प्रजाहितदक्ष व शिक्षणप्रिय- राजर्षी शाहू महाराज (Rajarshri Shahu Maharaj

Rajarshri Shahu Maharaj

&NewLine;<h2 class&equals;"wp-block-heading">Rajarshri Shahu Maharaj जयंती विशेष <&sol;h2>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>Rajarshri Shahu Maharaj राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या कार्यकाळात समाजसुधारणा&comma; शिक्षण प्रसार&comma; आणि सामाजिक न्यायाच्या दिशेने अनेक महत्त्वपूर्ण पाऊले उचलली&period; त्यांनी शोषित&comma; दलित आणि मागासवर्गीयांना शिक्षण आणि समानतेचे हक्क मिळवून देण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले&period; अशा या राजर्षी शाहू महाराजांचा जन्मदिवस २६ जून हा महाराष्ट्रात &OpenCurlyQuote;सामाजिक न्याय दिवस’ म्हणून साजरा केला जातो&period; या दिवसाचा सामाजिक उद्देश अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे&comma; गरिबी&comma; लिंगभेद&comma; शारीरिक अपंगत्व&comma; निरक्षरता आणि धार्मिक भेदभाव दूर करून सामाजिक एकात्मता साधणे हा आहे&period; या शाहू जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या जीवनप्रवासाचा घेतलेला वेध……&period;<&sol;strong><&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p> राजर्षी शाहू महाराज Rajarshri Shahu Maharaj हे लोकशाहीवादी&comma; समाजसुधारक आणि एक सक्षम राज्यकर्ते होते&period; त्यांच्या राजवटीत अनेक पुरोगामी धोरणे यशस्वीपणे राबवत त्यांनी मागास जातींतील लोकांसाठी काम तर केलेच पण सर्वांना प्राथमिक शिक्षण देणे हे ध्येय मानले&period; ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळात शाहूराजांनी प्रयत्न केले&comma; सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली&comma; तसेच सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता दलित &lpar;अस्पृश्य&rpar; व मागासवर्गीयांच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली&period; महाराजांना &&num;8220&semi;राजर्षी&&num;8221&semi; ही पदवी त्यांच्या राज्यभिषेकाच्या वेळी त्यांना त्याच्या क्षात्र गुरुने दिली&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>शाहू महाराजांचा जन्म Rajarshri Shahu Maharaj २६ जून १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला&period; कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्‍नी आनंदीबाई यांनी १७ मार्च १८८४ रोजी त्यांना दत्तक घेऊन &&num;8216&semi;शाहू&&num;8217&semi; हे नाव ठेवले&period; सन १८८९ ते १८९३ या चार वर्षांच्या कालखंडात धारवाड येथे होते&period; १८९४ रोजी राज्याभिषेक झाल्यानंतर २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p> Rajarshri Shahu Maharaj शाहू महाराजांनी बहुजन समाजातील शिक्षणप्रसारावर विशेष भर दिला&period; त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले&period; स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली&period; अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इ&period;स&period; १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली&period; जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला&period; इ&period;स&period; १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली&period; बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी इ&period;स&period; १९१६ साली निपाणी येथे &OpenCurlyQuote;डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापली&period; वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेले वेदोक्त प्रकरण शाहू महाराजांच्याच काळात झाले&period;१८९६चा दुष्काळ व नंतर आलेली प्लेगची साथ या काळात त्यांची खूप कामे केली&period; दुष्काळी कामे&comma; तगाईवाटप&comma; स्वस्त धान्यदुकाने&comma; निराधार आश्रमाची स्थापना हे कार्य पाहता &&num;8216&semi;असा राजा होणे नाही&&num;8217&semi; असेच प्रजेला वाटते&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>&OpenCurlyQuote;शाहू छत्रपती स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल’&comma; शाहुपुरी व्यापारपेठ&comma; शेतकऱ्यांची सहकारी संस्था&comma; शेतकी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी &OpenCurlyQuote;किंग एडवर्ड अ‍ॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ इत्यादी संस्था कोल्हापुरात स्थापण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता&period; गुळाच्या बाजारपेठेची निर्मिती&comma; राधानगरी धरणाची उभारणी&comma; शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे अशा उपक्रमांतूनही त्यांनी कृषिविकासाकडे लक्ष पुरवले&period;शेती&comma; उद्योग&comma; सहकार या क्षेत्रांत राजर्षींनी नवनवे प्रयोग केले&period; त्यांनी डॉ&period; आंबेडकरांना शिक्षणासाठी&comma; तसेच मूकनायक वृत्तपत्रासाठीही सहकार्य केले&period; चित्रकार आबालाल रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना Rajarshri Shahu Maharaj राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिले&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p> Rajarshri Shahu Maharaj स्वातंत्र्यापूर्वी समता&comma; बंधुता&comma; धर्मनिरपेक्षता&comma; सर्व घटकांना विकासाची समान संधी ही तत्त्वे शाहू महाराजांनी करवीर संस्थानात अमलात आणली&period; रयत प्रजा व उपेक्षित समाजाला त्यांचे हक्क व न्याय मिळवून देण्याचे कार्य शाहूंनी केले आपल्या संपूर्ण जीवन कार्यामध्ये त्यांनी समाजातील बहुजन समाजाला त्यांचे न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी आपल्या अधिकाराचा पूर्णपणे वापर केला म्हणूनच ते लोककल्याणकारी राज्यकर्ते ठरले&period; त्यांच्या कार्याचा गौरव समकालीन लेखकांनी व इतिहासकारांनी केलेला आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>Rajarshri Shahu Maharaj बहुजनांच्या शिक्षणाविषयी असणाऱ्या तळमळीतून त्यांनी कोल्हापूर संस्थानात सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा केला&period; जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्या पालकांना प्रतिमहिना १ रू&period; दंड आकरण्याची कायदेशीर तरतूद केली&period; त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले&period; अस्पृश्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने शाहू महाराजांनी अस्पृश्यांना स्वावलंबी बनवण्याचे ठरवले&period; त्यासाठी अस्पृश्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले&comma; दुकाने हॉटेल्स काढण्यासाठी प्रोत्साहन दिलेतसेच आर्थिक मदतदेखील देऊ केली&period; अस्पृश्यांना शिवण यंत्रे देऊन स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले&period; राजवाड्यातील कपडे त्यांच्याकडून शिवून घेण्यास सुरुवात केली गंगाधर कांबळे या व्यक्तीला कोल्हापुरात मध्य वस्तीत चहाचे दुकान काढून दिले अस्पृश्यांना समाजात प्रतिष्ठा प्राप्त व्हावी म्हणून त्यांनी महार पैलवानांना पैलवान चांभार यांना सरदार अभंग यांना पंडित अशा पदव्या दिल्या&period; अस्पृश्य सुशिक्षित तरुणांची तलाठी म्हणून नेमणूक केली&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p> Rajarshri Shahu Maharaj अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत १९१९ मध्ये बंद केली&period; गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणाऱ्या पाटील शाळा&comma; प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या&comma; तंत्रे व कौशल्ये शिकवणाऱ्या शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले&period; छत्रपती शिवरायांच्या विचारांचा व कार्याचा वारसा समर्थपणे चालवत सामाजिक बंधुभाव&comma; समता&comma; दलित व उपेक्षित बांधवांचा उद्धार&comma; शिक्षण&comma; शेती&comma; उद्योगधंदे&comma; कला&comma; क्रीडा व आरोग्य इत्यादी महत्त्वपूर्ण क्षेत्रामध्ये अद्वितीय स्वरूपाचे कार्य केले&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>मागासलेल्या लोकांना प्रगतीच्या प्रवाहात आणावयाचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद केली पाहिजे&period; हा व्यापक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानात मागास जातींना ५० टक्के जागा राखीव राहतील अशी घोषणा करून त्यावर कार्यवाही केली&period; त्या काळात अस्पृश्य लोकांसाठी नोकरीमध्ये राखीव जागांची तरतूद करून सरकारी नोकऱ्या मिळवून दिल्या&period; शाळा&comma; दवाखाने&comma; पाणवठे&comma; सार्वजनिक विहिरी&comma; सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी अस्पृश्यांना समानतेने वागवावे असा आदेश त्यांनी काढला&period; १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली&period; तसेच त्यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठीही कायद्याची निर्मिती केली&period; बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी इ&period;स&period; १९१६ साली निपाणी येथे &&num;8216&semi;डेक्कन रयत असोसिएशन&&num;8217&semi; ही संस्था स्थापली&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p> शाहूराजांनी आपल्या संस्थानात जोगत्या-मुरळी प्रतिबंधक कायदा करून ही पद्धत बंद पाडली&period; जातिभेदाचे प्रस्थ नष्ट व्हावे म्हणून आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहास कायदेशीर मान्यता देऊन कायदा केला आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी करून आपल्या संस्थानात १०० मराठा-धनगर विवाह घडवून आणले&period; अशा अनेक कार्याच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांना सन्मानाची वागणूक व दर्जा मिळवून दिला&period;गुन्हेगारांना प्रेमाने&comma; मायेने आपलेसे करून समाजात सामाजिक दर्जा देणारा व त्यांच्यात स्वाभिमान निर्माण करणारा हा राजा होता&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>वेदोक्त प्रकरणामुळे सत्यशोधक चळवळ आणखी प्रेरित झाली&period; बहुजन&comma; अस्पृश्य समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य करताना त्यांनी सत्यशोधक चळवळीला प्रत्यक्ष सहकार्य केले&period; कोल्हापूर संस्थानांमध्ये सत्यशोधक चळवळीचा प्रसार आणि प्रचार करण्याचे ही महत्त्वाची जबाबदारी राजर्षी शाहू महाराजांनी पार पडली त्यांच्या नेतृत्वाखालीच संपूर्ण कोल्हापूर संस्थानांमध्ये सत्यशोधक चळवळ उभी राहिली&period; बाबासाहेब आंबेडकरांना माणगावच्या परिषदेमध्ये &&num;8220&semi;दलितांचा नेता&&num;8221&semi; व &&num;8220&semi;भारतीय अग्रणी नेता&&num;8221&semi; म्हणून घोषित केले&period; शाहू यांनी सर्व उपेक्षित समाजातील व अस्पृश्य वर्गातील लोकांना आपल्या संस्थानामध्ये आरक्षणाद्वारे नोकऱ्या देण्याचा प्रयत्न केला&period; यादृष्टीने संपूर्ण भारतामध्ये आरक्षणाचे जनक म्हणून त्यांचा गौरव केला जातो&period; सामाजिक न्यायाची भूमिका घेऊन शाहूराजांनी सामाजिक समतेसाठी प्रयत्न केले&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p> शाहूंनी कोल्हापूर संस्थानात कला&comma; संस्कृती आणि क्रीडा यांनाही विशेष महत्त्व देऊन संगीत&comma; चित्रपट&comma; चित्रकला&comma; लोककला आणि कुस्ती या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्वपूर्ण कार्य केले&period; त्यांनी स्वातंत्र्यवीराना वेळोवेळी आर्थिक व इतर मदत केली&period; शाहू महाराजांनी प्राथमिक&comma; माध्यमिक&comma; पुरोहित&comma; युवराज&sol; सरदार&comma; पाटील&comma; उद्योग&comma; संस्कृत शाळा&comma; सत्यशोधक&comma; सैनिक&comma; बालवीर&comma; डोंबारी मुलांची आणि कला अशा बारा प्रकारच्या शाळा तसेच २६ शैक्षणिक वसतिगृहे उभारून सुरु करून शैक्षणिक कार्य केले&period;&NewLine;&NewLine; शाहू महाराजांनी प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी पाऊले उचलून न्यायव्यवस्थेत सुधारणा केल्या आणि सर्वसामान्यांना न्याय मिळवण्यासाठी लोकांना सोयीस्कर उपाययोजना केल्या&period; राजर्षी शाहू महाराज हे एक महान समाजसुधारक&comma; शिक्षणप्रेमी&comma; आणि न्यायप्रिय राजे होते&period; त्यांच्या कार्यामुळे आणि विचारांमुळे महाराष्ट्राच्या आणि संपूर्ण भारताच्या समाजाच्या विकासात मोठे योगदान मिळाले&period; त्यांच्या कार्याचा प्रभाव आजही समाजात दिसून येतो&period; शाहू महाराजांच्या विचारांनी आणि त्यांच्या कार्याने अनेक पिढ्यांना प्रेरणा मिळाली आहे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p>राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याची आणि विचारांची प्रेरणा घेतल्यास आपण समाजात सकारात्मक बदल घडवू शकतो&period; त्यांच्या कार्याच्या प्रेरणेनेच आजच्या काळातही आपण समानता&comma; न्याय&comma; आणि शिक्षणाच्या क्षेत्रात प्रगती साधू शकतो&period; आजच्या या राजर्षी शाहू महाराज जयंती आणि सामाजिक न्याय दिवसाच्या निमित्ताने त्यांच्या महान कार्याची आठवण ठेवून आपण सर्वांनी त्यांचा आदर्श अनुसरावा आणि समाजाच्या कल्याणासाठी कार्य करावे&period;<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><strong>सहा&period;प्रा&period;सुर्यकांत शामराव अदाटे<&sol;strong><br>प्रा&period;संभाजीराव कदम महाविद्यालय&comma;<br>देऊर<br>९९७५७५९३२<&sol;p>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<div class&equals;"wp-block-columns is-layout-flex wp-container-core-columns-is-layout-28f84493 wp-block-columns-is-layout-flex">&NewLine;<div class&equals;"wp-block-column is-layout-flow wp-block-column-is-layout-flow"><&sol;div>&NewLine;<&sol;div>&NewLine;&NewLine;&NewLine;&NewLine;<p><&sol;p>&NewLine;<div style&equals;"margin-top&colon; 0px&semi; margin-bottom&colon; 0px&semi;" class&equals;"sharethis-inline-share-buttons" ><&sol;div>

PRAKASH KUMBHAR: