून प्रधानमंत्री म्हणाले&comma; साहित्य समजाचा आरसा असतो&period; त्यामुळे साहित्य संमेलन&comma; साहित्यिक संस्थांची देशाच्या विकासात महत्वाची भूमिका आहे&period;&nbsp&semi; मराठीतीत महान विभूतींनी स्थापन केलेले आदर्श आणखी पुढे नेण्याचे कार्य महामंडळ करेल&comma; अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली&period; समाजमाध्यमांद्वारे मराठी साहित्यात योगदान देणाऱ्या युवकांना प्रोत्साहन द्यावे&comma; युवकांच्या स्पर्धांचे आयोजन करावे&comma; असे आवाहन त्यांनी केले&period;&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>शिवाजी महाराजांकडून स्वभाषेचा आग्रह आणि अभिमान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस<&sol;strong><&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे संमेलन दिल्लीत होणे ही सर्वांसाठी अभिमानाची बाब असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री&period;फडणवीस म्हणाले&comma; जगभरातील मराठी माणसांचे स्वप्न या निमित्ताने पूर्ण झाले&period; परकीय आक्रमकांनी आपल्या भाषेला प्रदुषित करण्याचा प्रयत्न केल्यावर शिवाजी महाराजांनी राजकारभारात मराठीचा उपयोग करण्याचा निर्णय केला&period; सर्व फारसी&comma; ऊर्दु शब्द वगळून मराठीचे शब्द आणण्याची परंपरा त्यांनीच सुरू केली&period; स्वभाषेचा अभिमान आणि आग्रह छत्रपती शिवाजी महाराजांकडूनच आपण शिकलो आहोत&period; संमेलन होत असलेल्या तालकटोरा स्टेडिअममध्ये 1737 मध्ये&nbsp&semi; मराठ्यांनी आपली छावणी लावून दिल्ली जिंकली होती&period; आता आमचा मराठी माणूस आपल्या विचारांनी&nbsp&semi; दिल्ली जिंकणार आहे&period; विश्व मराठी संमेलनात पु&period;ल&period; देशपांडे म्हणाले होते&comma; आपल्या मातृभाषेवर प्रेम करणाऱ्याला माया आणि वात्सल्य समजतं आणि तो दुसऱ्या भाषेवरही प्रेम करतो&period; मराठी भाषेने असे सर्वांना आपलेसे केले आहे&period; ती लोकभाषा&nbsp&semi; होऊन&comma; लोकसाहित्य निर्माण झाल्याने मराठी समृद्ध झाली&period;&nbsp&semi; संतांनी मराठी भाषा अधिक समृद्ध केली&period;&nbsp&semi; कला&comma; साहित्य&comma; संस्कृती मराठी माणसाच्या ठायी वसलेली आहे&period; त्यामुळेच वेगवेगळी साहित्य संमेलने महाराष्ट्रात होत असतात&comma; त्यात बोली भाषांना स्थान मिळत असते&period; दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मराठीची सेवा करण्याची संधी सर्वांना मिळत असल्याचे त्यांनी सांगितले&period; हे अधिवेशन ऐतिहासिक ठरणार असल्याचे सांगून 100 वे अधिवेशनही भव्य स्वरुपात साजरे करण्यात येईल&comma; असेही श्री&period;फडणवीस म्हणाले&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>संस्कृतीचे बलस्थान असणाऱ्या भाषेने माणसे जोडावी &&num;8211&semi;  संमेलनाध्यक्ष डॉ&period; तारा भवाळकर<&sol;strong><&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन विविध बोलींचे संमेलन आहे आणि पंतप्रधानांना भेट दिलेली विठ्ठलाची मूर्ती ही महाराष्ट्राच्या उदार संस्कृतीचे प्रतिक असल्याचे नमूद करून डॉ&period;तारा भवाळकर म्हणाल्या&comma; मराठी भाषेचे महत्व संत ज्ञानेश्वर&comma; संत एकनाथांनी मांडले आहे&period; छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य स्थापन करण्यापूर्वी संतांनी त्यासाठी पोषक भूमी तयार केली होती&period; मराठी भाषा संतांनी टिकवली&period; भाषा जीवनात असावी लागते&period; भाषा जैविक गोष्ट असून&comma; ती बोलली तर जीवंत रहाते&period; महाराष्ट्राला पांडुरंगांचे स्मरण मराठीतून करायला लावणाऱ्या संतांनी मराठी जिवंत ठेवली&period; ज्या दिवशी आईने पहिली ओवी बाळासाठी म्हटली असेल त्या दिवशी मराठी भाषा जन्माला आली&nbsp&semi; असेल&period; संतांनी विठ्ठलाशी संवाद साधतांना मराठी भाषेतून साधला&period; संत खऱ्या अर्थाने पुरोगामी विचाराचे होते&period;&nbsp&semi; या सर्वांना मिळून मराठी भाषेचे अभिजातपण आले आहे&period; मराठी बोलीतून पसरली म्हणून शिवाजीमहाराजांना खेड्यापाड्यातून मावळे मिळाले&period; भाषा हे संस्कृतीचे बलस्थान असते&period; भाषा ही आपलेपण निर्माण करणारी&comma; जोडणारी गोष्ट असली पाहिजे&comma; तोडणारी नाही&period; संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होण्यासाठी स्त्री असण्यापेक्षा गुणवत्त हा महत्वाचा आधार आहे&period; दिल्लीचे तख्त राखणारा महाराष्ट्र विचारातून&comma; साहित्यातून जीवंत राहिला आहे&period; साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रेमाचा संदेश दिला जावा&comma; अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>वर्तमान काळात साहित्यिकांवर महत्वपूर्ण जबाबदारी &&num;8211&semi; स्वागतध्यक्ष शरद पवार<&sol;strong><&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिलेच साहित्य संमेलन दिल्ली येथे होत असून त्याचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असल्याबद्दल विशेष आनंद असल्याचे सांगून श्री&period;पवार यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत घेतलेल्या भूमिकेबद्दल श्री&period; मोदी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली&period; ते म्हणाले&comma; संत परंपरेपासूनच सर्वसमावेशक विचार मांडण्याचे काम मराठी साहित्यिकांनी सातत्याने केले&period; महिला साहित्यिकांच्या योगदानाने मराठी साहित्य समृद्ध झाले आहे&period; समाजाला मार्गदर्शन करण्याचे काम साहित्यिकांनी केले&period; साहित्यिकांची जबाबदारी वाढली असून समाजाला&nbsp&semi; समाजसुधारकांच्या विधायक मार्गाने नेण्याचे काम साहित्यिकाने करण्याची आवश्यकता आहे&period; नव्या पिढीला पुस्तकांशी बांधून ठेवण्यासाठी नव्या माध्यमांचा कल्पकतेने वापर करायला हवा&period; नव्या पिढीमध्ये साहित्याची गोडी टिकून राहिली तरच साहित्याला भवितव्य असेल&period; महिलांना अध्यक्षपदाचा मान&nbsp&semi; अधिकाधिक मिळाला तर महिला साहित्यिकांची परंपरा आणखी वेगाने पुढे जाईल&period; राजकारण आणि साहित्यातील संबंध पूर्वीपासून आहे&comma; ते परस्पराला पूरक आहेत असेही श्री&period;पवार म्हणाले&period;&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>श्री&period;नहार म्हणाले&comma; दिल्लीतील साहित्य संमेलनाच्या माध्यमातून लेखणी आणि ग्रंथालयाचे महत्व पोहोचविणारे आहे&period; पंतप्रधानांच्या हस्ते संमेलनाचे होणारे उद्घाटन राज्याच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिले जाईल&period; देशाच्या जडणघडणीत महाराष्ट्राच्या सकारात्मक भूमिकेची पायाभरणी करणारे हे संमेलन आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>प्रास्ताविकात श्रीमती तांबे यांनी संमेलनाच्या आयोजनाविषयी माहिती दिली&period; &nbsp&semi; मराठी मनाचं देशाच्या राजधानीशी असलेलं नातं जवळ आणणारं हे संमेलन असल्याचे त्यांनी सांगितले&period; मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि रुकय्या मकबूल यांच्या नवकार मंत्राने कार्यक्रमाची सुरुवात झाली&period; शमीमा अख्तर यांनी महाराष्ट्र गीत सादर केले&period; पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली&period; या कार्यक्रमास केंद्रीय राज्य मंत्री प्रतापराव जाधव&comma; विधान परिषदेचे सभापती प्रा&period;राम शिंदे&comma; माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे&comma; लोकसभेचे माजी अध्यक्ष शिवराज पाटील चाकूरकर &comma;&nbsp&semi; विनय सहस्रबुद्धे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते&period;&nbsp&semi;&nbsp&semi;&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: